मुंबई : अटल सेतूवरून प्रवास करणाऱ्यांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे . अटल सेतूवरून जाणाऱ्या इलेक्ट्रिक वाहनांना टोलसाठी आजपासून कोणत्याही प्रकारचे शुल्क मोजावे लागणार नाही . मंत्रिमंडळाच्या २९ एप्रिल रोजी झालेल्या बैठकीत राज्य सरकारने इलेक्ट्रिक वाहनांसाठी नवीन धोरण आणले होते, त्यानुसार राज्यातील प्रमुख महामार्गावर इलेक्ट्रिक वाहनांना टोल करातून वगळण्यात आले होते. त्याची अमलबजावणी आजपासून सुरू झाली आहे.
आता अटल सेतूवरून जाणाऱ्या प्रत्येक इलेक्ट्रिक वाहनाला टोल माफ केला जाणार आहे. तसेच येत्या दोन दिवसांत मुंबई पुणे एक्सप्रेसवे आणि समृद्धी महामार्गावरही टोलमाफी केली जाणार आहे. प्रदूषण कमी करण्यासाठी आणि इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी पुढील पाच वर्षांपर्यंत टोलमध्ये सूट देण्यात आली आहे. त्यासाठी आवश्यक प्रणाली तयार करण्यात येणार आहे . हा निर्णय सध्या अटल सेतूपुरता मर्यादित आहे . पुढील दोन ते तीन दिवसांत मुंबई-पुणे आणि मुंबई-नागपूर या महामार्गावर देखील हि अम्मलबजावणी करण्यात येणार आहे .
मुंबईसह महाराष्ट्रात इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करणाऱ्यांसाठी ही आनंदाची बाब आहे. मुंबई आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या अटल सेतूवर इलेक्ट्रिक वाहनांना टोलमाफी आजपासून लागू करण्यात आली आहे. सरकारी आणि खासगी वाहनांसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. चारचाकी इलेक्ट्रिक गाड्या आणि बसेससाठी हा निर्णय असेल. अटल सेतूवर प्रवास करणाऱ्या इलेक्ट्रिक वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. राज्य सरकारने २०३० पर्यंत राज्यात इलेक्ट्रिक वाहनांना टोलमधून सूट देण्याचा निर्णय घेतला आहे . अटल सेतूवर चारचाकी वाहनाला २५० रूपयांचा टोल आहे . इलेक्टिक वाहनांना आता एक रूपायाही टोल द्यावा लागणार नाही.
राज्यात फडणवीस सरकारने २९ एप्रिल २०२५ रोजी 'महाराष्ट्र विद्युत वाहन निती'ची घोषणा केली. इलेक्ट्रिक वाहनांसाठीची ही टोल माफी राज्य सरकारकडून वाहतूक क्षेत्रातून होणारे कार्बन, प्रदूषणकारी वायू आणि हरित गृह वायू उत्सर्जन रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला . त्याअंतर्गत अटल सेतू, मुंबई-पुणे एक्सप्रेसवे आणि समृद्धी महामार्गावर इलेक्ट्रिक चारचाकी वाहने आणि बसला १०० टक्के टोलमाफीचा निर्णय घेतला. तर राज्य आणि राष्ट्रीय महामार्गावर इलेक्ट्रिक वाहनांना टोलमध्ये ५० टक्के सूट मिळेल. परिवहन आयुक्त विवेक भिमनवर यांनी सांगितले की, 'अटल सेतूवर टोल माफीसाठी एक सॉफ्टवेयर तयार करण्यात आले आहे. शुक्रवारपासून ते सुरू करण्यात येणार आहे. अन्य दोन महामार्गावरही दोन दिवसांत ही सुविधा सुरू होणार आहे. '
मुंबईत सध्या २२,४०० इलेक्ट्रिक वाहने नोंदणीकृत आहेत. सरासरी दररोज सुमारे ६०,००० वाहने अटल सेतुवरून प्रवास करतात. राज्य सरकारच्या धोरणानुसार, अटल सेतूवर इलेक्ट्रिक वाहनांना टोलमधून सूट देण्यात येणार आहे. पण इलेक्ट्रिक मालवाहक वाहनांचा समावेश नाही. ही सवलत सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रात इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढवण्यासाठी लागू करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या या धोरणामुळे इलेक्ट्रिक वाहनांचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे . यामुळे प्रदूषण रोखण्यासाठी हातभार लागणार आहे .
या वाहनांना टोल माफ
इलेक्ट्रिक बसेस खासगी व प्रवासी हलकी चारचाके वाहने राज्य परिवहन महामंडळाची प्रवासी वाहने शहरी परिवहन उपक्रमांच्या बस






