‘जागरण गोंधळ’ या गाण्याला गणेश चंदनशिवे यांचा आवाज

  16

अभिनेता ललित प्रभाकर आणि अभिनेत्री हृता दुर्गुळे ही जोडी ‘आरपार’ या सिनेमातून पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्र येणार आहे. रोमँटिक कथा असलेल्या या सिनेमात ललित व ऋता यांना एकत्र पाहायला मिळणार आहे. ‘प्रेमात अधलं मधलं काही नसतं', याचे वर्णन दर्शविणारा हा सिनेमा आहे. नुकतेच ‘आरपार’ सिनेमातले पहिले गाणे ‘जागरण गोंधळ’ भेटीला आले. या गाण्यात लोककला अभ्यासक गणेश चंदनशिवेंचा यांचा असल्याचे समजते.


‘आरपार’ सिनेमातील ललित प्रभाकर देवीचा जागरण गोंधळ करताना दिसतो. त्यावेळी समजते की ललित आणि हृता दुर्गुळेचे ब्रेकअप झाले आहे. त्यामुळे देवीच्या उत्सवात ललितला वारंवार हृताची आठवण येत असते. त्यामुळेच तो दुःखात बेभान होऊन नाचताना दिसतो. ती गेल्यावरही जेव्हा तिच्या आठवणी सोडत नाहीत. तेव्हा तुटलेले हृदय देवीचा धावा करतयं असे कॅप्शन देत हे गाणे अनेकांना शेअर करण्यात आले. हे गाणे रिलीज होताच प्रेक्षकांच्या चांगलेच पसंतीस उतरले आहे. लिऑन्स मीडिया प्रॉडक्शन एलएलपी' प्रस्तुत, निर्माते नामदेव काटकर, रितेश चौधरी निर्मित ‘आरपार’ हा सिनेमा आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन, कथा, पटकथा, संवाद या धुरा गौरव पत्की यांनी सांभाळल्या आहेत. प्रेमाची अनोखी परिभाषा मांडणारा हा रोमँटिक सिनेमा हृता व ललित या नव्या जोडीसह १२ सप्टेंबरला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात ललित-हृतासोबत माधव अभ्यंकर, सुहिता थत्ते, स्नेहलता वसईकर या कलाकारांच्याही प्रमुख भूमिका आहेत.

Comments
Add Comment

संत विचारांनी भारावलेली कथा ‘फकिरीयत’

‘फकिरीयत’ या आगामी हिंदी चित्रपटाचा भव्य ट्रेलर आणि संगीत प्रकाशन सोहळा नुकताच प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य

‘जेलर २’मध्ये रजनीकांत - मिथुन यांची जोडी पुन्हा झळकणार

साउथचा सुपरस्टार आणि चाहत्यांच्या मते ‘भगवान’ असलेले रजनीकांत सध्या त्यांच्या ‘कुली’ या चित्रपटामुळे प्रचंड

‘घरत गणपती’ २९ ऑगस्टपासून चित्रपटगृहात झळकणार

का ही कलाकृती या कायम पाहाव्या अशाच वाटतात. काही चित्रपटही असे असतात की जे पुन्हा पुन्हा पाहावेसे वाटतात. अशा

कंतारा चैप्टर १’मधून गुलशन देवय्या यांचा दमदार लूक प्रदर्शित

‘कंतारा चैप्टर १’ या चित्रपटातून गुलशन देवय्या यांचा पहिला लूक प्रदर्शित झाला आहे. ते या चित्रपटामध्ये

गणेशोत्सवाच्या स्वागतासाठी ‘शंकराचा बाळ आला’ भक्तिगीत सज्ज

गणेशोत्सवाच्या स्वागतासाठी ‘शंकराचा बाळ आला’ भक्तिगीत सज्ज रसिकांच्या भेटीला आले आहे. यामध्ये गायिका वैशाली

‘बिन लग्नाची गोष्ट’ने उलगडलं नात्यांचं गूढ – ट्रेलरने वाढवली उत्सुकता !

मुंबई : नात्यांचा गुंता, प्रेमाची गोडी आणि थोडीशी नोकझोक… हे सगळं सांगणारी ‘बिन लग्नाची गोष्ट’ ही गोड कथा आता