Friday, August 22, 2025

राज्य सरकारी कर्मचार्‍यांचे वेतन गणपतीपूर्वी होणार

राज्य सरकारी कर्मचार्‍यांचे वेतन गणपतीपूर्वी होणार
राज्य सरकारने सरकारी अधिकारी व कर्मचार्‍यांना मोठा दिलासा दिला आहे. पुढील आठवड्यापासून सुरू होणार्‍या गौरी-गणपती सणाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने आपल्या कर्मचार्‍यांना ऑगस्ट 2025 या महिन्याचे वेतन गणेशोत्सवापूर्वी अदा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ऑगस्ट महिन्याचे वेतन कर्मचार्‍यांच्या बँक खात्यात 26 ऑगस्टला जमा केले जाणार आहे. येत्या 27 ऑगस्टला लाडक्या बाप्पांचे आगमन होत आहे. गणेशोत्सवाची धामधूम लक्षात घेता सरकारने कर्मचार्‍यांना त्यांचे मासिक वेतन सहा दिवस आधीच देण्याचे ठरवले आहे.

या निर्णयाचा लाभ सरकारी कर्मचार्‍यांसह सेवानिवृत्त कर्मचारी तसेच कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना होणार आहे. याशिवाय जिल्हा परिषद कर्मचारी, मान्यता आणि अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था, अकृषिक विद्यापीठे, कृषी विद्यापीठे आणि त्यांच्याशी संलग्न असलेल्या अशासकीय महाविद्यालयांचे अधिकारी, कर्मचारी, निवृत्ती वेतनधारक, कुटुंब निवृत्तीवेतनधारक यांनाही या निर्णयाचा फायदा होणार आहे. यासंदर्भात वित्त विभागाने गुरुवारी शासन निर्णय जारी केला आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >