Friday, August 22, 2025

संत विचारांनी भारावलेली कथा ‘फकिरीयत’

संत विचारांनी भारावलेली  कथा ‘फकिरीयत’

‘फकिरीयत’ या आगामी हिंदी चित्रपटाचा भव्य ट्रेलर आणि संगीत प्रकाशन सोहळा नुकताच प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिरात मोठ्या दिमाखात पार पडला. या चित्रपटात गुरुमाई माँ रुद्रात्मिका यांच्या आध्यात्मिक जीवनप्रवासाची, त्यागाची, श्रद्धेची आणि महावतार बाबाजींसह संत-समर्थांच्या कृपेची अप्रतिम कहाणी प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. आध्यात्म, क्रियायोग, श्रद्धा, भक्ती आणि त्याग यांचा संगम असलेला हा चित्रपट १९ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या सोहळ्यास अनुराधा पौडवाल आणि मेधा मांजरेकर यांसारख्या मान्यवरांनी हजेरी लावली होती. संत विचारांनी भारावलेली कथा, सात्विक अभिनय, मनोहारी निसर्गदृश्ये आणि प्रवीण कुंवर यांचे सुमधुर संगीत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणार आहे. ‘फकिरीयत’ हा केवळ एक चित्रपट नसून, दैवी मार्गाची अनुभूती घडवणारा अध्यात्मिक प्रवास आहे.

Comments
Add Comment