
भाजपकडून एनडीएने उपराष्ट्रपती पदासाठी सी.पी. राधाकृष्णन यांना उमेदवारी दिली आहे. राधाकृष्णन यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असून या निवडणुकीची सर्व जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सोपवण्यात आली आहे.
याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार यांच्याशी संपर्क करून पाठिंब्याची मागणी केली मात्र या फडणवीसांच्या पाठिंब्याला पवारांनी नकार दर्शवला आहे. राष्ट्रवादी काँगेसची बैठक झाली आणि या बैठीकीनंतर शरद पवारांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.
यावेळी शरद पवार यांनी आमच्या बैठका झाल्या असून सुदर्शन यांचा फॉर्मही भरलं असं पवार यांनी स्पष्ट केला आहे. उपराष्ट्रपतीपद निवडणुकीसाठी फडणवीसांनी मला फोन केला आणि राधाकृष्णन यांना पाठिंबा द्यावा अशी फडणवीसांनी मला विनंती केली आहे असंही शरद पवार यांनी म्हटलंय.
यावेळी शरद पवार यांनी मुख्यमंत्री फडणवीसांना सी.पी. राधाकृष्णन हे आमच्या विचाराचे नाहीत असं म्हणत पवारांनी स्पष्ट नकार दिलाय. “उद्धव ठाकरे, शरद पवार यांना मी फोन केला. मी निवेदन केलं की, महाराष्ट्राचे राज्यपाल जे मुंबईचे मतदार आहेत, त्यांना उपराष्ट्रपतीपदाचं उमेदवार बनवलं आहे.
उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक पक्षीय नसते. त्या निवडणुकीसाठी व्हीप नसतो. महाराष्ट्राच्या अस्मितेला आपण मानता, त्यामुळे महाराष्ट्राचा एक मतदार या देशाचा उपराष्ट्रपती बनणार आहे. त्यांना समर्थन द्या अशी विनंती मी केली. त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले की, सर्वांशी चर्चा करुन आम्ही निर्णय घेऊ. शरद पवार म्हणाले की, “विरोधी पक्षांनी एकत्र येऊन उमेदवार ठरवलाय, आम्ही त्याच्यासोबत जाऊ” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.