पृथ्वीराज चव्हाणांच्या पुतण्याचे तीन ठिकाणी मतदान! भाजपचा आरोप, मुख्यमंत्री म्हणाले "आता खरे वोट चोर कोण?"

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कुटुंबातील एकूण ९ सदस्यांचे दुबार तिबार मतदान


सांगली : काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul gandhi) यांनी मतचोरीचा आरोप करत निवडणूक आयोग आणि केंद्रातील मोदी सरकारवर गंभीर आरोप केले. त्याच पार्श्वभूमीवर आता, भाजपाने देखील पलटवार करत, राहुल गांधीच्या नेत्यांना लक्ष्य केलं आहे. ज्यामध्ये काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर निशाणा साधला आहे. ज्यात पृथ्वीराज चव्हाण यांच्या कुटुंबातील सदस्यांचा समावेश आहे.


महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे पुतणे इंद्रजीत चव्हाण यांचे तीन ठिकाणी मतदान यादीत नाव असल्याचा आरोप भाजपच्यावतीने करण्यात आला आहे. इतकेच नव्हे तर पृथ्वीराज चव्हाण यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांचा देखील यात सहभाग असल्याचे म्हंटले जात आहे.


 पृथ्वीराज चव्हाण यांचे पुतणे इंद्रजीत चव्हाण आणि इंद्रजीत यांच्या पत्नी, आई, मुलगा यांचे मतदार यादीत तीनवेळा नाव असल्याचे कराडमधील भाजप आमदार अतुल भोसले यांच्या पदाधिकाऱ्यांनी दावा केला आहे. पृथ्वीराज चव्हाण यांचे दुसरे पुतणे राहुल यांच्यासह त्यांच्या परिवाराचेही तीन ठिकाणी मतदान आहे. विशेष म्हणजे या सर्वांनी वय बदलून नाव नोंदणी केल्याचा आरोप कराडमधील भाजपा पदाधिकाऱ्यांनी केला आहे. तर, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे काँग्रेसच्या बोगस मतदान संशोधन समितीचे अध्यक्ष आहेत. पण, त्यांच्याच मतदारसंघात अशाप्रकारे घोळ करणे नैतिक नाही, यापूर्वीच्या निवडणुकीत चव्हाण यांनी असा प्रकार करुनच यश मिळवले असल्याचा आरोपही भाजपकडून करण्यात आला आहे.


पृथ्वीराज चव्हाण यांच्या परिवाराने अनेक वर्षापासून दोनदा-तीनदा मतदान करून विजय मिळवला असल्याचा घणाघणात भाजपपाने केला आहे. हे पृथ्वीराज चव्हाण यांना माहिती नव्हते का? असा सवालही भाजपा पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला आहे.



दुबार मतदार नोंदणी करून निवडणूक जिंकल्याचा आरोप


कराड दक्षिण विधानसभा मतदार संघात पृथ्वीराज चव्हाण यांनी दुबार मतदार नोंदणी करून २०१४ आणि २०१९ ची निवडणूक जिंकल्याचा आरोप भाजपचे पदाधिकारी आमदार डॉ. अतुल भोसले यांच्या पदाधिकाऱ्यांनी केला. याबद्दल अधिक माहिती महणजे, कराडमधील पाटण कॉलनीतील घरातून १५ नावं समोर येत आहेत,  जी त्या ठिकाणी राहातच नाही. तर पृथ्वीराज चव्हाण यांच्या घरातील ९ लोकांची दुबार नावे आहेत. दुबार, तिबार नावात पृथ्वीराज चव्हाण यांचे भाऊ, पुतणे, वहिनी याच्यासह कुटुंबियांची नावे आहेत. कराड दक्षिण विधानसभा आणि पाटण विधानसभा मतदार संघात पृथ्वीराज चव्हाण यांच्या घरातील नावे असल्याचेही भाजपचे कराड दक्षिण तालुकाध्यक्ष धनंजय पाटील यांनी म्हटलं आहे.



खरे वोट चोर कोण? याचं उत्तर द्या, फडणविसांचा राहुल गांधींना टोला


हे प्रकरण उघड झाल्यानंतर, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींना टोला लगावला. ते म्हणाले, "अतुल भोसलेंनी जे आरोप केले आहेत, त्यातून खरे वोट चोर कोण हे समोर आलं. याचं उत्तर राहुल गांधींनी दिलं पाहिजे". 
Comments
Add Comment

नवीन निवडणूक कार्यक्रम जाहीर, अंबरनाथमध्ये शिवसेनेला दिलासा; भाजपाला मोठा धक्का

अंबरनाथ : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महत्त्वाची मानली जाणारी अंबरनाथ नगरपरिषद निवडणूक

नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत ६७.६३ टक्के मतदान

मुंबई : राज्यातील विविध जिल्ह्यांमधील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी मंगळवार, दि. २ डिसेंबर रोजी मतदान

महाराष्ट्र ‘राजभवन; झाले आता ‘लोकभवन’

मुंबई : केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार महाराष्ट्र राजभवनचे नाव आता अधिकृतपणे ‘महाराष्ट्र लोकभवन’ असे

सर्व नगरपरिषदा व नगरपंचायत निवडणुकांची मतमोजणी २१ डिसेंबरला

मुंबई : राज्यातील सर्व २८८ नगरपरिषदा व नगरपंचायतींची मतमोजणी २१ डिसेंबर २०२५ रोजी करण्याचा आदेश मुंबई उच्च

महाराष्ट्रात नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीला राड्यांचे ग्रहण

मुंबई : महाराष्ट्रातील २६४ नगरपरिषद आणि नगरपंचायतींसाठी मंगळवार २ डिसेंबर २०२५ रोजी मतदान झाले. मतदानाची वेळ

महाराष्ट्रात किती नगर परिषद, नगर पंचायतींच्या निवडणुकांना स्थगिती अखेर आकडा समोर, निवडणूक आयोगाकडून सुधारीत कार्यक्रम जाहीर

मुंबई : महाराष्ट्रातील काही नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या निवडणुका पूर्णपणे स्थगित करण्याचा तर काही ठिकाणी नगर