
मोहित सोमण: फेड गव्हर्नर जेरोमी पॉवेल यांच्या आगामी जॅक्सन होल परिसंवादावर जगभरातील कमोडिटी बाजारासह शेअर बाजारातील गुंतवणूकदारांनी लक्ष केंद्रित केल्यामुळे आज सोन्याच्या जागतिक दरात घसरण झाली आहे. चांदीत मात्र मोठी वाढ झा ली आहे. 'गुडरिटर्न्स' संकेतस्थळावरील माहितीनुसार,२४ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात २२ रूपये, २२ कॅरेट सोन्याचा प्रति ग्रॅम दरात १५ रूपये, १८ कॅरेट सोन्याचा प्रति ग्रॅम दरात १२ रूपये घसरण झाली आहे. त्यामुळे प्रति ग्रॅम सोन्याचे दर २४ कॅरेटसाठी १०० ५३ रूपये,२२ कॅरेटसाठी ९२१५ व १८ कॅरेटसाठी ७५४० रूपयांवर पोहोचला आहे.संकेतस्थळावरील माहितीनुसार, २४ कॅरेट सोन्याचे प्रति तोळा दर २२० रूपयांनी, २२ कॅरेट सोन्याचे प्रति तोळा दर १५० रूपयांनी, १८ कॅरेट सोन्याचे प्रति तोळा दर १२० रूपयांनी घसरले आहेत. त्यामुळे प्रति तोळा दर २४ कॅरेटसाठी १००५३० रूपये, २२ कॅरेटसाठी ९२१५० रूपये, १८ कॅरेटसाठी ७५४०० रूपयांवर पोहोचला आहे. मुंबईसह देशातील प्रमुख शहरांत प्रति ग्रॅम दर २४ कॅरेटसाठी १००५३ रूपये, २२ कॅरेटसाठी ९२१५ रूपये,१८ कॅरेटसाठी ७६२० रूपयांवर पोहोचला आहे.
दुपारपर्यंत जागतिक पातळीवरील सोन्याच्या गोल्ड फ्युचर निर्देशांकात ०.३१% घसरण झाली आहे.भारतीय कमोडिटी बाजारातील एमसीएक्समध्ये (Multi Commodity Exchange MCX) मध्ये सोन्याच्या निर्देशांकात दुपारपर्यंत ०.१३% घसरण झाली आहे.त्या मुळे एमसीएक्समधील दरपातळी ९९३१० रुपयांवर पोहोचली आहे. आज जागतिक बाजारासह भारतीय बाजारातही सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. प्रामुख्याने जागतिक गुंतवणूकदार युएस फेड गव्हर्नर यांच्या भाषणाकडे लक्ष देत असताना गुंतवणूकदारांनी जागतिक पातळीवर सावधगिरी बाळगली. स्पॉट मागणीतही व ईपीएफ गुंतवणूकीत घसरण झाल्याने सोन्याचे दर घसरले.
पॉवेलच्या अपेक्षेने डॉलर मजबूत झाल्यामुळे धातूंच्या किमतीही मोठ्या प्रमाणात कमी झाल्या. डॉलरच्या चलनातही आठवड्यात जोरदार वाढ होण्याची शक्यता होती. आजही डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण झाल्याने सोन्याची पातळी जागतिक पातळीवरील तु लनेत भारतीय सराफा बाजारात मर्यादेपेक्षा घसरली नाही. दुपारपर्यंत डॉलर निर्देशांक (Dollar Index DXY) ०.१२% उसळला होता. जागतिक मानक असलेल्या गोल्ड स्पॉट दरात दुपारपर्यंत ०.२५% घसरण झाल्याने प्रति डॉलर होने ३३४० प्रति औंसवर पोहोचले आहे.
चांदीच्या दरात मात्र मोठी वाढ
आज चांदीतही मोठी पडझड झाली आहे. या आठवड्यातील आतापर्यंतची मोठी सर्वात वाढ झाली आहे. सलग तिसऱ्यांदा चांदीत घसरण रोखली गेल्याने चांदीत पुन्हा एकदा रिबाऊंड होऊन गुंतवणूक वाढण्याची शक्यता आहे. औद्योगिक मागणीतही घट झाल्या ने व एकूण मागणीत घट झाल्याने चांदीच्या दरात घसरण होत होती. परंतु पुन्हा एकदा सोन्याला पर्याय म्हणून चांदीत मागणी वाढल्याने ही वाढ झाली. डॉलर दरातही गेले दोन दिवस वाढ झाल्याने चांदीला आधारभूत पातळी गाठता आली नव्हती आज मात्र दरात वाढ झाली. भारतीय रूपयात घसरण झाल्याने चांदीला भारतीय सराफा बाजारात सपोर्ट लेवल मिळाली नाही.'गुडरिटर्न्स' संकेतस्थळावरील माहितीनुसार, चांदीच्या प्रति ग्रॅम दरात २ रुपयांनी व प्रति किलो दरात २००० रूपयांनी वाढ झाली. त्यामुळे प्रति ग्रॅम दर ११८ व प्रति किलो दर ११८००० रूपयांवर पोहोचला आहे. चांदीच्या जागतिक पातळीवरील सिल्वर फ्युचर निर्देशांकात ०.१७% घसरण झाली होती. भारतीय कमोडिटी बाजारातील एमसीएक्समध्ये चांदीच्या निर्देशांकात दुपारपर्यंत ०.०१% किरकोळ घसरण झाली त्यामुळे एमसीएक्समधील दरपातळी ११३६९२ रूपयांवर पोहोचले आहेत. मुंबईसह भारताच्या प्रमुख शहरातील चांदीचे सरासरी दर प्रति १० ग्रॅमसाठी १२८० रूपये, प्रति १०० ग्रॅमसाठी १२८०० रूपये, प्रति किलोसाठी १२८००० रूपयांवर पोहोचले आहेत.