Friday, August 22, 2025

बांगुर नगर मेट्रो स्टेशनचे नाव आता ‘आर्केड बांगुर नगर’

बांगुर नगर मेट्रो स्टेशनचे नाव आता ‘आर्केड बांगुर नगर’
आर्केड डेव्हलपर्सने बांगुर नगर मेट्रो स्टेशनचे नामकरण (Branding) करण्याचे अधिकार (Rights) मिळवले  मोहित सोमण:आर्केड डेव्हलपर्सने बांगुर नगर मेट्रो स्टेशनचे नामकरण आणि ब्रँडिंग अधिकार नुकतेच मिळवले आहेत. हे स्टेशन आता अधिकृतपणे आर्केड बांगुर नगर मेट्रो स्टेशन म्हणून ओळखले जाईल. मुंबई मेट्रोच्या यलो लाईन 2A वरील स्थानक बांगुर न गरचे ब्रँडिंग आता आर्केड बांगुर नगर करण्यात आले आहे. यासंबंधीची घोषणा मुंबईतील विशेषतः पश्चिम उपनगरातील बांधकाम व्यावसायिक कंपनी आर्केड डेव्हलपर्सने केली आहे आर्केड डेव्हलपर्स, साइनपोस्ट इंडिया लिमिटेड आणि आर्केड ग्राहकांचे प्रमुख मान्यवर या कार्यक्रमात उपस्थित होते. या कार्यक्रमात फित कापण्याचा समारंभासह यावेळी आर्केडचा वार्षिक अहवालही सादर करण्यात आला आहे. गजबजलेल्या मेट्रो लाईन २ए च्या बाजूने स्थित, आर्केड बांगुर नगर मेट्रो स्टेशन मुंबईच्या गोरेगाव विभागातील एक कॉरिडॉरपैकी एकाचे प्रवेशद्वार म्हणून काम करते. गोरेगाव पश्चिमेकडील त्याचे स्थान ते दैनंदिन प्रवासी आणि वाढत्या निवासी लोकसंख्येसाठी एक महत्त्वाचे केंद्र आगामी काळात बनू शकते. कंपनीने आपल्या ब्रँडिंगकडे व विस्ताराकडे विशेष लक्ष देत आहे. मागील वर्षी याच काळात कंपनीने आपला ४१० कोटींचा आयपीओ (IPO) बाजारात आणला होता. ३८ वर्ष जुन्या कंपनीच्या आयपीओला ११३.४९ वेळा अंतिम सबस्क्रिप्शन मिळाले होते. विशेषतः पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून (QIB) १७२.६ वेळा सबस्क्रिप्शन मिळाले होते. कंपनीने विस्ताराचा भाग म्हणून कंपनीने हे पाऊल उचलले आहे. गेल्या ३८ वर्षात कंपनीने मोठमोठे संकुल प्रकल्प (Housing Project) पूर्ण केले आहेत. कंपनीने दिलेल्या मा हितीनुसार, कंपनीकडून आगामी ४ ते ५ प्रकल्प मुंबईतील विविध भागात सुरू असून ३ प्रकल्प पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत. नव्या अधिकार ग्रहणावर भाष्य करताना आर्केड डेव्हलपर्स लिमिटेडचे संचालक अर्पित जैन यांनी म्हटले आहे की,'स्थानकाचे नामांतर समुदाय-केंद्रित शहरी डिझाइनद्वारे शहराचे स्वरूप घडवण्यावरील आर्केड यांच्या विश्वासाचे प्रतिबिंब आहे.गोरेगाव-मालाड पट्टा जीवनशैलीचे आकर्षण केंद्र म्हणून उदयास येत असताना, या क्षेत्राच्या उत्क्रांतीत योगदान देण्याचा आम्हाला अभिमान आहे.आम्ही  या कॉरिडॉरमध्ये अनेक पूर्ण झालेल्या, चालू असलेल्या आणि आगामी प्रकल्पांसह आक्रमकपणे आमचा विस्तार करत आहोत. आम्ही ज्या समुदायाची सेवा करतो त्या समुदायाशी आमचे संबंध अधिक दृढ करण्यासाठी एक अर्थपूर्ण पाऊल म्हणून या मेट्रो स्टेशन चे नामकरण अधिकार स्वीकारताना आम्हाला आनंद होत आहे.' यावेळी नव्या ब्रँडिगवर व्यक्त होताना साइनपोस्ट इंडिया लिमिटेडचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक श्रीपाद अष्टेकर म्हणाले आहेत की,'शहराशी ब्रँड्सच्या संबंधांना पुन्हा परिभाषित करण्याच्या दृष्टीने आजचा दिवस एक मैलाचा दगड आहे. बांगूर नगर स्टेशनच्या नामकरण अधिकारांसह, आम्ही ब्रँडिंगला केवळ दृश्यमानता म्हणून नव्हे तर शाश्वत वाढ आणि शहरी ओळखीच्या दिशेने एक पाऊल म्हणून पाहतो. सार्वजनिक पायाभूत सुविधा आणि शहरी परिवर्तनाशी सुसंगत उद्योगासाठी एक बेंचमार्क स्थापित क रून, या दृष्टिकोनाचा स्वीकार करणारा अर्काडे डेव्हलपर्स या क्षेत्रातील पहिला रिअल इस्टेट डेव्हलपर बनला आहे. ही भागीदारी शहरीकरणाच्या काळजीचे प्रतीक आहे जिथे मेट्रो स्टेशन केवळ ट्रान्झिट हब म्हणूनच नाही तर मुंबईत अभिमान, प्रगती आणि सामु दायिक सहभागाचे (Collective Participation) एक महत्त्वाचे ठिकाण म्हणून उभे राहते' आर्केड डेव्हलपर्सने गोरेगाव-मालाड पट्ट्यात त्यांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात समजली जाते. त्यांनी चार निवासी प्रकल्प आर्केड अ‍ॅडोर्निया, आर्केड अ‍ॅस्पायर,आर्केड सेरेन आणि आर्केड जयश्री पूर्ण केले आहेत. सध्याच्या प्रकल्पांमध्ये आर्केड व्ह्यूज, आर्केड व्हि स्टास आणि आर्केड ईडन यांचा समावेश आहे, येत्या काही महिन्यांत आणखी पाच प्रकल्प सुरू होणार आहेत. यावेळी कंपनीने आपल्या प्रसिद्धीपत्र कात,'मेट्रो स्टेशनचे नामांतर हा केवळ ब्रँडिंगचा मैलाचा दगड नाही तर शाश्वत, समावेशक शहरी विकासासाठी अर्काडेच्या दीर्घकालीन वचनबद्धतेचे प्रतीक आहे.' असे म्हटले आहे.आर्केड डेव्हलपर्स ही मुंबईतील एक आघाडीची लक्झरी रिअल इस्टेट डेव्हलपर आहे आणि ती बीएसई आणि एनएसई या दोन्ही एक्सचेंजेसमध्ये सूचीबद्ध आहे.अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय सं चालक अमित जैन यांच्या नेतृत्वाखाली,आर्केड डेव्हलपर्सने कंपनीने ३१ प्रकल्प पूर्ण केले आहेत आणि अधिकृत माहितीनुसार ५५०० हून अधिक घरे निर्माण केली आहेत.'कंपनीने ५.५ दशलक्ष चौरस फूट पेक्षा जास्त मालमत्ता विकसित केली आहे, तर अतिरिक्त २+ दशलक्ष चौरस फूट सध्या बांधकामाधीन आहे. आर्केड डेव्हलपर्सने आर्थिक वर्षाची सुरुवात चांगली केली असून, आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत एकूण महसुलात १६५ कोटींची वाढ नोंदवली आहे. कंपनीने विक्रीपूर्व (Pre Sales) मध्ये इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) वर (१७.१% नोंदवली असून ती १४२ कोटीवर पोहोचली. कलेक्शन (संकलनात) इयर ऑन इयर बेसिसवर ४१.८% वाढ नोंदवल्याने ते १७० कोटीवर पोहोचले आहे. या तिमाहीत त्यांचा निव्वळ नफा (Net Profit) २९ कोटी रूपये होता. निकाला दरम्यान कंपनीने १०% अंतरिम लाभांश (Interim Di vidend) जाहीर केला होता.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा