पुणे : दौंड तालुक्यातील यवत परिसरात पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर यवत पोलिस स्टेशन हद्दीत दोन कारची समोरासमोर धडक झाली. या अपघातात दोन तरुणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला आणि पाच जण गंभीर जखमी झाले.
लाल रंगाची स्विफ्ट कार आणि स्विफ्ट डिझायर कार यांची समोरासमोर धडक झाली. या अपघातात ज्ञानेश्वर विश्वनाथ थोरबोले (वय ५०, रा. उरुळी कांचन, ता. हवेली) आणि गणेश दोरगे (वय २८, रा. यवत, ता. दौंड) यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातात गंभीर जखमी झालेल्या पाच जणांना जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले आहे.
पोलिसांनी आरोपी राकेश भोसले याच्याविरुद्ध भादंवि कलम ३०४(अ), २७९, ३३७, तसेच मोटर वाहन कायदा १८४ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे. आरोपी बेदरकारपणे वाहन चालवत होता आणि यातूनच अपघात झाल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे.