आरबीआयच्या भाकीतालाही मागे टाकत अर्थव्यवस्था ६.८ ते ७.००% वेगाने वाढणार!

SBI Research Report कडून प्रसिद्ध झाली आकडेवारी


प्रतिनिधी: भारतीय अर्थव्यवस्था केवळ चालत नाही तर पळत असल्याचे नवीन एसबीआय अहवालात स्पष्ट झाले आहे. नव्या माहितीनुसार, पहिल्या तिमाहीत भारतीय अर्थव्यवस्थेने ६.८% ते ७% कदाचित वाढ नोंदवली आहे.एसबीआय शोध अहवाल (SBI Res earch Report) मधील माहितीनुसार, ही वाढ लक्षणीय आहे. विशेषतः आरबीआयच्या ६.५% वाढीच्या अनुमानापेक्षाही ही वाढ अधिक झाली आहे. रिपोर्टमध्ये म्हटल्याप्रमाणे, अर्थव्यवस्था ६.८% वाढताना सकल देशांतर्गत उत्पादन (GDP) मध्ये ६.९% वाढ झा ली आहे. तर ग्रॉस व्हॅल्यु अँडेड (GVA) ६.५% वर कायम आहे. या आर्थिक आधारीत कामगिरीवर एसबीआय रिसर्चच्या मते, आगामी जीडीपी दरात ६.९% इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) वाढ होऊ शकते.


या आर्थिक मॉडेलमध्ये मागील तिमाहीतील अंदाजाशी संलग्नच वाढ झाल्याचे अहवालात म्हटले आहे. 'सुरूवातीला पहिल्या तिमाहीत (Q1FY26) मध्ये ६.८ ते ७.००% जीडीपी वाढीचा अंदाज होता.' असे निरीक्षण अहवालात नोंदवण्यात आले होते. त्याला अनुसरू नच अर्थव्यवस्थेत ही वाढ कायम आहे. वेगवेगळ्या आर्थिक निकषांवर आधारित ही वाढ आहे.अर्थव्यवस्थेतील ही वाढ केवळ आर्थिक आकडेवारीवर नाही तर ही वाढ संतुलित,मध्यम वेगाने, व वातावरणाला साजेसे स्वरूप घेणारी ठरली गेल्याने या अर्थव्यवस्थेच्या ६.८% ते ७.००% वाढ ही मोठी समजली जाऊ शकते. मात्र संपूर्ण आर्थिक वर्ष २०२६ चा विचार केल्यास ही ६.३% वाढ वेगाने राहू शकते असे एसबीआय रिसर्चने म्हटले आहे. अहवालातील नोंदणीप्रमाणे आर्थिक वर्ष २०२६ मधील चौथ्या तिमाहीत वाढीचा वेग ०. २% मंदावू शकतो.


अहवालातील अतिरिक्त माहितीनुसार, रिअल व नॉमिनल (नाममात्र) मधील अंतरही आता कमी होत आहे. उदाहरणार्थ आर्थिक वर्ष २०२३ मध्ये हे अंतर १२% पूर्णांकाने होते ते आर्थिक वर्ष २०२५ मध्ये घसरून ३.४% अंतर उरले आहे. तरीसुद्धा, रिपोर्टमध्ये म्हट ल्याप्रमाणे, महागाई कमी राहणार असून ही दोन्ही जीडीपी मोजमापातील दरी आणखी कमी होऊ शकते. आर्थिक वर्ष २०२६ मध्ये नॉमिनल जीडीपी दर ८% घसरू शकतो. तर रिअल जीडीपी दर ६.८% ते ७.००% ब्रँकेटमध्ये राहण्याची शक्यता अहवालात अखे रीस नोंदवली गेली आहे.

Comments
Add Comment

अरे बापरे! देशभरात २२ बनावट विद्यापीठे

यूजीसीकडून देशातील २२ बनावट विद्यापीठांची यादी जाहीर नवी दिल्ली : विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) देशातील २२ बनावट

मुंबई मनपावर भगवा फडकवण्यासाठी शिवसेना-भाजपची मोर्चेबांधणी

समसमान जागांसाठी शिवसेना तर दीडशे प्लससाठी भाजप आग्रही मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या व्यासपीठावर मनोज जरांगे येणार का?

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे

Sanjay Shirsat : संजय शिरसाटांच्या मनात नेमकं चाललंय काय? निवृत्ती की राजकीय खेळी?

शिंदे गटाच्या आमदाराच्या निर्णयामागे कुटुंबातील 'नवे नेतृत्व' आणण्याची खेळी? मुंबई : राज्याचे समाजकल्याण

मंत्री नितीन गडकरी यांच्यासमोर दोन महिला अधिकाऱ्यांमध्ये खुर्चीवरून भांडण! नागपूरचे पोस्टमास्टर जनरलपद नेमके कुणाकडे?

एकीने दुसरीच्या अंगावर पाणी ओतलं, चिमटाही काढला नागपूर : नागपूरमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या

एल्फिन्स्टन पूल पाडण्यासाठी रेल्वेच्या मंजुरीची प्रतीक्षा, पश्चिम रेल्वेची अवाजवी मागणी!

मुंबई : वरळी-शिवडी उन्नत मार्गाच्या प्रकल्पासाठी एल्फिन्स्टन पुलावरील डांबरी थर काढण्याचे काम पूर्ण झाले असून,