
भारत संबंधांवर परिणाम होणार नसल्याची रशियाकडून हमी
मॉस्को : रशियाकडून भारताला मिळणाऱ्या कच्च्या तेलाची आयात रोखण्यासाठीच अमेरिकेने भारतावर आयातशुल्क लादले, अशी कबुली ट्रम्प प्रशासनाने दिल्यानंतर रशियाच्यावतीने यावर जोरदार प्रतिक्रिया देण्यात आली. रशियाचे राजदूत रोमन बाबुश्किन यांनी दिल्लीतील रशियन दूतावासात घेतलेल्या पत्रकार परिषदेत अमेरिकेवर टीका केली. तसेच भारत हा रशियाचा घनिष्ठ मित्र असल्याचे म्हटले.
तत्पूर्वी त्यांनी हिंदीतून पत्रकार परिषद सुरू केली. ज्याचा व्हिडीओ आता व्हायरल होत आहे. पत्रकार परिषदेची सुरुवात करत असताना बाबुश्किन पत्रकारांना उद्देशून म्हणाले, “शुरुवात करेंगे, श्री गणेश करते है…” बाबुश्किन यांनी अशा पद्धतीने बोलण्यास सुरुवात केल्यामुळे उपस्थितांनाही आश्चर्याचा धक्का बसला. त्यानंतर त्यांनी एका प्रश्नाला पुन्हा हिंदीतून चमत्कारीक उत्तर दिले. त्यामुळे पत्रकार परिषदेत एक वेगळाच उत्साह पाहायला मिळाला.
भारताच्या आर्यन डोमसाठी रशिया मदत करत राहणार का? असा प्रश्न एका पत्रकाराने विचारला होता. या प्रश्नाचे उत्तर देताना बाबुश्किन म्हणाले, “तुम्हाला सुदर्शन चक्र म्हणायचे आहे का? पुढच्या वेळी मला हिंदीत प्रश्न विचारा, मी त्याचे चांगले उत्तर देईल.”अमेरिकेने भारतावर आयातशुल्क लादण्याचा इशारा दिला असला तरी रशिया आणि भारताच्या संबंधावर याचा काहीही परिणाम होणार नाही.
रशियाचा भारताला तेलाचा पुरवठा करत राहिल, असे बाबुश्किन म्हणाले. आमच्याकडे एक विशेष यंत्रणा असून भारताला तेलाचा पुरवठा स्थिर राहिल, असे ते म्हणाले. बाबुश्किन पुढे म्हणाले, रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन हे वर्ष संपण्यापूर्वी नवी दिल्लीचा दौरा करण्याची शक्यता आहे. यावेळी ते पंतप्रधान नरेंद्र मोदींशी द्वीपक्षीय संबंधावर चर्चा करतील. मात्र या दौऱ्याची तारीख अद्याप निश्चित नाही.
अमेरिकेकडून भारताला इशारा दिला जात असताना बाबुश्किन यांनी हे भाष्य केले आहे. तसेच अमेरिकन प्रशासनाच्या दाव्यावर दुटप्पीपणाची टीका करताना बाबुश्किन म्हणाले, 'राष्ट्रीय हिताचा अनादर करून जे लोक इतरांवर निर्बंध लादत आहेत, त्याचा त्यांनाच फटका बसत आहे. रशियन कच्चे तेल विकत न घेण्याबाबत भारतावर टाकलेला दबाव अयोग्य आहे.'अमेरिकेच्या दाव्यावर दुटप्पीपणाची टीका करताना बाबुश्किन म्हणाले, 'राष्ट्रीय हिताचा अनादर करून जे लोक इतरांवर निर्बंध लादत आहेत, त्याचा त्यांनाच फटका बसत आहे.
रशियन कच्चे तेल विकत न घेण्याबाबत भारतावर टाकलेला दबाव अयोग्य आहे.' बाबुश्किन पुढे म्हणाले, 'रशिया भारताबरोबरच्या आपल्या धोरणात्मक भागीदारीला महत्त्व देतो आणि कोणत्याही आव्हानात्मक परिस्थितीत भारताच्या पाठिशी ठामपणे उभे राहण्याची खात्री देतो. जर भारतीय वस्तू अमेरिकेन बाजारपेठेत जाऊ शकत नसतील तर त्या रशियाकडे येऊ शकतात. भारत रशियासाठी खूप महत्त्वाचा आहे.”