
मोहित सोमण:आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकाची अखेर जवळपास सकाळच्या वाढीतील पातळीवरच झाली आहे. सेन्सेक्स १४२.८७ अंकाने वाढत ८२०००.७१ पातळीवर व निफ्टी ५० हा ३३.२० अंकांनी वाढत २५०८३.७५ पातळीवर स्थिरावला आहे. सकाळी सेन्सेक्स सुरूवातीलाच १३१.२२ अंकाने व निफ्टी २३.६५ अंकांने वाढला होता ज्याची पुनरावृत्ती शेअर बाजाराने केली. आज निफ्टीनेही आपली २५००० पातळी राखली आहे. हेवी वेट शेअर्समध्ये आलेल्या संमिश्र प्रतिसादासह मिडकॅप व स्मॉलकॅपमधील घसरणीने शेअर बाजारातील रॅली आज मर्यादित पातळीवर राहिली. दुसरीकडे बजाज फायनान्स, रिलायन्स इंडस्ट्रीज,आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक या हेवीवेट शेअर्समध्ये झालेल्या वाढीमुळे बाजार अखेर हिरव्या रंगात बंद झाले आहे.सेन्सेक्स बँक निर्देशांका त ७३.७९ अंकांने वाढ झाली असून बँक निफ्टीत ५६.९५ अंकांने वाढ झाली आहे. सेन्सेक्स मिडकॅप ०.१२% घसरण झाली असून स्मॉलकॅपमध्ये ०.०१% वाढ झाली आहे.निफ्टी मिडकॅपमध्ये व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे ०.३८%,०.०१% घसरण झाली आहे. निफ्टी क्षे त्रीय निर्देशांकात आज सकाळप्रमाणेच अखेरच्या टप्प्यापर्यंत संमिश्र प्रतिसाद कायम राहिला आहे. सर्वाधिक वाढ फार्मा (०.९५%), रिअल्टी (०.३८%), हेल्थकेअर (०.९३%), निर्देशांकात झाली आहे. सर्वाधिक घसरण एफएमसीजी (०.६४%), पीएसयु बँक (०.३७ %), कंज्यूमर ड्युरेबल्स (०.२२%), मिडस्मॉल फायनांशियल सर्व्हिसेस (१.१०%) निर्देशांकात झाली.
आज शेअर बाजारात युएस बाजारातील मंदीच्या संकेतानंतरही वाढ झाली होती. युएस बाजारातील बेरोजगारी आकडेवारी व महागाईतील अंतर वाढले असल्याचा युएस फेडरल बँकेच्या वित्तीय पतधोरण समितीच्या गव्हर्नरांच्या बैठकीत निष्कर्ष नोंदवला गेला. दु सरीकडे युएस प्रशासनाकडून फेडरल रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नर लिसा कूक यांच्यावर मॉर्टगेज फ्रोर्ड (Mortgage Fraud) म्हणत कूक यांच्यावर गंभीर आरोप केले होते. तसेच शासनाच्या नियामकांनी त्यांना राजीनामा देण्याची अथवा न दिल्यास हकालपट्टीची घो षणा केली. 'प्रामाणिकपणे सांगायचे तर, मला वाटते की तिला लवकर राजीनामा द्यावा लागेल' असे फेडरल हाऊसिंग फायनान्स एजन्सीचे संचालक बिल पुल्टे यांनी सीएनबीसीच्या 'मनी मूव्हर्स' कार्यक्रमात बोलताना कुक यांच्याविषयी हे उद्गार कुकबद्दल काढले होते.'मला वाटते की त्यांना राजीनामा द्यावा लागेल, अन्यथा त्यांना काढून टाकले जाईल' असे ते म्हणाले.
ट्रम्प यांनी न्याय विभागाला कुकची गुन्हेगारी चौकशी करण्यास सांगणाऱ्या पुल्टे यांनी पाठवलेल्या पत्रावर प्रतिक्रिया देताना सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले की गव्हर्नरने आता राजीनामा द्यावा. मात्र सडेतोड उत्तर देतानाच पुल्टेच्या ट्विटला उत्तर देताना कुक म्ह णाल्या की त्यांचा पद सोडण्याचा कोणताही विचार नाही. त्यामुळे अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेतील शीतयुद्ध आणखी पेटण्याची शक्यता आहे. युएस फेडरल बँकेचे गव्हर्नर जेरोमी पॉवेल यांनी पुन्हा एकदा 'आगामी' काळातील आकडेवारी व अर्थव्यवस्थेतील शक्यता पाळूनच पुढील निर्णय घेण्यात येईल असे त्यांनी आपल्या भाषणात नमूद केले. यापूर्वी ट्रम्प यांनी जेरोम पॉवेल यांची अनेकदा जाहीर खिल्ली उडवत त्यांना 'वेडा' देखील म्हटले होते. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी अनेकदा आपला दरकपातीचा तगादा लावून धरला असला तरी फेड बँकेच्या मते अमेरिकेतील सध्याची महागाई २% टार्गेटपेक्षा अधिक असल्याने वेट अँड वॉचचे धोरण अवलंबले जात शकते. त्यामुळे अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेतील घसरलेली स्थिती पाहिल्यानंतर गुंतवणूकदारांनी काल युएस शेअर बाजारात नकारात्मक कौल दिला होता.
दुसरीकडे जगभरात आज सोन्याच्या व चांदीच्या दरासह कच्च्या तेलाच्या निर्देशांकात मोठी वाढ झाली होती. वाढलेली मागणी, युएस बाजारातील सोन्याच्या साठ्यात घसरण झाल्याने स्पॉट बुकिंगमध्ये झालेली वाढ, ईटीएफ गुंतवणूक राखून वेट अँड वॉचचे धोरण, जागतिक फेड व्याजदरात कपातीबाबत अस्थिरता अशा अनेक कारणांमुळे या तिन्ही कमोडिटीत वाढ झाली होती. ज्याचा परिणाम आशियाई बाजारासह भारतीय बाजारातही पडला. त्यामुळे भारतीय सराफा बाजारात सोने चांदी महागली होती. सोन्याच्या जागति क निर्देशांकात संध्याकाळपर्यंत ०.४६% घसरण झाली आहे. कच्च्या तेलाच्या साठ्यातही घसरण होऊन मागणीत वाढ झाल्याने तेल आणखी महागले. संध्याकाळपर्यंत कच्च्या तेलाच्या WTI Futures निर्देशांकात ०.८८% वाढ झाली असून Brent Future निर्दे शांकात ०.९४% वाढ झाली आहे.
दुसरीकडे शेअर बाजारात प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने पंतप्रधानांनी घोषित केलेल्या जीएसटी दरकपातीचा फायदा होत आहे. सलग तीन दिवस बाजार उसळल्याने आज चौथा दिवशीही ही रॅली कायम राहिली आहे. बाजारातील सहभागी आता आगामी जॅक्स न होल परिसंवादावर लक्ष केंद्रित करत आहेत, जिथे शुक्रवारी फेडचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांचे भाषण संभाव्य दर कपातीबद्दल संकेत देण्याची अपेक्षा आहे. 'स्थानिक पातळीवर, धोरणात्मक समर्थन आणि मजबूत वापर सकारात्मक दृष्टिकोन टिकवून ठेवतात, ज री साप्ताहिक पर्यायांच्या समाप्तीमुळे जवळच्या काळात अस्थिरता येण्याची शक्यता आहे. तांत्रिकदृष्ट्या समर्थन (Technical Support) २४८५० वर आहे आणि प्रतिकार २५१५० पातळीवर आहे, ज्याची पातळी २५००० पातळीवरील आहे आणि बाजारातील भा वना टिकवून ठेवण्यासाठी ते महत्त्वाचे आहे 'असे तज्ञांनी यावेळी म्हटले आहे. निफ्टीतील पातळी २५००० वर राखली गेली असली तरी आज निफ्टीची विकली एक्सपायरी आहे. याशिवाय डॉलरच्या तुलनेत रुपयांच्या दरातही घसरण झाल्याने आज बाजाराला अपे क्षित सपोर्ट लेवल सोन्याच्या व चांदीच्या दरात मिळाली नाही.
याशिवाय बाजारातील मुख्य 'टिग्रर' म्हणजे, अपेक्षित असलेली जीएसटी सुधारणा आणि भारतासाठी एस अँड पीच्या रेटिंग अपग्रेडवरील आशावाद यांची परिणती वाढीत झाली. विमा प्रीमियमवर व आरोग्य विमावरील प्रिमियमवर जीएसटी सवलतीच्या संभाव्य क पातीच्या अहवालांवर विमा कंपन्यांनी तेजी दर्शविली असून वित्तीय शेअर्समध्ये वाढ झाली आहे. खासकरून सकाळी ०.५० ते १% पर्यंत घसरलेला अस्थिरता निर्देशांक (VIX Volatility Index) ३.५०% घसरल्याने बाजारातील निर्देशांकांना यांचा फायदा झाला. द रम्यान गेल्या आठवड्यात मोठ्या प्रमाणात विदेशी गुंतवणूकदारांनी आपली रोख गुंतवणूक काढली होती जी आजही कायम राहू शकते. दुसरीकडे शेअर बाजाराला अमेरिकेतील नाजूक स्थिती वाढलेली महागाई, तसेच वित्तीय तूट (Deficit) भरण्यासाठी यासाठी अमेरिकेला एक दिवस भारताची मदत लागेल हे स्पष्ट होत असल्याने पुन्हा एकदा टॅरिफची बोलणी पुढे प्रस्तावित होतील असे गुंतवणूकदारांना वाटते.
आज बीएसईतील ४२४८ समभागांपैकी २०९४ समभागात वाढ झाली असून २००० समभागात घसरण झाली आहे एनएसईत आज एकूण ३०६७ समभागापैकी १५०६ समभागात वाढ झाली असून १४७६ समभागात घसरणही झाली आहे. विशेषतः आज एनएसईत आज ९९ शेअर अप्पर सर्किटवर कायम असून ३५ शेअर लोअर सर्किटवर कायम राहिले आहेत. युएस बाजारातील सुरूवातीच्या कलात मोठी घसरण झाली आहे ज्याचा फटका भारतीय बाजारात बसेल हे पाहणेही महत्वाचे ठरेल. सुरूवातीच्या कलात डाऊ जो न्स (०.२८%), एस अँड पी ५०० (०.२४%), नासडाक (०.६७%) या तिन्ही बाजारात घसरण झाली आहे. तर सुरवातीच्या कलात युरोपियन बाजारातीलही तिन्ही एफटीएसई (०.२३%), सीएएसी (०.६३%), डीएएक्स (०.२४%) बाजारात घसरण झाली आहे. संध्याका ळपर्यंत आशियाई बाजारातील गिफ्ट निफ्टी (०.०१%) सह निकेयी २२५ (०.६२%), हेगसेंग (०.३९%), सेट कंपोझिट (०.२७%), जकार्ता कंपोझिट (०.६७%) बाजारात वाढ झाली असून शांघाई कंपोझिट (०.१३%), स्ट्रेट टाईम्स (०.२७%), तैवान वेटेड (१.४१%), को सपी (०.३७%) बाजारात वाढ झाली आहे.
आज अखेरच्या सत्रात सर्वाधिक वाढ नावा (१३.०४%), आयडीबीआय बँक (८.२३%), लेमन ट्री हॉटेल (६.९२%), तेजस नेटवर्क (६.७९%), पीजी इलेक्ट्रोप्लास्ट (४.०२%), ज्युपिटर वॅगन्स (४.०२%), स्विगी (३.४८%), न्यू इंडिया ॲशुरन्स (३.०२%), सिप्ला (३.०२ %), जे एम फायनांशियल (२.०८%), अनंत राज (२.६६%), आदित्य बिर्ला कॅपिटल (२.७७%), देवयानी इंटरनॅशनल (२.६३%), वेल्सस्पून (२.५७%), सिमेन्स (१.३३%), एल अँड टी टेक्नॉलॉजी (१.३२%), सोनाटा सॉफ्टवेअर (१.२९%), आयसीआयसीआय बँक(१ .०८%), बजाज फायनान्स (०.८८%), रिलायन्स इंडस्ट्रीज (०.८४%), एचडीएफसी बँक (०.१५%) समभागात झाली.
अखेरच्या सत्रात सर्वाधिक घसरण ओला इलेक्ट्रिक (८.२७%), बीएसई (७.५६%), एंजल वन (६.७३%), जे के सिमेंट (५.३७%), रेमंड लाईफस्टाईल (४.३६%), एमसीएक्स (३.६१%), एचएफसीएल (३.२८%), रेमंड (२.९४%), नेटवर्क १८ मिडिया (२.३९%), अ दानी गॅस (१.९७%), बजाज ऑटो (१.६२%), होडांई मोटर्स (१.५८%), टाटा कंज्यूमर (१.५६%), जिओ फायनांशियल सर्व्हिसेस (१.४०%), इंडसइंड बँक (१.३८%), बजाज हाउसिंग (१.२३%), डिक्सन टेक्नॉलॉजी (०.८९%), महानगर गॅस (०.७३%), टाटा स्टील (०.२५%) समभागात झाली.
आजच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना ज्येष्ठ बाजार विश्लेषक अजित भिडे म्हणाले आहेत की,'भारतातही महागाई आटोक्यात, त्यातच जीएसटी कपातीची दाट शक्यता आणि व्याज दरात कपातीची ही शक्यता बाजार पाॅझिटिव्ह ठेवत आ हे.जागतिक पातळीवर भारत नवीन मित्र व व्यवसाय करण्यासाठीचे पार्टनर शोधत आहे.रशियाशी,चीनशी व्यापार करार होत आहेत.तसेच युरोपीय काही देशांशी जोरदार चर्चा घडत आहेत.अमेरिकेच्या व्यापाराची तूट भरून काढण्यात भारताला नक्कीच यशमि ळेल हा भरवसा बाजाराला वाटत असल्यानेच बाजार आश्वस्त वाटत आहे.विदेशी गुंतवणूकदारांकडून होणारी विक्री थोडी कमी आहे. तरीही बाजार सावरत असल्याचे पहावयास मिळत आहे. रिलायन्स,एचडीएफसी बॅक, इतर बॅकांनी इंडेक्स स्थिर ठेवला आहे. टे क्स्टाईल संबंधित कच्चा मालावरील आयात कर कमी करणे वगैरे गोष्टींमुळे एकेक आश्वासक पावलं सरकार टाकत असल्यानेच बाजार पाॅझिटिव्ह रहाणार आहे हे स्पष्ट होत आहे.'
आजच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना जिओजित इन्व्हेसमेंट लिमिटेडचे हेड ऑफ रिसर्च विनोद नायर म्हणाले आहेत की,'भारतीय शेअर बाजार मिश्रित स्थितीत संपले, कारण अलीकडच्याच तेजीनंतर आणि पहिल्या तिमाहीच्या अखे रीस झालेल्या मंदावलेल्या उत्पन्नामुळे प्रीमियम मूल्यांकनाबद्दलच्या चिंतेमुळे गुंतवणूकदारांनी नफा बुकिंगकडे वळले. ऑगस्टमधील भारताचा विक्रमी उच्चांकी पीएमआय, जो उत्पादन आणि सेवांमध्ये, विशेषतः व्यावसायिक क्रियाकलापांमध्ये, मजबूत विस्तार दर्शवितो, नजीकच्या काळात स्थिरता प्रदान करू शकतो. शुक्रवारी होणाऱ्या जॅक्सन होल संगोष्ठी आणि जीएसटी सुसूत्रीकरणाच्या आसपासच्या वित्तीय चिंतेमुळे वाढत्या देशांतर्गत रोखे उत्पन्नापूर्वी गुंतवणूकदार सावध राहिले आहेत.'
आजच्या बाजारातील निफ्टी पोझिशनवर विश्लेषण करताना जिओजित एलकेपी सिक्युरिटीजचे वरिष्ठ तांत्रिक विश्लेषक रूपक डे म्हणाले आहेत की,' दिवसभर निफ्टी २५०५०- २५१५० पातळीच्या मर्यादित श्रेणीत व्यवहार करत होता, जे मर्यादित अस्थिरता दर्शवते. सकारात्मक भावना कायम राहिल्या आहेत, निर्देशांक अल्पकालीन मूव्हिंग सरासरीपेक्षा आरामात (एसएमए) वर आहे. दैनिक आरएसआय (Relative Strength Index RSI)तेजीच्या क्रॉसओवरमध्ये आहे आणि उच्च ट्रेंडिंग करत आहे. न कारात्मक बाजूने, समर्थन २४८०० पातळीवर ठेवले आहे. जोपर्यंत ही पातळी टिकून राहते तोपर्यंत बाय-ऑन-डिप्स धोरण प्रचलित राहण्याची शक्यता आहे. वरच्या बाजूने, २५२५० आणि २५५०० पातळीवर प्रतिकार (Resistance) दिसून येतो.'
आजच्या बाजारातील सोन्याच्या हालचालींवर भाष्य करताना एलकेपी सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष रिसर्च विश्लेषक जतीन त्रिवेदी म्हणाले आहेत की,'शुक्रवारी संध्याकाळी जॅक्सन होल येथे पॉवेल यांच्या भाषणाची बाजारपेठेत सहभागी झालेल्या सहभागीं नी वाट पाहत असताना सोन्याचे भाव एका श्रेणीत व्यवहार करत होते. COMEX वर सोन्याचे भाव $3338 च्या जवळपास आणि देशांतर्गत बाजारात ९९२५० दरपातळीच्या आसपास होते, जे मोठ्या प्रमाणात श्रेणीबद्ध सत्र दर्शवते. प्रमुख धोरण संकेतांपूर्वी गुंतव णूकदार सावध राहिले,बाजाराने फेडच्या दर कपातीबाबतच्या भूमिकेवर स्पष्टता शोधली. तांत्रिक आघाडीवर, तात्काळ आधार ९८५०० दरपातळीच्या जवळपास दिसत आहे, तर प्रतिकार १००००० रूपयांवर आहे, जो नवीन ट्रिगर्स येईपर्यंत एकत्रीकरण सूचित क रतो.'
आजच्या बाजारातील रुपयांच्या हालचालीवर भाष्य करताना एलकेपी सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष रिसर्च विश्लेषक जतीन त्रिवेदी म्हणाले आहेत की,'जीएसटी पुनर्रचनेला बाजारांनी प्रतिसाद दिल्याने रुपया ०.१७ ने कमकुवत होऊन ८७.२२ वर व्यवहार करत होता. २८% आणि १२% स्लॅब १८% आणि ५% पर्यंत कमी करण्याचा विचार करण्यात आला होता. मध्यम कालावधीत ही सुधारणा सकारात्मक असली तरी, उच्च जीएसटी असलेले क्षेत्र त्यांच्या खर्चाच्या संरचनांचे पुनर्मूल्यांकन करत असल्याने अस्थिरता वा ढली आहे. एफआयआयने त्यांचे शॉर्ट्स कायम ठेवले आणि भारतीय बाजारपेठेत निव्वळ विक्रेते राहिले, ज्यामुळे जवळच्या काळात पुनर्प्राप्ती मर्यादित झाली. तांत्रिकदृष्ट्या, रुपयाला मजबूत आधार ८७.५०-८७.७० पातळीच्या आसपास आहे, तर प्रतिकार ८६.८ ० च्या जवळ मर्यादित आहे आणि या पातळींपेक्षा कमी असलेला निर्णायक ब्रेक पुढील दिशात्मक हालचाली निश्चित करेल.'
यामुळे उद्याच्या बाजारातील निफ्टी क्षेत्रीय निर्देशांक, मिडस्मॉलकॅप मधील हालचाल, जीएसटीविषयी नवी घडामोड, नव्या जागतिक घडामोडी हे बाजारातील 'ट्रिगर' असतील तरी आगामी युएस बाजारातील आकडेवारी पुढील आठवड्याची दिशाही स्पष्ट करू श कते.