फ्लिपकार्टवर पोको एम७ प्‍लस ५जीच्‍या विक्रीला सुरूवात

मुंबई: पोको या भारतातील प्रसिद्ध ग्राहक तंत्रज्ञान ब्रँडने फक्‍त फ्लिपकार्टवर नवीन पोको एम७ प्‍लस ५जीच्‍या पहिल्‍या विक्रीला सुरूवात केली आहे. विशाल ७००० एमएएच सिलिकॉन-कार्बन बॅटरी, आकर्षक ६.९ इंच एफएचडी+ १४४ हर्ट्झ डिस्‍प्‍ले आणि कार्य क्षम स्‍नॅपड्रॅगन ६एस जेन ३ प्रोसेसर असलेला हा पॉवर-पॅक स्‍मार्टफोन १५००० रूपयांपेक्षा कमी किमतीत हा फोन ग्राहकांसाठी उपलब्ध झाला आहे. या स्‍मार्टफोनची सुरूवातीची किंमत ६ जीबी + १२८ जीबी व्‍हेरिएण्‍टसाठी १२९९९ रूपये आणि ८ जीबी + १२८ जीबी व्‍हेरिएण्‍टसाठी १३९९९ रूपये आहे.पोको एम७ प्‍लसच्‍या विक्रीला १९ ऑगस्‍ट दुपारी १२ वाजल्‍यापासून फक्‍त फ्लिपकार्टवर सुरूवात झालेली आहे.लाँच ऑफरचा भाग महणून ग्राहक एचडीएफसी, एसबीआय किंवा आयसीआयसीआय बँक कार्ड्सचा वापर करत १००० रूपयांच्‍या त्‍वरित बँक सूटचा किंवा पात्र डिवाईसेसवर १००० रूपयांच्‍या अतिरिक्‍त एक्‍स्‍चेंज बोनसचा लाभ घेऊ शकतात. ही ऑफर मर्यादित काळासाठी असणार असल्याचे कंपनीने लाँच दरम्यान स्पष्ट केले आहे.


फोनचे फिचर्स -


पोको एम७ प्‍लस ५जी २४ तास मनोरंजनासाठी डिझाईन


७००० एमएएच सिलिकॉन कार्बन बॅटरी जवळपास १६०० चार्ज सायकल्‍स देते, तसेच जवळपास ४ वर्षांपर्यंत टिकते आणि १८ वॅट रिव्‍हर्स चार्जिंग इतर डिवाईसेसना देखील चार्ज करते.


श्रेणीमधील सर्वात मोठ्या आकारापैकी एक ६.९ इंच एफएचडी+ डिस्‍प्‍लेसह १४४ हर्ट्झ रिफ्रेश रेट सहजपणे चित्रपट, गेमिंग व सोशल स्‍क्रॉलिंग फोनमध्ये उपलब्ध


दीर्घकाळपर्यंत टिकणारी कार्यक्षमता: स्‍नॅपड्रॅगन ६एस जेन ३ सह १६ जीबी टर्बो रॅम


दीर्घकाळापर्यंत टिकण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आला आहे: २ ओएस जनरेशन्‍स + ४ वर्षांचे सिक्‍युरिटी अपडेट्स, आयपी६४


फोनची विक्री १९ ऑगस्टपासून सुरू होईल. दोन प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. याशिवाय फोनमध्ये ऑक्टा-कोर स्नॅपड्रॅगन 6s Gen 3 SoC आहे, जो ८ जीबीपर्यंत रॅम आणि 128 जीबी स्टोरेजसह येतो. सुदैवाने, फोनमध्ये २TB पर्यंत स्टोरेज वाढवण्यासाठी मायक्रोएसडी स्लॉट देखील कंपनीने दिला आहे.


यात 50 MP चा प्रायमरी सेन्सर आणि एक अज्ञात सेकंडरी युनिटसह ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. तुम्हाला आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) डायनॅमिक शॉट, AI इरेजर आणि AI स्काय रिप्लेसमेंट सारखे काही AI फीचर्स मिळतात. फोन अँड्रॉइड १५-आधारित हायपर ओएससहित येतो. चार वर्षांच्या सुरक्षा पॅचसह (Security Update) सह दोन वर्षांचे OS अपडेट्स (OS Updates) मिळण्याचे आश्वासन कंपनीने दिले आहे. पोको डिव्हाइसवर Google Gemini देखील उपलब्ध असेल.

Comments
Add Comment

प्रख्यात शास्त्रीय गायक पंडित छन्नूलाल मिश्रा यांचे ९१ व्या वर्षी वाराणसीत निधन

वाराणसी: प्रख्यात पद्मविभूषण पुरस्कार विजेते शास्त्रीय गायक पंडित छन्नूलाल मिश्रा यांचे आज, २ ऑक्टोबर २०२५

अतिवृष्टी, पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ११ वी ऑनलाईन प्रवेशासाठी आणखी एक संधी

मुंबई : राज्यातील अतिवृष्टी व पूर परिस्थितीचा विचार करून विद्यार्थ्यांसाठी इयत्ता ११ वी ऑनलाईन प्रवेश

संघाच्या शिस्तबद्ध संचलनात मंत्री नितेश राणे सहभागी; स्वयंसेवकांसोबत साजरा केला विजयादशमी उत्सव

देवगड (जि. सिंधुदुर्ग) : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला १०० वर्ष पूर्ण झाल्याच्या ऐतिहासिक प्रसंगी मंत्री नितेश राणे

अभिषेक शर्माने रचला इतिहास! ICC T20I फलंदाजी क्रमवारीत आजवरचे सर्वोच्च रेटिंग

नवी दिल्ली: भारताचा युवा आणि स्फोटक सलामीवीर फलंदाज अभिषेक शर्मा याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC)

IND vs WI: भारत-वेस्ट इंडिज कसोटी मालिकेआधी टीम इंडियाला धक्का!

अहमदाबाद: वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याला सुरुवात होण्यापूर्वीच भारतीय संघाला मोठा धक्का बसला

नगरपरिषद, नगरपंचायतींच्या प्रारूप मतदार यादीची 8 ऑक्टोबरला प्रसिद्धी

मुंबई : राज्यातील 247 नगरपरिषदा व 42 नगरपंचायतींच्या सदस्यपदाच्या व थेट अध्यक्षपदाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठीची