नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लवकरच होणार सुरु, सिडको अधिकाऱ्यांची मोठी माहिती

बहुचर्चित नवी मुंबईत तयार होणारं आंतरराष्ट्रीय विमानतळ आता लवकरच सुरू होणार आहे. या विमानतळावरून सुरुवातीला जागेवरून आणि नंतर नावावरून मोठा गदारोळ निर्माण झाला होता. मात्र अखेर ऑक्टोबरमध्ये विमानतळाचं उद्घाटन होणार असून डिसेंबरमध्ये वाहतुकीसाठी हे विमानतळ सुरू होईल, अशी माहिती सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी बुधवारी दिली.


या विमानतळामुळे मुंबईसह कोकण आणि संपूर्ण महाराष्ट्रालाच मोठा फायदा होणार आहे. याआधी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ जून, आधी त्यानंतर सप्टेंबरमध्ये सुरू केलं जाईल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती. पण आता विमानतळाच्या उद्घाटनाची तारीख पुढे गेली असून ऑक्टोबरमध्ये शुभारंभ होण्याचं सांगण्यात आलं आहे. विमानतळाचं काम पूर्ण न झाल्याने याच्या उद्घाटनाचा मुहुर्त लांबणीवर गेला आहे.


नवी मुंबईतील हे विमानतळ व्यापारासाठी मोठं केंद्र ठरणार आहे. या विमानतळामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठी कनेक्टिव्हिटी वाढणार असून महाराष्ट्रात व्यापाराच्या नव्या संधी वाढून याचा फायदा होईल. केवळ राज्यासाठीच नाही, तर संपूर्ण देशासाठीही हे विमानतळा महत्त्वाचं ठरणार असल्याचं सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल म्हणाले.


विमानतळावर प्रवासी किंवा मालवाहतूक उड्डाणे सुरू करण्यासाठी नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाची परवानगी अत्यावश्यक असते. एरोड्रोम परवाना हा धावपट्टीची गुणवत्ता, सुरक्षा उपाययोजना, पायाभूत सुविधा, एअर ट्रॅफिक कंट्रोल सिस्टम, अग्निशमन व्यवस्था, सुरक्षा कर्मचारी, कस्टम्स व इमिग्रेशन तसेच पर्यावरणीय मानकांसाठी अधिकृत प्रमाणपत्र असते.


पुढील काही दिवसांत हे प्रमाणपत्र प्राप्त होईल. त्यानंतर ‘ऑपरेशनल रेडिनेस ॲण्ड एअरपोर्ट ट्रायल्स’ (ओआरएटी) प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी किमान एक ते दीड महिन्यांचा कालावधी आवश्यक असतो. त्यामुळे विमानतळाचे उद्घाटन ऑक्टोबरमध्ये होईल. त्यानंतर साधारण डिसेंबरच्या मध्यावर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून प्रवासी वाहतूक सेवा सुरू होईल, असा विश्वास सिंघल यांनी व्यक्त केला.

Comments
Add Comment

लातूर जिल्ह्यात भीषण अपघातात वाघोली येथील बहिण-भावाचा जागीच मृत्यू

लातूर : लातूर जिल्ह्यातील राष्ट्रिय महामार्गावर भीषण अपघातात बहिण-भावाचा जागीच मृत्यू झाला आहे.औसा–निलंगा

पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत विमानतळाचे होणार उद्घाटन; नवी मुंबईत वाहतुकीत बदल

रायगड : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी नवी मुंबई

शेतकऱ्यांसाठी मंत्री महाजनांचा मोठा निर्णय, सुपूर्द केला वर्षभराचा ‘पगार’

जळगाव : मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी’साठी मंत्री गिरीश महाजन यांनी

अमरावती महानगरपालिकेला ई-बस डेपो-व चार्जींग सुविधेसाठी बडनेरा येथील जमीन

अमरावती : अमरावती महापालिकेला केंद्र शासन पुरस्कृत पी.एम.ई बस योजनेतून मिळालेल्या ई-बस डेपो व चार्जींग

दिवाळीच्या सुट्टीत फिरण्याचे नियोजन करताय ? 'या' चार जागांना नक्की भेट द्या

मुंबई : पावसाळ्यातली हिरवळ अनुभवल्यानंतर आता गुलाबी थंडीची चाहुल सर्वांना लागली आहे. त्यामुळे छान थंड हवेच्या

अतिवृष्टीग्रस्तांसाठी मुख्यमंत्र्यांकडून तब्बल ३१,६२८ कोटींची मदत; २५३ तालुक्यांना सरसकट मदत देणार

'खरडून गेलेल्या जमिनीला' मिळणार हेक्टरी ३.४७ लाखांची मदत; शेतकरी, घरे आणि जनावरांसाठी भरीव निधी मुंबई: