Morning Update: शेअर बाजारात वाढ कायम, सेन्सेक्स १३१.२२ व निफ्टी २३.६५ अंकाने उसळला अस्थिरता निर्देशांकातही 'स्थिरता'

मोहित सोमण: आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात सकाळच्या सत्रात वाढ झाली आहे. प्रामुख्याने जागतिक बाजारपेठेतील मंदीची शक्यता वर्तविण्यात आल्यानंतरही भारतीय शेअर बाजारात वाढ झाली आहे. विशेषतः अस्थिरता निर्देशांक आटोक्यात राहिल्याने बाजारातील ब्लू चिप्स कंपनीच्या स्क्रिपमध्येही त्याचा परिणाम होईल. सकाळच्या सत्रात सुरूवातीलाच सेन्सेक्स १३१.२२ अंकाने वाढला असून निफ्टी २३.६५ अंकाने वाढला आहे. ही वाढ प्रामुख्याने मजबूत अर्थव्यवस्थेमुळे तसेच कालच्या आशियाई बाजारातील मोठ्या वाढीनंतर झाली आहे. सेन्सेक्स बँक निर्देशांकात १००.१७ अंकांची व बँक निफ्टीत १०.३० अंकांची वाढ झाली आहे. सेन्सेक्स मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे ०.१३%,०.२४% वाढ झाली आहे. निफ्टी मिडकॅपमध्ये ०.०१% घसरण झाली असून स्मॉलकॅप मध्ये ०.३१% वाढ झाली आहे.बेंचमार्क निर्देशांकात वाढ झाली असली तरी निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकात सकाळच्या सत्रात संमि श्र प्रतिसाद मिळाला.ज्यामुळे शेअर बाजारात परवाप्रमाणे मोठी रॅली सकाळच्या सत्रात झाली नाही. सर्वाधिक वाढ तेल व गॅस (०.६२%), रिअल्टी (०.८५%), फायनांशियल सर्व्हिसेस एक्स बँक (०.३१%) समभागात वाढ झाली आहे. तर सर्वाधिक घसरण मिडिया (०.७०%), आयटी (०.५४%), एफएमसीजी (०.४०%), फार्मा (०.२०%) समभागात घसरण झाली आहे.


काल युएस प्रशासनाबरोबर सांख्यिकी विभागासह फेडचे खटके उडण्यास सुरूवात झाल्याने चित्र निर्माण झाले होते. अर्थतज्ज्ञांनी अमेरिकेतील अर्थव्यवस्थेतील नाजूक स्थितीमुळे पुन्हा २००८ नंतर एकदा जागतिक मंदीकडे वाटचाल करत असल्याचे म्हटले होते. काल युएस फेडरल रिझर्व्ह बँकेच्या प्रातिनिधिक स्वरूपात बैठक झाली होती. ज्यामध्ये बहुमताने चिंता व्यक्त केली गेली. लेबर मार्केटमध्ये वाढलेल्या रोजगार आकडेवारीपेक्षा महागाई दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे गव्हर्नर शिष्टमंडळाने म्हटले होते. फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपात करण्यासंबंधीची पडताळणी बैठक काल पार पडली. ज्यामध्ये नोंदवलेल्या बैठकीतील मिनिट्समध्ये हे वक्तव्य केले गेले आहे. फेड बँकेच्या २% टार्गेटपेक्षाही अधिक महागाई वाढत असल्याने अमेरिकेतील मंदीत भर पडू शकते. दुसरी कडे युएस राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ निर्णयाचा फटका अमेरिकेतील घरगुती उत्पादनांसहित आयाती वस्तूवर पडू शकतो असे अमेरिकेतील विश्लेषकांनी म्हटले आहे. यानंतर युएस बाजार मोठ्या प्रमाणात कोसळून लाल रंगात बंद झाले ज्यामध्ये नास डाक (०.६७%) घसरला असून एस अँड पी ५०० (०.२४%), डाऊ जोन्स (०.०३%) कोसळला होता.


दुसरीकडे काल आशियाई बाजारात वाढ झाली होती. आज सकाळच्या सत्रातील सुरुवातीच्या कलात गिफ्ट निफ्टी (०.०६%),स्ट्रेट टाईम्स (०.१७%), तैवान वेटेड (१.१६%), कोसपी (०.७६%), शांघाई कंपोझिट (०.३५%) बाजारात वाढ झाली आहे. तर निकेयी २२ ५ (०.६४%), हेंगसेंग (०.३१%), जकार्ता कंपोझिट (०.५०%) बाजारात घसरण झाली आहे. दुसरीकडे ऑनलाईन मनी गेमिंगवर बंदी हटवण्याची मागणी संबंधित कंपन्यांनी केली असली तरी तूर्तास या कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण अपेक्षित आहे.दुसरीकडे रिलायन्सचे शेअर्सही नवीन ए आय तंत्रज्ञान विकसित केल्याच्या बातमीनंतर फोकस मध्ये असतील. जीएसटी कपात आता आरोग्य, आयु विमा क्षेत्रातही होणार असल्याने बाजारात गुंतवणूकदारांचे मनोबल वाढले. गेल्या दोन दिवसांपासून जाहीर होत असलेल्या ति माही निकालांच्या सकारात्मक पार्श्वभूमीवर ही वाढ झाली. गेल्या ५ दिवसात सलग वाढ बाजारात झाल्याने मागच्या महिन्यातील शेअर बाजारातील नुकसान भरून काढण्यासाठी आयती संधी गुंतवणूकदारांना मिळाली. सोन्याच्या घसरणीकडेही बघताना आज मा त्र सोन्यात सकाळच्या सत्रात जागतिक स्तरावर वाढ झाली आहे. ही वाढ प्रामुख्याने डॉलरमध्ये ०.०८% झालेली वाढ,जागतिक अस्थिरता या कारणामुळे झाली.भारतीय बाजारपेठेतही आज सकाळी सोन्याच्या निर्देशांकासह किंमतीत मोठी वाढ झाली आहे.कच्च्या तेलाच्या किंमतीतही मोठी वाढ झाली आहे. युएस कच्च्या तेलाच्या साठ्यात घसरण झाल्यानंतर स्पॉट बाजारात मोठी मागणी वाढली ज्याचा फटका तेलाच्या निर्देशांकासह बाजारात झाला. मुख्यतः हेवी वेट शेअर रिलायन्स इंडस्ट्रीज, टाटा मोटर्स, टाटा स्टील, बजा ज फायनान्स अशा शेअर्समध्ये वाढ झाल्याने बाजाराला फायदा झाला असला तरी एचडीएफसी, विप्रो, इन्फोसिस यांसारख्या शेअर्समध्ये झालेल्या घसरणीचा फटकाही निर्देशांकात बसला. सकाळच्या सत्रात अस्थिरता निर्देशांक (VIX Volatility Index) ०.४७% घसरल्याने बाजारातील स्थिरता कायम आहे.


सकाळच्या सत्रात सर्वाधिक वाढ ज्युपिटर वॅगन (१०.४७%), हॅपीअस्ट माईंड (६.८१%), न्यू इंडिया ॲशुरन्स (६.४२%), जीएमडीसी (५.५०%,), इंडिया सिमेंट (२.९३%), रिलायन्स इंडस्ट्रीज (१.१३%), टाटा मोटर्स (०.४०%), बजाज फायनान्स (०.३६%) समभा गात झाली आहे. सकाळच्या सत्रात सर्वाधिक घसरण क्लीन सायन्स (६.४६%), ओला इलेक्ट्रिक (५.२६%), रेमंड (१.६९%), वेलस्पून लिविंग (१.४२%), इंटरग्लोब एव्हिऐशन (१.३६%), कोफोर्ज (१.३२%), नेस्ले इंडिया (१.२९%), टाटा कंज्यूमर (१.२२%) , बजाज ऑटो (०.६१%), इन्फोसिस (०.५३%) समभागात झाली आहे.


आजच्या बाजारातील सुरूवातीच्या कलांवर विश्लेषण करताना जिओजित इन्व्हेसमेंट लिमिटेडचे मुख्य गुंतवणूक रणनितीकार डॉ वी के विजयाकुमार म्हणाले आहेत की,'अमेरिकेतील घसरणीच्या तुलनेत भारतातील बाजारातील स्थिरवाढ ही बाजा रपेठेतील एक मनोरंजक ट्रेंड आहे.अमेरिकेतील संभाव्य वाढत्या महागाईच्या चिंतेचा तेथील बाजारावर परिणाम होत असताना,भारतातील धाडसी सुधारणा उपक्रम आणि बाजारात सतत येणारा पैसा प्रवाह बाजाराला लवचिकता देत आहेत. भारतातील किरकोळ महागाई अपेक्षेपेक्षा खूपच कमी राहिल्याने (जुलैमध्ये १.५५%), वाढत्या जागतिक अनिश्चिततेच्या संदर्भात आरबीआय सावधगिरी बाळगत असला तरी, एमपीसीकडून लवकरच आणखी एक दर कपात शक्य आहे. गुंतवणूकदारांना या बाजारपेठेतील मूल्यांकनांब द्दल सतर्क राहावे लागेल.अनेक अडचणी असूनही, मूल्यांकने जास्त आहेत. बीएसई ५०० पैकी २१५ स्टॉक ५० च्या वर पीईवर व्यवहार करत आहेत. लार्जकॅप मूल्यांकने जरी जास्त असली तरी, भारताच्या दीर्घकालीन वाढीच्या क्षमतेमुळे योग्य आहेत. अनेक मिड कॅप्सना मजबूत वाढीचा आधार आहे. परंतु स्मॉलकॅप्सना जास्त मूल्य आहे आणि म्हणूनच ते धोकादायक आहेत. गुंतवणूकदारांना हा फरक करावा लागतो.'


दुसरीकडे निफ्टी पोझिशनवर भाष्य करताना जिओजित इन्व्हेसमेंट लिमिटेडचे मुख्य गुंतवणूक रणनितीकार आनंद जेम्स म्हणाले आहेत की,'कालच्या चढउतारांमध्ये २५०९६ पातळीपर्यंत पोहोचण्याच्या जवळ येण्याची शक्यता कमी झाली, कालच्या पहिल्या वरच्या उद्दिष्टाच्या (Upper Target) जवळ... आपण वरच्या बोलिंगर बँडच्या जवळ आलो आहोत, त्यामुळे एकत्रीकरणाची अपेक्षा करण्याचे आणखी एक कारण आहे, ज्यामुळे २५१५६-२५२०० उद्दिष्टांच्या पूर्ण साध्यतेबद्दल शंका निर्माण होतात. घसरण होण्याची शक्यता कमी आहे, परंतु आणखी एक वरच्या दिशेने प्रयत्न करण्यापूर्वी २५०००-२४९७७ किंवा त्यापेक्षा कमी होण्याची अपेक्षा असू शकते.'


यामुळे आज क्षेत्रीय निर्देशांकातही जागतिक पातळीवरील धोरणात्मक निर्णयासह भारतीय बाजारातील मॅक्रो इकॉनॉमीतील घडामोडीचा परिणाम बाजारात अपेक्षित आहे. तसेच नव्या जीएसटी कपातीच्या घोषणेनंतर बाजारातील वाढीचा ट्रिगर आजही कायम राहू शकतो.भारतीय गुंतवणूकदारांनी आपल्या गुंतवणूकीत वाढ केली व परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार (FII) यांनी कमी प्रमाणात गुंतवणूक काढून घेतल्यास बाजाराला आजही सपोर्ट लेवल अपेक्षित आहे.नाहीतर आजही बँक निर्देशांकातील कामगिरीसह आयटी, तसेच मिडस्मॉलकॅपमधील कामगिरीही शेअर बाजाराच्या दृष्टीने महत्त्वाची ठरेल.

Comments
Add Comment

TCS Q2 Results: जागतिक अस्थिरतेही Tata Consultancy Services आर्थिक निकाल सकारात्मक कंपनीच्या एकत्रित नफ्यात 'इतक्याने' वाढ

प्रतिनिधी:देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी टीसीएसने (Tata Consultancy Services Limited) आपला आर्थिक वर्ष २०२६ दुसरा तिमाही निकाल जाहीर

RBI : RBIचा जबर धक्का! 'या' मोठ्या बँकेचा परवाना रद्द, ठेवीदारांना फटका!

सातारा : भारताची मध्यवर्ती बँक असलेल्या भारतीय रिझर्व्ह बँकेने पुन्हा एकदा बँकिंग नियमांचे उल्लंघन करणाऱ्या

Stock Market Marathi News: मेटल, फार्मा, आयटी, हेल्थकेअर शेअरसह मिडकॅप व लार्जकॅप शेअर्समध्ये उसळी 'या' कारणामुळे सेन्सेक्स ३९८.४४ व निफ्टी १३५.६५ अंकाने उसळला!

मोहित सोमण: मिडकॅप व लार्जकॅपमध्ये झालेल्या रॅलीमुळे आज शेअर बाजारात वाढ झाली आहे. विशेषतः मेटल, फार्मा, आयटी,

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना धक्का! ‘ती’ अट ठरतेय अडचणीची; दिवाळीत पैसे मिळणार की नाही?

मुंबई : महाराष्ट्रातील महिलांसाठी सुरू असलेल्या 'लाडकी बहीण योजने'च्या लाभार्थ्यांसाठी आता एक मोठी अडचण निर्माण

GST benefits on Classic Legend Java Yezd Bike: जावा, येझदी मोटारसायककडून जीएसटी दर कपात फायदा ग्राहकांकडे पास

क्लासिक लेजेंड्स कंपनीने देशभरातील ४५० हून अधिक केंद्रांवर विक्री आणि सेवांचा केला विस्तार प्रतिनिधी:जवळजवळ

Tata Breaking News: टाटा कंज्यूमर प्रोडक्ट उत्पादनावर महाराष्ट्रात वितरकांचा बहिष्कार १३ ऑक्टोबरपासून असहकार सुरू होणार !

प्रतिनिधी:टाटा कंज्यूमर प्रोडक्ट (Tata Consumer Products) कंपनी विरोधात वितरकांनी असहकार चळवळ करण्याचे ठरवले आहे. त्यासाठी