Tuesday, October 28, 2025
Happy Diwali

काजोलचा हॉरर चित्रपट ‘माँ’ आता ओटीटीवर; या दिवशी पाहता येणार

काजोलचा हॉरर चित्रपट ‘माँ’ आता ओटीटीवर; या दिवशी पाहता येणार

मुंबई : अभिनेत्री काजोलचा हॉरर आणि पौराणिक थ्रिलर चित्रपट ‘माँ’ आता प्रेक्षकांना घरबसल्या पाहता येणार आहे. २७ जून रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर दाखल होत आहे. नेटफ्लिक्स इंडियाने जाहीर केल्यानुसार, हा चित्रपट २२ ऑगस्ट पासून स्ट्रीमसाठी उपलब्ध होईल.

विशाल फुरिया दिग्दर्शित हा काजोलचा पहिलाच हॉरर चित्रपट आहे. थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यावर या चित्रपटाला प्रेक्षक आणि समीक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळाला होता. ५० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ३६.०८ कोटी रुपयांची कमाई केली होती.

‘माँ’ चित्रपटाची कथा अंबिका (काजोल) नावाच्या महिलेभोवती फिरते, जिचा पती एका अलौकिक घटनेमुळे मरण पावतो. त्यानंतर ती आपल्या मुलीसोबत आपल्या मूळ गावी परत येते, जिथे त्यांना एका राक्षसी शापाचा सामना करावा लागतो. या चित्रपटामध्ये काजोलच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले आहे. ‘माँ’ मध्ये काजोलसोबत इंद्रनील सेनगुप्ता, रोनित रॉय आणि खेरिन शर्मा यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाची निर्मिती अजय देवगण, ज्योती देशपांडे आणि कुमार मंगत पाठक यांनी केली आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >