Saturday, August 30, 2025

गाझा पट्टीत इस्रायलचे सैनिक, गाझा ताब्यात घेणार

गाझा पट्टीत इस्रायलचे सैनिक, गाझा ताब्यात घेणार

गाझा : इस्रायलच्या सैन्य तुकड्या गाझा पट्टीत घुसू लागल्या आहेत. शक्य तितक्या लवकर संपूर्ण गाझा पट्टी ताब्यात घेण्यासाठी इस्रायलने वेगाने कारवाई सुरू केली आहे. इस्रायलच्या लष्कराचे मुख्य प्रवक्ते ब्रिगेडियर जनरल एफी डेफ्रिन यांनी युद्धाचा पुढचा टप्पा सुरू झाल्याची आणि सैन्य गाझा शहराच्या बाहेर पोहोचले असल्याची माहिती दिली. हजारो रहिवाशांना दक्षिण गाझा येथे हलवण्याची तयारी सुरू आहे. इस्रायलच्या या हालचालींमुळे जागतिक पातळीवर चिंता वाढली आहे. पॅलेस्टाईनचे अस्तित्व संकटात सापडल्याची चर्चा सुरू झाली आहे.

इस्रायल आणि हमास यांच्यात २२ महिन्यांपासून सुरू असलेला संघर्ष संपवण्यासाठी इजिप्त मध्यस्ती करण्यास इच्छुक होता. पण ही मध्यस्ती होण्याआधीच इस्रायलने गाझामध्ये सैनिक पाठवले आहेत. हमास या अतिरेकी संघटनेचा बीमोड करण्यासाठी जास्त वेळ देऊ शकत नाही, तातडीने कारवाई सुरू करा, असे निर्देश इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी दिले. यानंतर इस्रायलच्या सैन्याने वेगाने हालचाली सुरू केल्या आहेत.

उत्तर गाझामधील सर्वात मोठे शहर ताब्यात घेण्यासाठी इस्रायलच्या लष्कराने ६० हजार राखीव सैनिक तैनात करण्याचे आदेश दिले आहेत. या व्यतिरिक्त इस्रायलने २० हजार अतिरिक्त सैनिकांचा सेवा कालावधी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे लष्करी कारवाईसाठी मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ उपलब्ध होणार असल्याचे इस्रायलकडून सांगण्यात आले.

Comments
Add Comment