Tuesday, October 28, 2025
Happy Diwali

स्मार्टफोन निर्यातीत भारताने चीनलाही मागे टाकले !

स्मार्टफोन निर्यातीत भारताने चीनलाही मागे टाकले !

कॅनालायीस अहवालातील माहिती समोर

प्रतिनिधी: अमेरिकेला स्मार्टफोन निर्यातीत भारताने चीनलाही मागे टाकले आहे. असा अहवाल कॅनालायीस (Canalys) रिसर्च कंपनीने प्रसिद्ध केला आहे. आपल्या सोशल मिडिया पोस्टमध्ये ही संबंधित नवी माहिती दिली आहे. पोस्टनुसार, मेक इन इंडिया, पीए लआय (Production Linked Incentive PLI) सारख्या योजनांच्या पाठबळामुळे ही वाढ झाली आहे. एप्रिल ते जून महिन्यात चीनलाही स्मार्टफोन निर्यातीत मागे टाकण्यात आल्याचा दावा अहवालात केला गेला आहे.अहवालातील माहितीवर, मेड इन इंडियात उत्पादन वाढीचा फायदा निर्यातीत झाला. ज्यामुळे प्रत्यक्षात एप्रिल ते जून २०२५ मध्ये युएसमध्ये आयातीतील भारतीय शिपमेंटमध्ये ४४% वाढ झाली आहे. याचवेळी चीनच्या अमेरिकेतील स्मार्टफोन निर्यातीत ६१% टक्के घसरण झाली आहे ‌जी पूर्वी २५% मागील वर्षाच्या तिमाहीत होती. भारतीय स्मार्टफोन निर्यातीत मागील वर्षाच्या तिमाहीतील तुलनेत मात्र १३% वाढ झाली आहे.

भारतीय इलेक्ट्रॉनिक्स उद्योगातील भरीव कामगिरीचा परिणाम म्हणून मोठ्या प्रमाणात स्मार्टफोन निर्यातीचा व्यापार भारतात वाढला आहे. गेल्या चार वर्षांत स्मार्टफोन निर्यातीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने सरकारच्या पीएलआय, सब्सिडी अशा योजनांमुळे निर्यातीत वाढ होत असल्याचे याआधीही स्पष्ट झाले होते. मागील महिन्यात इलेक्ट्रॉनिक्स व आयटी मंत्रालयाने या वाढीचा विस्तृत प्रगतीचा आलेख आपल्या अभ्यास अहवालात छापला होता. त्यामुळे कॅनालायीस रिसर्च कंपनीच्या रिसर्चमुळे ही निर्यातीतील वाढ भविष्यातही होऊ शकते हे अधोरेखित झाले‌. आर्थिक वर्ष २०१४- २०१५ व आर्थिक वर्ष २०२४-२५ या दरम्यान भारतीय औद्योगिक क्षेत्रातील इलेक्ट्रॉनिक्स व मोबाईल उत्पादनात विशाल परिवर्तन (Transformation) झाले होते.

केवळ मोबाईलचा विचार केल्यास, स्मार्टफोन उत्पादन १८००० कोटींवरून ही निर्यात ५.४५ लाख कोटींवर पोहोचले होते. स्मार्टफोन निर्यातीतही १५०० कोटींवरून वाढ होत २ लाख कोटी मुल्यांकनावर वाढ झाली आहे. एकूणच इलेक्ट्रॉनिक्स वस्तू उत्पादन श्रेणीत १.९ लाख कोटीवरून ५.४५ लाख कोटींपर्यंत वाढ झाली आहे. मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार मोबाईल युनिट उत्पादनात तब्बल १५०% वाढ गेल्या १० वर्षात झाली. आर्थिक वर्ष २०१४-२०१५ मध्ये सरकारी आकडेवारीनुसार भारतात ७५% स्मार्टफोन आयात केले जात होते आता आर्थिक वर्ष २०२४-२०२५ कालावधीत केवळ मोबाईल आयात ०.०२% वर कायम आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >