
मुंबई: ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह-नक्षत्रांच्या स्थितीनुसार व्यक्तीच्या आयुष्यात अनेक बदल घडत असतात. सुख, समृद्धी, प्रेम आणि वैवाहिक जीवनाचा कारक ग्रह मानला जाणारा शुक्र ग्रह, २१ ऑगस्ट, २०२५ रोजी मिथुन राशीतून बाहेर पडून कर्क राशीत प्रवेश करणार आहे. शुक्र १५ सप्टेंबर २०२५ पर्यंत याच राशीत राहील. या राशी परिवर्तनाचा परिणाम सर्व १२ राशींवर होणार असला तरी, काही राशींसाठी हा काळ विशेषतः शुभ फलदायी ठरू शकतो.
मेष रास (Aries)
मेष राशीच्या लोकांसाठी शुक्राचे हे राशी परिवर्तन अत्यंत फायदेशीर ठरू शकते. तुमच्या कौटुंबिक जीवनात सुख-शांती नांदेल. घर आणि कुटुंबाशी संबंधित काही महत्त्वाच्या कामांमध्ये यश मिळेल. मालमत्ता खरेदी किंवा नवीन वाहन खरेदीचा योग आहे. नोकरी आणि व्यवसायात प्रगतीचे योग असून, आर्थिक स्थिती मजबूत होईल. अचानक धनलाभाची शक्यता आहे.
कन्या रास (Virgo)
कन्या राशीच्या लोकांसाठी शुक्राचे हे गोचर लाभदायक ठरेल. करिअरमध्ये प्रगती होईल आणि नवीन संधी मिळतील. व्यावसायिकांना चांगला नफा होईल. सामाजिक आणि व्यावसायिक क्षेत्रात तुमचा मान-सन्मान वाढेल. नवीन लोकांशी संबंध प्रस्थापित होतील, जे भविष्यात फायदेशीर ठरतील. आर्थिक आवक वाढेल.
धनु रास (Sagittarius)
धनु राशीसाठी हा काळ खूपच शुभ सिद्ध होईल. तुमच्या व्यावसायिक जीवनात मोठे बदल घडू शकतात. उद्योजकांना अपेक्षित यश मिळेल. कर्जमुक्तीचे योग आहेत आणि पैशांची आवक वाढेल. कुटुंब किंवा मित्रांसोबत सहलीचे नियोजन करू शकता. गुंतवणूक करण्यासाठी हा काळ चांगला आहे. वैवाहिक आणि प्रेम जीवनात गोडवा वाढेल.