
‘कंतारा चैप्टर १’ या चित्रपटातून गुलशन देवय्या यांचा पहिला लूक प्रदर्शित झाला आहे. ते या चित्रपटामध्ये कुलेशेखरची भूमिका साकारणार आहेत. हा चित्रपट २०२२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ब्लॉकबस्टर ‘कंतारा’चा प्रीक्वल असून दिग्दर्शनाची धुरा पुन्हा एकदा ऋषभ शेट्टी यांनी सांभाळली आहे. ते स्वतःचं केंद्रस्थानी असलेलं पात्र या भागातही जिवंत करताना दिसणार आहेत. हा चित्रपट २ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट कन्नड, तेलुगू, हिंदी, तमिळ, मल्याळम, बंगाली आणि इंग्लिश अशा अनेक भाषांमध्ये एकाचवेळी प्रदर्शित होणार असून त्याची पोहोच आणखी विस्तृत होणार आहे.
पहिल्या भागात लोककथा, श्रद्धा आणि मानवी भावना यांचा सुंदर मिलाफ दाखवण्यात आला होता, तर ‘कंतारा चैप्टर १’ या प्रीक्वलमधून त्या कथानकाच्या मुळांपर्यंत पोहोचत अधिक गहन भावना उलगडल्या जाणार आहेत. गुलशन देवय्या यांचा कुलेशेखर या भूमिकेतील लूक पाहताच प्रेक्षकांची उत्सुकता अधिकच वाढली आहे.