Thursday, August 21, 2025

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा समारोप

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा समारोप

लोकसभेत १२ तर राज्यसभेत १५ विधेयके मंजूर

महिनाभरात फक्त ३७ तास चर्चा

नवी दिल्ली : महिनाभर चाललेल्या अधिवेशनात लोकसभेने १२ आणि राज्यसभेने १५ विधेयके मंजूर केली. वारंवार व्यत्यय, तहकूब आणि बहिष्कार सत्र सुरूच राहिले. शेवटच्या दिवसाच्या कामकाजादरम्यान, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला म्हणाले की, सभागृहात १२० तासांच्या चर्चेचा वेळ निश्चित करण्यात आला होता, त्यामुळे केवळ ३७ तासांची चर्चा होऊ शकली. यामुळे लोकसभा अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आली.

२१ जुलै रोजी हे अधिवेशन सुरू झाले. दोन्ही सभागृहांमध्ये ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेव्यतिरिक्त, या अधिवेशनात फारच कमी काम झाले.

लोकसभेत फक्त ५५ प्रश्नांची उत्तरे देण्यात आली

अध्यक्ष ओम बिर्ला म्हणाले की या अधिवेशनात ४१९ प्रश्न विचारण्यात आले. त्यापैकी ५५ प्रश्नांची उत्तरे देण्यात आली. विरोधी पक्षाचे खासदार बिहार एसआयआरवर चर्चेची मागणी करत राहिले. त्यांच्या विरोधामुळे आणि गदारोळामुळे शेवटच्या दिवशीही दोन्ही सभागृहात कामकाज होऊ शकले नाही. लोकसभेचे कामकाज दुपारी १२ वाजता पुन्हा सुरू झाले. पंतप्रधान मोदी देखील सभागृहात पोहोचले. दरम्यान, विरोधकांनी एसआयआर मुद्द्यावर चर्चेची मागणी केली आणि गोंधळ घातला. सभागृहात राष्ट्रगीत वाजवण्यात आले, त्यानंतर सभागृह अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा