Thursday, August 21, 2025

रायगडच्या समुद्रात बोट बुडाली : बचावकार्य सुरु

रायगडच्या समुद्रात बोट बुडाली : बचावकार्य सुरु

रायगड : रायगडच्या समुद्रामध्ये बोट बुडाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. गुजरात वरून हि बोट मासेमारीसाठी आल्याची माहिती मिळाली आहे . या बोटीचा बुडतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे .

रायगड जिल्ह्यातल्या करंजा गावानजीकच्या समुद्र किनाऱ्याजवळ आज (दि.२१ ऑगस्ट) सकाळी ही दुर्घटना घडली आहे . घटनेची माहिती नौदलाच्या जवांनांना मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. बोटीतील खलाशांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहे. हेलिकॉप्टर च्या साहाय्याने मदतकार्य सुरु आहे .

बोटीवर किती खलाशी होते? याची माहिती अद्याप समोर आली नाही. बोट बुडत असल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. स्थानिक प्रशासन या ठिकाणी बचावासाठी दाखल झाले आहे .

Comments
Add Comment