म्हाडाच्या कोकण मंडळाच्या सोडतीला अर्जदारांचा चांगला प्रतिसाद
मुंबई (प्रतिनिधी) : म्हाडा कोकण मंडळाच्या घरांच्या सोडतीसाठी मोठ्या प्रमाणात अर्ज येत आहेत. ठाणे, वसई, कल्याण लाणि नवी मुंई या ठिकाणांतील ५,२८५ घरांसाठी आतापर्यंत तब्बल १ लाख ३, हजार १६० अर्ज म्हाडाकडे आले आहेत. त्यापैकी ६९ हजार ६९२ जणांनी अनामत रक्कमेसेह अर्ज भरले आहेत. अजून नऊ दिवस अर्व भरण्याची मुदत शिल्लक असल्याने अर्जदारांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. म्हाडाला लॉटरीत समाविष्ट असलेल्या घरांच्या संख्येपेक्षा १९ पट जास्त अर्न मिळाले आहेत. विशेष म्हणने, यावेळी पहिल्यांदाच मुंबई मंडळाइतकीच मागणी कोकण मंडळाच्या पर्यसाठी दिसत आहे.
या सोडतीत वेगवेगळ्या योजनेअंतर्गत घरे उपलब्ध आहेत. त्यात २० टक्के सर्वसमावेशक योजनेअंतर्गत ५६५ घरे, १५ टक्के एकात्मिक शहर गृहनिर्माण योजनेअंतर्गत ३,००२ घरं, म्हाडा कोकण मंडळ गृहनिर्माण योजना आणि विखुरलेल्लस स्वरुपातील १,६७७ घरे आणि ५० टक्के योजनेअंतर्गत ४१ घरे विक्रीसाठी ठेवण्यात आली आहेत.
ठाणे, डबिवली, कल्याण, टिटवाला वाणि नवी मुंबईसारख्या ठिकाणी ही घरे उपलब्ध असून त्यांची किंमत ९.५० लाखांपासून ते ८५ लाख रुपयांपर्यंत आहे. आज बुधवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत १ लाख ३. हजार १६० जणांनी अर्ज भरले तर त्यापैकी त्यापैकी ६९ हजार ६९२ जणांनी अनामत रक्कमेसह अर्ज भरले आहेत. घरांसाठी इच्छुक अर्जदारांना २८ ऑगस्ट रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर (https://housing.mhada.gov.in) अर्ज करता येणार आहे. त्यानंतर २९ ऑगस्ट रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत ऑनलाईन अनामत रकमेचा भरणा करता येईल. अनामत रकमेसह भरलेल्या अर्जांची सोडत १८ सप्टेंबर रोजी ठाण्यातील डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात काढण्यात येणार आहे, अशी माहिती कोकण मंडळाच्या मुख्य अधिकारी रेवती गायकर यांनी दिली.