
मुंबई : बॉलिवूडचा ‘किंग’ शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याने अखेर चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं आहे. मात्र, त्याने वडिलांप्रमाणे अभिनयात नव्हे तर दिग्दर्शन क्षेत्रातून करिअरची सुरुवात केली आहे. त्याच्या पहिल्याच चित्रपटाचा ‘बॅडास ऑफ बॉलिवूड’ (The Ba*ds Of Bollywood) प्रीव्ह्यू लाँच इव्हेंट नुकताच पार पडला. या कार्यक्रमात आर्यनने पहिल्यांदाच मंचावर येऊन आपल्या भावना व्यक्त केल्या. त्याला पाठिंबा देण्यासाठी शाहरुख खान स्वतः उपस्थित होते. वडील आणि मुलगा एकत्र एका मंचावर दिसल्याने चाहत्यांची उत्सुकता दुणावली. या कार्यक्रमाचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाले असून नेटकऱ्यांकडून भरभरून प्रतिक्रिया उमटत आहेत.
शाहरुखची कार्बन कॉपी!
शाहरुख खानच्या मुलाच्या आर्यन खानच्या प्रीव्ह्यू इव्हेंटला बॉलिवूडचा ‘किंग’ स्वतः उपस्थित होता. शाहरुखनेच कार्यक्रमाची ओपनिंग केली आणि त्यानंतर आपल्या मुलाला मंचावर बोलावलं. यावेळी आर्यनच्या चालण्याचा, बोलण्याचा आणि हसण्याचा अंदाज हुबेहूब शाहरुखसारखाच दिसला. आर्यनने जेव्हा भाषणाला सुरुवात केली, तेव्हा त्याचा आवाजसुद्धा शाहरुख खानसारखा ऐकू आला. यामुळे उपस्थितांपासून सोशल मीडियापर्यंत एकच चर्चा रंगली – “आर्यन म्हणजे शाहरुखची कार्बन कॉपीच!” नेटकऱ्यांनीही यावर भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत.

मुंबई : मुंबईकरांची यंदाची पाण्याची चिंता दूर झाली आहे. कारण मागील तीन - चार दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांच्या ...
पहिलं भाषण, नर्व्हस आर्यन… पाठीशी उभा राहिला ‘पापा’ शाहरुख!
आर्यन खान पहिल्यांदाच स्टेजवर प्रेक्षकांसमोर उभा राहिला आणि आपल्या मनातील भावना मोकळेपणाने व्यक्त केल्या. “माझ्या मनात खूप धाकधूक आहे, कारण मी पहिल्यांदाच स्टेजवर आलोय,” असे तो म्हणाला. गेल्या काही दिवसांपासून त्याने सतत भाषणाचा सराव केला होता. आर्यन इतका नर्व्हस होता की भाषण टेलीप्रॉम्प्टरवर लिहून घेतलं, लाइट गेल्यासाठी पेपर आणि टॉर्चचीही तयारी केली. एवढंच नाही तर बॅकअप प्लॅनमध्ये पापा शाहरुखलाही उभं केलं. शाहरुखने मंचावर पाठमोरा उभं राहत आपल्या पाठीवर आर्यनचं भाषण चिकटवून ठेवलेलं होतं. आर्यन म्हणाला, “जर काही चुका झाल्या, तर मला माफ करा. कारण मी सर्व काही पहिल्यांदाच करतोय.” या candid स्टाइलमुळे त्याच्या डेब्यू स्पीचला भरभरून दाद मिळाली.
Bohot hard. Aur bohot heart bhi ❤️🔥🎬 Watch The Ba***ds of Bollywood, out 18 September, only on Netflix.#TheBadsOfBollywoodOnNetflix pic.twitter.com/BelJPtCt99
— Netflix India (@NetflixIndia) August 20, 2025
चार वर्षांची मेहनत, हजारो टेक्स… अखेर आर्यन खानचा शो नेटफ्लिक्सवर!
आर्यन खान याने आपल्या पहिल्या प्रोजेक्टसाठी तब्बल चार वर्षं कठोर मेहनत घेतल्याचं सांगितलं. “हजारो टेक्स घेतल्यानंतर अखेर हा शो तयार झाला आहे. या प्रवासात माझ्यासोबत असलेल्या सर्वांचा मी आभारी आहे. त्यांच्या शिवाय हा शो कधीच साकारला नसता,” अशा शब्दांत आर्यनने आपले भाव व्यक्त केले. आर्यन दिग्दर्शित हा शो लवकरच नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. या शोमध्ये बॉबी देओल, राघव जुयाल, गौतमी कपूर, अन्या सिंह, लक्ष्य, विजयंत कोहली आणि मोना सिंह असे नामवंत कलाकार झळकणार आहेत. याचबरोबर या शोच्या प्रीव्ह्यूमध्ये सलमान खान, रणवीर सिंह आणि करण जोहर यांची खास उपस्थितीही दिसून आली. त्यामुळेच या प्रोजेक्टकडे प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे.