बाजार तज्ञांच्या मते, दीर्घकालीन गुंतवणूकीसाठी 'हे' ५ शेअर खरेदी करा !

मोहित सोमण: गेल्या एक महिन्यापासून ५० हून अधिक कंपन्यांनी आपले तिमाही निकाल जाहीर केले आहेत. एकूणच कामगिरी पाहता पहिल्या तिमाहीतील कंपन्यांची कामगिरी समाधानकारक राहिली नाही. मात्र काही कंपन्यांच्या कामगिरीत ब्लू चिप्स कंपनी तील विशेषतः बाजारातील ट्रिगर म्हणून आवश्यक असलेल्या निव्वळ नफ्यात लक्षणीय वाढ झाली.यासह अनेक कंपन्यांच्या किफायतशीर नफा कमावतानाच फंडांमेटलमध्ये चांगली सुधारणा झाली आहे. या आधारावरच विश्लेषकांनी दिर्घकालीन गुंतवणूकीसाठी काही शेअर खरेदी करण्याचा (Buy Call) दिला आहे.

१) एचडीएफसी एएमसी- एचडीएफसी एएमसी कंपनीला जेपी मॉर्गनने आपले रेटिंग तटस्थ (Nutral) वरून ओवरवेट (Overweight) वर वाढवले आहे. ब्रोकरेज कंपनीने म्हटल्याप्रमाणे या कंपनीच्या शेअर्समधील लक्ष्य किंमत (Target Price) ५००० वरून वाढवून ६५०० रूपये प्रति शेअरवर ब्रोकरेजकडून करण्यात आली आहे. येत्या काळात हा शेअर ३०% रिटर्न्स (परतावा) देऊ शकतो असे त्यांनी आपल्या अहवालात म्हटले आहे. कंपनीच्या फंडामेंटलमध्येही वाढ झाल्याचे अहवालातून निष्कर्षावरून लक्षात येते. कमिशनिंग रॅशनलायझेशन मधील परिवर्तनानंतर कंपनीच्या खर्चातही चांगलीच कपात झाली असून उत्पादकेतसह कामगिरीतही सकारात्मक बदल आहे. त्यामुळे हा शेअर आगामी काळात २० ते ३०% रिटर्न देऊ शकतो असे तज्ज्ञांचे मत आहे.

२) अलेकम लॅब्स - या शेअरला जेफरीज ब्रोकरेज संस्थेने आपले 'अंडरपरफॉर्म' रेटिंगवरून सुधारणा करत 'बाय' रेटिंग दिले आहे. ब्रोकरेज कंपनीने या शेअर्सच्या लक्ष्य किंमतीत ४४६० वरून ६००० रूपये प्रति शेअरवर वाढ केली आहे. कंपनीच्या भारतीय बा जारातील कामगिरीत १०० बेसिस पूर्णांकाने (BPS) वाढ झाल्याने जेफरीजने आपल्या लक्ष्य किंमतीत वाढ केली.

३) इटर्नल (Zomato) - कंपनीच्या तिमाही निकालात किरकोळ सकारात्मक अथवा संमिश्र प्रतिसाद मिळाला असला तरी कंपनीच्या आगामी कामगिरीत तज्ञांना आश्वासकता वाटल्याने गुंतवणूकदारांच्या मनातही या शेअरबद्दल आश्वासकता निर्माण झाली आ हे. जेफरीजने 'होल्ड' वरून आपले रेटिंग 'बाय' वर वाढवले आहे. या शेअर्समध्ये ब्रोकरेज कंपनीने जेफरीजने लक्ष्य किंमत (TP) २५० रुपयांवरुन वाढवत ४०० रुपयांवर नेली आहे.

४) कारट्रेड - नोमुरा ब्रोकरेज रिसर्च कंपनीने कंपनीच्या मजबूत निकालासह वाढलेल्या मजबूत फंडामेंटलमुळे नोमुराने या शेअरला 'बाय' कॉल दिला आहे. लक्ष्य किंमत १८३९ वरून २३८८ रूपये प्रति शेअर करण्यात आली आहे.

५) टोरंट फार्मास्युटिकल - जेफरीजकडून या शेअरसाठी 'बाय' रेटिंग स्थिर ठेवण्यात आले आहे. मात्र जेफरीजने ३७४० रूपयांवदून ४२०० रूपये प्रति शेअरवर लक्ष्य किंमतीत वाढ केली आहे.कंपनीला प्रमुख बाजारपेठांमध्ये मजबूत वाढ आणि नफ्यात सातत्या ने सुधारणा दिसून येत आहे, ज्यामुळे आगामी तिमाहीत वाढ आणि नफा मजबूत राहण्याची शक्यता आहे.

टीप (Disclaimer) - गुंतवणूकदारांनी आपल्या सदसद्विवेकबुद्धीचा वापर करुन तसेच तज्ञांच्या सल्ल्यानेच गुंतवणूक करणे अपेक्षित आहे. ही माहिती केवळ अभ्यासाचा भाग असून झालेल्या नुकसानास प्रकाशन जबाबदार राहणार नाही याची कृपया नोंद घ्या वी.
Comments
Add Comment

नवी मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन या दिवशी होणार पहिले उड्डाण ?

पनेवल : पंतप्रधान नरेंद्र मोदी ३० सप्टेंबर २०२५ रोजी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन करतील. यानंतर

Nepal Protest : हिंसाचार थांबेना… लष्कराच्या गोळीबारानं नेपाळ पेटलं, भारताची सीमा...

काठमांडू : नेपाळमध्ये सरकारने सोशल मीडियावर घातलेली अचानक बंदी मोठ्या उद्रेकाला कारणीभूत ठरली आहे. या

Air India flight : सिंगापूर फ्लाइटमध्ये गोंधळ; २०० प्रवाशांना अचानक उतरवले विमानातून!

अहमदाबाद : अहमदाबादहून लंडनकडे रवाना झालेल्या एअर इंडियाच्या विमानाचा झालेला भीषण अपघात अजूनही ताजा असतानाच,

मराठा आरक्षणाचा सप्टेंबरमध्ये काढलेला शासन निर्णय अडचणीत ? जरांगे काय करणार ?

मुंबई : मनोज जरांगे आणि त्यांच्या समर्थकांनी ऐन गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन केले होते. या आंदोलनाला

युएस बाजारातील वाढीनंतर आजही शेअर बाजारात 'Feel Good' वातावरण सलग तिसऱ्यांदा वाढ 'हे' आहे सकाळचे विश्लेषण

मोहित सोमण:आज सकाळच्या सत्रात गिफ्ट निफ्टीत वाढीमुळे सलग चौथ्यांदा आज बाजारात वाढ होण्याची शक्यता आहे. विशेषतः

३५००० कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी DHFL वाधवान बंधूवर ईडीकडून कारवाई वेगाने सुरू

मुंबई: युनियन बँक ऑफ इंडियासह १७ बँकांच्या एकूण ३४६१५ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी कपिल वाधवान भाऊ धीरज