
वसई, विरार, नालासोपारामधील काही भाग १२ तासापासून पाण्याखाली आहे. तेथील विद्युत सप्लाय बंद असल्याने नागरीकांचे हाल बेहाल झाले आहेत. काल वसई विरार क्षेत्रात पावसाचं रौद्ररुप पाहायला मिळालं. संपूर्ण वसई विरार जलमय झालं होतं. अनेख सखल भागातील सोसायटीमध्ये पाणी जमा झाल्याने सोसायटीच्या मिटर बॉक्स पर्यंत पाणी गेले होते. त्यामुळे महावितरणाने खबरदारी घेत वीज सप्लाय बंद केला होता. ज्या सोसायटीचे पाणी उतरले तेथील ट्रान्सफार्म सुरु करण्यात आले. माञ अजही वसई विरार आणि नालासोपारातील काही भागातील पाणी ओसरलं नसल्याने लाईट नाही आहे.
जवळपास १२ तासापासून काही ठिकाणी लाईट नाही आहे. विरार येथील गोकुळ टाउनशिप, छेडा नगर, स्टेशन परिसर वसईतील स्टेशन परिसर तसेच माणिकपूर मधील काही भाग, नालासोपारा पूर्वेकडील स्टेशन परिसर, पश्चिमेतील श्रीप्रस्थ रोड, या ठिकाणी काल दुपारी ३ वाजल्यापासून वीज बंद करण्यात आली आहे. राञभर कोसळलेल्या पावसामुळे आताही सोसायटीमध्ये पाणी साचल्याने पाणी ओसरल्यावर तात्काळ वीज प्रवाह सुरु करण्यात येईल अशी माहीती महावितरणाचे अधिक्षक अभियंता संजय खंडारे यांनी दिली आहे.
वसई-विरार : गेल्या चार दिवसांपासून वसई-विरार शहराला मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. सततच्या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचून पूरस्थिती निर्माण झाली आहे. याच दरम्यान नालासोपारा पूर्वेतील टाकी रोड, आपना नगर सोसायटी परिसरात पाण्यात मोठमोठे मासे दिसू लागले आहेत. इतकेच नव्हे तर कालपासून या परिसरात सापांचाही वावर असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.