Wednesday, September 10, 2025

भांडुपमध्ये पावसात घडली धक्कादायक घटना, हेडफोनवर गाणी ऐकणाऱ्याचाबाबत घडली दुर्दैवी घटना

भांडुपमध्ये पावसात घडली धक्कादायक घटना, हेडफोनवर गाणी ऐकणाऱ्याचाबाबत घडली दुर्दैवी घटना

मुंबई : मुंबईत मुसळधार पाऊस सुरू असताना भांडुपमध्ये धक्कादायक घटना घडली. हा प्रकार भांडुपच्या पन्नालाल कंपाऊंड परिसरात घडला. विजेच्या खुल्या तारेच्या संपर्कात आल्यामुळे १७ वर्षांच्या दीपक पिल्ले याचा मृत्यू झाला. तो भर पावसात हेडफोनवर गाणी ऐकत स्वतःच्याच मर्जीने निवांत चालला होता. परिसरात महावितरण कंपनीची एक विजेची तार खुली होती. या तारेपासून सावध राहण्यासाठी स्थानिकांनी हाका मरुन सूचना दिल्या. पण हेडफोनवर गाणी ऐकत असल्यामुळे दीपकने धोक्याच्या इशाऱ्यांकडे लक्षच दिले नाही. तो स्वतःच्या धुंदीत चालत पुढे गेला आणि दुर्दैवी घटना घडली.

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार मुसळधार पाऊस पडत होता. महावितरणची एक उच्च दाबाची विजेची तार खुली पडली होती. या संदर्भात महावितरणकडे तक्रार करण्यात आली होती. पण त्यांचे तंत्रज्ञ घटनास्थळी पोहोचले नव्हते. यामुळे शॉक लागण्याचा धोका होता. जे कोणी तार खुली पडलेल्या भागातून जात होते त्यांना स्थानिक सावध करत होते. पण १७ वर्षांचा दीपक पिल्ले जेव्हा त्या भागात आला तेव्हा तो हेडफोनवर गाणी ऐकत होता. यामुळे स्थानिकांच्या इशाऱ्याकडे त्याचे लक्षच नव्हते. वारंवार हाका मारुन त्याला सावध करण्याचा प्रयत्न झाला. पण दीपक त्याच्या तंद्रीत पुढे गेला.

गाणी ऐकत स्वतःच्या धुंदीत चालत असलेला दीपक पिल्ले अखेर खुल्या विजेच्या तारेच्या संपर्कात आला. शॉक लागल्यामुळे दीपकचा मृत्यू झाला. या घटनेनंतर नागरिकांनी दुःख व्यक्त केले.

Comments
Add Comment