Friday, August 22, 2025

रियलमी पी4 5जी आणि पी4 प्रो 5जी स्मार्टफोन भारतात लाँच

रियलमी पी4 5जी आणि पी4 प्रो 5जी स्मार्टफोन भारतात लाँच

मुंबई: रिअलमीने भारतीय बाजारपेठेत आपल्या नवीन पी4 सिरीजचे दमदार लाँच केले असून या मालिकेत रिअलमी पी4 5जी आणि रिअलमी पी4 प्रो 5जी हे दोन स्मार्टफोन सादर करण्यात आले आहेत. मिड-रेंज सेगमेंटमध्ये प्रगत तंत्रज्ञान आणि आकर्षक किंमतीत उपलब्ध झाला आहे.

रिअलमी पी4 5जीची किंमत ६GB + १२८GB व्हेरियंटसाठी १८,४९९ रुपये, तर ८GB + १२८GB साठी १९,४९९ रुपये आणि ८GB + २५६GB मॉडेलसाठी २१,४९९ रुपये ठेवण्यात आली आहे. हा फोन इंजिन ब्लू, फोर्ज रेड आणि स्टील ग्रे या रंगांमध्ये उपलब्ध होईल. तर अधिकृत विक्री २५ ऑगस्टपासून दुपारी १२ वाजता सुरू होईल.

रिअलमी पी4 प्रो 5जीची सुरुवातीची किंमत ८GB + १२८GB मॉडेलसाठी २४,९९९ रुपये ठेवण्यात आली आहे. तसेच ८GB + २५६GB मॉडेल २६,९९९ रुपये आणि १२GB + २५६GB मॉडेल २८,९९९ रुपये मध्ये उपलब्ध होईल. या प्रीमियम मॉडेलचे बर्च वूड, डार्क ओक वूड आणि मिडनाईट आयव्ही असे आकर्षक रंग पर्याय असतील. विक्री २७ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजल्यापासून फ्लिपकार्ट, रिअलमीची अधिकृत वेबसाईट आणि ऑफलाइन स्टोअर्सवर सुरू होईल.

या दोन्ही स्मार्टफोन्समध्ये 7000 mAh क्षमतेची मोठी बॅटरी देण्यात आली आहे ज्यासोबत 80W सुपरफास्ट चार्जिंगची सुविधा आहे. इतक्या मोठ्या बॅटरीसहही हे फोन अत्यंत स्लिम बॉडी डिझाईनसह बाजारात आले आहेत.पी4 प्रोची जाडी केवळ 7.68 मिमी असून पी4 5जी हा 7.58 मिमी इतका स्लिम आहे. दोन्ही फोनना IP68 व IP69 धूळ व पाणी प्रतिकार प्रमाणपत्रे मिळालेली आहेत, त्यामुळे दैनंदिन वापरात त्यांची टिकाऊपणाही अधिक वाढली आहे.

प्रोसेसरच्या बाबतीत रिअलमी पी4 प्रो 5जी मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 7 Gen 4 चिप दिली असून त्यासोबत हायपर व्हिजन एआय चिप (पिक्सेलवर्क्स X7 Gen2) बसवण्यात आली आहे. तर रिअलमी पी4 5जी मध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 7400 अल्ट्रा प्रोसेसरसोबत हीच एआय चिप देण्यात आली आहे. यामुळे दोन्ही मॉडेल्स गेमिंगपासून व्हिडिओ स्ट्रीमिंगपर्यंत उच्च कार्यक्षमता प्रदान करतात.

डिस्प्लेच्या दृष्टीने हे फोन आणखी आकर्षक ठरतात. पी4 प्रो मध्ये 6.8 इंचाचा हायपरग्लो अमोलेड डिस्प्ले असून त्यात 144Hz रिफ्रेश रेट, 240Hz टच सॅम्पलिंग आणि तब्बल 6500 nits ब्राइटनेस मिळतो.रिअलमी पी4 5जी मध्ये 6.77 इंचाचा अमोलेड डिस्प्ले असून त्याची कमाल ब्राइटनेस क्षमता 4500 nits आहे.

कॅमेर्‍याच्या बाबतीतही रियलमीने या मालिकेला अधिक सक्षम केले आहे. Realme पी4 प्रो 5जी मध्ये 50MP सोनी IMX896 प्राथमिक सेन्सर (OIS सपोर्टसह) आणि 8MP अल्ट्रावाइड लेन्स दिले आहेत, तर समोरच्या बाजूला 50MP फ्रंट कॅमेरा असून दोन्ही कॅमेऱ्यांमधून 4K व्हिडिओ रेकॉर्डिंग करता येते. याउलट, रिअलमी पी4 5जीमध्ये 50MP मुख्य कॅमेरा (OV50D40) व 8MP अल्ट्रावाइड लेन्ससह 16MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

दोन्ही फोन अँड्रॉइड 15 आधारित रिअलमी यूआय 6.0 वर चालतात तसेच त्यात मोठ्या प्रमाणावर कूलिंग सिस्टम देण्यात आली आहे ज्यामुळे लांब वेळ वापरतानाही फोन गरम होत नाही.

रियलमी P4 सिरीजने मोठी बॅटरी, दमदार प्रोसेसर, आकर्षक डिस्प्ले आणि प्रगत कॅमेरा वैशिष्ट्यांसह मिड-रेंज स्मार्टफोन बाजारात मोठी स्पर्धा निर्माण केली आहे.

Comments
Add Comment