
पेण : रायगड जिल्ह्यामध्ये मंगळवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे पेण तालुक्याला फटका बसला आहे. पेणमधील बाळगंगा नदीने धोक्याची पातळी गाठली आहे. यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटल्याची माहिती मिळाली आहे.
बाळगंगा नदीला पूर आल्याने तालुक्यातील खरोशी गावामध्ये पुराचे पाणी शिरले आहे. पुरामुळे खरोशी गावातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. रायगड जिल्ह्यामध्ये मंगळवारी सकाळी आठ वाजल्यापासून सतत जोरदार पाऊस पडला. मुसळधार पावसामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचले. जिल्ह्यातील नद्यांच्या किनारी राहणाऱ्यांचे स्थलांतर करण्यात आले. प्रत्येक तालुक्यामध्ये शेकडो मिलिमीटर पावसाची नोंद झाली. प्रशासन पूरग्रस्त भागावर लक्ष ठेवून आहे. पीडितांना आवश्यक ती मदत देण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली.