
मुंबई : मुंबईसह उपनगरात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. मुंबईत मागील २४ तासांत अतिवृष्टीची नोंद झाली असून, शहरातील अनेक भाग पाण्याखाली गेले आहेत. हवामान विभागाने मुंबई, ठाणे, पालघर आणि रत्नागिरीसाठी आज रेड अलर्ट जारी केला आहे. गेल्या ४८ तासांपासून एमएमआरसाठी सतत रेड अलर्ट होता आणि मुसळधार पाऊस पडत आहे. पुढील तीन तासांसाठीही अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मुंबईत मुसळधार पावसाचा तिसरा दिवस; लोकल सेवा अजून विस्कळीत
मुंबई उपनगरात सकाळपासूनच मुसळधार पाऊस सुरू होता. काही भागांसाठी अतिमुसळधार पावसाचा इशारा जारी करण्यात आला आहे, तर दुपारी अनेक भागात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज होता. गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे मुंबईची लाईफलाइन असलेली लोकल सेवा विस्कळीत झाली आहे. आज तिसऱ्या दिवशीही लोकल सेवा सुरळीत होऊ शकलेली नाही, परिणामी प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पावसाचा जोर थोडा ओसरला आहे, तरीही लोकल वाहतुकीवर परिणाम कायम आहे.

मुंबई: मुंबईसह राज्यभरात सोमवारपासून सुरू असलेला पाऊस थांबण्याचे काही नावच घेत नाही. मंगळवारी मुंबईची अक्षऱश: तुंबई झाली होती. सगळीकडे पाणीच पाणी ...
सध्याची मुंबई लोकलची काय स्थिती?
मुंबईत मुसळधार पावसामुळे शहराची लाईफलाइन असलेली लोकल सेवा पूर्णपणे विस्कळीत झाली होती. आज पावसाचा जोर थोडा ओसरला असला तरी, मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावरील लोकल सेवा अजूनही विस्कळीतच आहे. प्रवाशांना तिन्ही मार्गांवर अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे, त्यामुळे जनजीवनावर मोठा परिणाम दिसून येत आहे.
पश्चिम रेल्वे गाड्या रद्द, सेवा १०–१५ मिनिटं उशिरानं सुरू
मुंबईत मुसळधार पावसामुळे पश्चिम रेल्वेच्या अप आणि डाऊन मार्गावरील १७ लोकल गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. पहाटे ३.४० ते ५.३१ दरम्यानच्या गाड्या रद्द केल्या गेल्या, ज्यात चर्चगेटकडे जाणाऱ्या सहा आणि विरारकडे जाणाऱ्या चार गाड्या आहेत. सध्या पश्चिम रेल्वे लाईनवरची लोकल सेवा १० ते १५ मिनिटे उशिरानं सुरू होत आहे, कारण रुळांवर पाणी साचल्यामुळे प्रवासावर अडथळा निर्माण झाला आहे.
मुंबई लोकल: मध्य रेल्वे २०-२५, हार्बर १५-२०मिनिटं उशिरानं सुरू
मुंबईत दोन दिवस मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत झाली आहे. अजूनही मध्य रेल्वेची वाहतूक पूर्णपणे पूर्ववत झालेली नाही; सध्या गाड्या २० ते २५ मिनिटे उशिरानं धावत आहेत. तर हार्बर रेल्वे १५ ते २० मिनिटे उशिरानं सुरू आहे. मुसळधार पावसामुळे रुळांवर पाणी साचल्याने प्रवाशांना विलंबाचा सामना करावा लागत आहे.