
जळगाव : जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील खेडी गाव हादरवून टाकणारी घटना घडली आहे. गावाजवळील शेतात एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृतदेह आढळून आला असून या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे सर्व जण आपल्या शेताकडे जात असताना विजेचा धक्का बसल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक शक्यता व्यक्त केली जात आहे. मृतांमध्ये स्त्री-पुरुषांसह लहान मुलांचाही समावेश असल्याने गावात शोककळा पसरली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे खेडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
विजेच्या धक्क्याने कुटुंब उजाडलं
जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील खेडी गावात एकाच कुटुंबावर भीषण आपत्ती कोसळली आहे. शेतात काम करण्यासाठी गेलेल्या या कुटुंबातील पाच जणांचा विजेच्या धक्याने मृत्यू झाला. या घटनेमुळे गावभर हळहळ व्यक्त होत आहे. पोलिसांच्या प्राथमिक चौकशीतून मिळालेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये दोन महिला (वय ४० वर्षे), एक पुरुष (वय ४५ वर्षे), सहा वर्षांची मुलगी आणि आठ वर्षांचा मुलगा यांचा समावेश आहे. हे कुटुंब आदिवासी पावरा समाजातील असल्याची माहिती मिळाली आहे. विशेष म्हणजे, या दुर्घटनेत त्याच कुटुंबातील तीन वर्षांची एक लहानगी चमत्कारिकरीत्या बचावली असून त्यामुळे या घटनेत थोडा दिलासा मिळाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेण्यात आले असून मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, या घटनेमुळे खेडी परिसरात शोककळा पसरली असून संपूर्ण गाव दु:खाच्या छायेत बुडाले आहे.

मुंबई : मुंबईतील बेस्ट कर्मचारी सहकारी पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरे बंधूंना मोठा धक्का बसला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि मनसे यांच्या ...
नेमकं काय घडलं?
अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा फाटा येथे दोन दिवसांपूर्वी घडलेल्या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण जिल्हा शोकसागरात बुडाला. कालिका फर्निचर या दुकानात मध्यरात्री अचानक लागलेल्या भीषण आगीत वरच्या मजल्यावर राहणाऱ्या रासने कुटुंबातील पाच जणांचा गुदमरून मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन निरागस मुलांचाही समावेश आहे. घटनेची प्राथमिक माहिती अशी की, दुकानात मोठ्या प्रमाणात लाकडी फर्निचर, सोफा, कूलर, फ्रीज आणि इतर वस्तू असल्याने आगीने क्षणातच रौद्ररूप धारण केले. आगीमुळे धुराचे मोठे लोळ पसरले आणि वरच्या मजल्यावर राहणाऱ्या रासने कुटुंबाला झोपेतच श्वास गुदमरून कुटुंबातील प्रमुख मयूर अरुण रासने (४५), त्यांची पत्नी पायल मयूर रासने (३८), दोन लहान मुले अंश (१०) व चैतन्य (७) आणि वृद्ध आजी सिंधुबाई चंद्रकांत रासने (८५) यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर संपूर्ण नेवासा फाटा परिसरात हळहळ व्यक्त होत असून ग्रामस्थांपासून ते प्रशासनापर्यंत सर्वजण हतबल झाले आहेत. पाच निरपराध जीव एका क्षणात आगीच्या धुराने हिरावून घेतल्याने गावात हृदयद्रावक वातावरण पसरले आहे.