
दुबई : भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहलीची नावे आयसीसीच्या ताज्या क्रमवारीतून गायब झाली आहेत. गेल्या आठवड्यात जाहीर झालेल्या क्रमवारीत दोन्ही भारतीय फलंदाज टॉप-५ मध्ये होते. रोहित शर्मा दुसऱ्या क्रमांकावर होता तर विराट कोहली चौथ्या क्रमांकावर होता. पण बुधवारी जेव्हा एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीत जाहीर करण्यात आले तेव्हा त्यात रोहित शर्माचे नाव किंवा विराट कोहलीचे नाव नव्हते.
काही चुकीमुळे किंवा तांत्रिक कारणामुळे हे घडले असण्याची शक्यता आहे. कारण याआधीही आयसीसीच्या क्रमवारीत चुका झाल्या आहेत. ज्यानंतर दुरुस्त करण्यात आल्या आहेत. ३ वर्षांपूर्वी आयसीसीने चुकून भारतीय संघाला नंबर-१ कसोटी संघ बनवले होते. त्यानंतर सुमारे अडीच तासांनंतर ही चूक दुरुस्त करण्यात आली होती.
ताज्या क्रमवारीत शुभमन गिल ७८४ गुणांसह नंबर-१ वर कायम आहे, तर बाबर आझम दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. गिल व्यतिरिक्त, श्रेयस अय्यर हा एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीत पहिल्या १० मध्ये स्थान मिळवणारा एकमेव भारतीय क्रिकेटपटू आहे.