Wednesday, August 20, 2025

महापालिका निवडणुकीआधी ठाकरे बंधूंना मोठा झटका, 'या' निवडणुकीत पराभव

महापालिका निवडणुकीआधी ठाकरे बंधूंना मोठा झटका, 'या' निवडणुकीत पराभव

दोन्ही ठाकरे बंधूंना एकही जागा जिंकता आली नाही.


बेस्ट पतपेढीतील नऊ वर्षांची सत्ता ठाकरेंच्या शिवसेनेने गमावली.


मुंबई: दी बेस्ट एम्प्लॉईज को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या निवडणुकीचा बहुप्रतिक्षित निकाल अखेर जाहीर झाला आहे. या निवडणुकीत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या ठाकरे बंधूंच्या पॅनेलला मोठा धक्का बसला आहे. या निवडणुकीत दोन्ही ठाकरे बंधूंना एकही जागा जिंकता आली नाही. बेस्ट पतपेढीतील नऊ वर्षांची सत्ता ठाकरेंच्या शिवसेनेने गमावली आहे.


बेस्ट युनियनचे नेते शशांक राव यांच्या पॅनलने सर्वाधिक 14 जागा जिंकल्या, तर भाजपच्या पॅनलला 7 जागा मिळाल्या. ठाकरे बंधूंच्या 'उत्कर्ष' पॅनलला मात्र भोपळाही फोडता आला नाही.



​काय आहे निकाल:-


​शशांक राव पॅनल: 14


​प्रसाद लाड पॅनल: 07


मनसे - शिवसेना: 00


१८ ऑगस्टला या निवडणुकीसाठी मतदान झाले होते. या निवडणुकीचा निकाल मंगळवारी जाहीर होणार होता. मात्र मुंबईत मंगळवारी मुसळधार पाऊस झाल्याने मजमोजणीस विलंब झाला. अखेर रात्री उशिरा या निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात आला. या निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या पॅनेलला जबर धक्का बसला आहे.


बेस्ट वर्कर्स युनियनच्या शशांक राव पॅनलचे १४ उमेदवार निवडून आले आहेत. हा विजय म्हणजे बेस्ट कर्मचाऱ्यांनी युनियनने केलेल्या कामाला दिलेली खरी पोचपावती आहे. ​गेल्या अनेक वर्षांत शिवसेनेने बेस्टमध्ये जे खाजगीकरण आणले आणि कामगारविरोधी धोरणे राबवली, त्याबद्दलची कर्मचाऱ्यांची चीड या निकालातून दिसून येते. म्हणूनच त्यांचा एकही उमेदवार निवडून आला नसल्याचे बोलले जात आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >