मुंबई: बॉलिवूड तसेच अनेक मराठी सिनेमांमध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडणारे ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार यांचे सोमवारी निधन झाले. ते ९१ वर्षांचे होते. ठाण्याच्या ज्युपिटर रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालावली. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
अच्युत पोतदार हे भारतीय सैन्यात कॅप्टन पदावर होते. तेथून निवृत्ती स्वीकारल्यानंतर त्यांनी शिक्षण, भारतीय सैन्य दलात सेवा, इंडियन ऑइल कंपनीतील काम केले होते. त्यानंतर त्यांनी अभिनय क्षेत्रात पाऊल टाकले होते. येथेही त्यांनी आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली.
बॉलिवूड सिनेमा थ्री इडियटमधील त्यांची भूमिका चांगलीच गाजली. यांनी आमिर खानच्या '3 इडियट्स' चित्रपटात प्राध्यापकाची भूमिका साकारली होती.त्यांनी 1980 च्या दशकात चित्रपट आणि टेलिव्हिजनमध्ये प्रवेश केला, त्यानंतर त्यांनी चार दशकांहून अधिक काळ रुपेरी पडद्यावरुन आपली प्रतिभा दाखवली.
त्यांनी आक्रोश', 'अल्बर्ट पिंटो को गुस्सा क्यों आता है', 'अर्ध सत्य', 'तेजाब', 'परिंदा', 'राजू बन गया जेंटलमन', 'दिलवाले', 'रंगीला', 'वास्तव', 'हम साथ रहना', 'हम साथ रहना', 'भाई', 'दबंग 2' आणि 'व्हेंटिलेटर' अनेक चित्रपटांमध्ये अभिनय केला होता.