युद्ध संपणार! पुतिन आणि झेलेन्स्की यांच्यातील भेट लवकरच, व्हाईट हाऊसमध्ये बैठकीनंतर ट्रम्प यांची घोषणा


वॉशिंग्टन: रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध थांबवण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठे पाऊल उचलले आहे. व्हाइट हाऊसमध्ये युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की आणि युरोपीय नेत्यांसोबतच्या भेटीनंतर ट्रम्प यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि झेलेन्स्की यांच्यात थेट बैठक घडवून आणण्याची घोषणा केली आहे.


या बैठकीची तयारी करण्यासाठी उपराष्ट्रपती जे.डी.व्हान्स, परराष्ट्र सचिव मार्को रुबिओ आणि विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ यांना जबाबदारी देण्यात आली आहे.



भेटींचा सिलसिला:


ट्रम्प-पुतिन भेट: १५ ऑगस्ट रोजी अलास्का येथे ट्रम्प आणि पुतिन यांच्यात सुमारे तीन तास बैठक झाली होती. या बैठकीत रशिया-युक्रेन युद्धावर चर्चा झाली, मात्र कोणताही अंतिम तोडगा निघाला नाही.


ट्रम्प-झेलेन्स्की भेट: त्यानंतर १८ ऑगस्ट रोजी ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये झेलेन्स्की आणि युरोपीय नेत्यांची भेट घेतली. या बैठकीत युक्रेनच्या सुरक्षिततेच्या हमीवर चर्चा झाली. या भेटीदरम्यान ट्रम्प यांनी पुतिन यांना फोन करून झेलेन्स्कीसोबत थेट चर्चेसाठी विचारणा केली.


या दोन्ही नेत्यांमध्ये सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यानंतर ट्रम्प यांनी पुतिन आणि झेलेन्स्की यांच्यात बैठक आयोजित करण्याची घोषणा केली. ही बैठक झाल्यावर त्यानंतर लवकरच अमेरिका, रशिया आणि युक्रेन या तिन्ही देशांच्या प्रमुखांची त्रिपक्षीय बैठकही घेण्याची योजना ट्रम्प यांनी जाहीर केली आहे.


पुतिन आणि झेलेन्स्की यांच्यातील ही संभाव्य बैठक या तीन वर्षांपासून सुरू असलेल्या युद्धाला पूर्णविराम देण्यास मदत करेल, अशी आशा आहे.


Comments
Add Comment

वीस वर्षांची सवय ठरली घातक; रोजच्या कॉफीतून शरीरात साचलं विष, अखेर ५० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

तैवान : तैवानमध्ये एका ५० वर्षीय व्यक्तीच्या मृत्यूमागे धक्कादायक कारण समोर आलं असून, रोजच्या वापरातील एका

अमेरिकेत घडत आहेत धक्कादायक घडामोडी; डोनाल्ड ट्रम्प यांच्या विमानाचे आपत्कालीन लँडिंग

वाशिंग्टन : अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे स्वित्झर्लंडमधील दावोस येथे होणाऱ्या जागतिक आर्थिक

निमंत्रण धुडकावल्याने २०० टक्के टॅरिफ लादणार

‘गाझा बोर्ड ऑफ पीस’वरून ट्रम्प यांची फ्रान्सला धमकी वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प टॅरिफ

ट्रम्पनी शेअर केला अमेरिकेचा नवा नकाशा, नकाशात कॅनडा आणि ग्रीनलँडचा समावेश

वॉशिंग्टन डीसी : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक नकाशा शेअर केला आहे. या नकाशात ट्रम्प यांनी कॅनडा आणि

ट्रम्प वाढवताहेत जागतिक अस्वस्थता

अमेरिकेचे विक्षिप्त अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प कधी कोणता निर्णय घेतील, कौतुक करता करता कधी पायाखाली घेतील, याचा

अयातुल्ला खाेमेनी यांच्यावर हल्ला म्हणजे थेट युद्धाला आमंत्रण

डोनाल्ड ट्रम्प यांना इराणचा इशारा तेहरान : इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी इराणचे सर्वोच्च नेते