Wednesday, September 3, 2025

चिपळूण-कराड मार्गावर ३ वाहनांचा भीषण अपघात, ५ जणांचा मृत्यू, गाड्यांचा चुराडा

चिपळूण-कराड मार्गावर ३ वाहनांचा भीषण अपघात, ५  जणांचा मृत्यू, गाड्यांचा चुराडा

कराड: चिपळूण-कराड महामार्गावरील वाशिष्टी डेअरीजवळ पिंपळी कॅनॉलवर सोमवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. ट्रक, थार गाडी व रिक्षा अशा ३ वाहनाच्या झालेल्या या अपघातात ५  जणांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात रिक्षामधील ४ जण ठार झाल्याची माहिती मिळत आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अपघातात रस्त्यावर रक्ताचा सडा पडला आहे. अनेक जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. मुसळधार पावसामुळे बचाव कार्यात अडचणी येत आहेत. धुके आणि मुसळधार पाऊस यामुळे वाहने दिसली नसल्यामुळे मोठा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र उत्साहाचे वातावरण असतानाच घडलेल्या या दुर्घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. नागरिकांमध्ये भीतीचे व उद्विग्नतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

अपघाताची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी बेले यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहेत. या अपघातामुळे महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. ग्रामस्थांच्या मदतीने जखमींना रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा