
मोहित सोमण: आज सकाळी गिफ्ट निफ्टीत किरकोळ घसरण झाली होती. त्याचाच उत्तरार्ध म्हणून सकाळी शेअर बाजार सत्र सुरू झाल्यावरच सेन्सेक्स ५५.०७ अंकाने व निफ्टी ५० निर्देशांक ८.५५ अंकांने वाढला आहे. ज्यामुळे बाजारात किरकोळ वाढ अथवा सपाट (Flat) परिस्थिती कायम आहे. त्यामुळे आज शेअर बाजारात पडझडीचे अथवा किरकोळ वाढीचे संकेत मिळत आहेत. सत्र सुरु होताना सेन्सेक्स बँक निर्देशांकात ४५.२४ अंकाने व बँक निफ्टीत ८४.२० अंकांची घसरण झाली आहे. सेन्सेक्स मिडकॅप ०.१८% घसरण व स्मॉलकॅपमध्ये ०.०३% वाढ झाली आहे. निफ्टी मिडकॅपमध्ये ०.०२% घसरण झाली असून स्मॉलकॅपमध्ये ०.१०% वाढ झाली आहे. या एकत्रित कारणांमुळे ज्यामुळे आज बाजाराला आधारभूत पातळी मिळू शकली नाही.
निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकात (Nifty Sectoral Indices) यामध्ये आज संमिश्र प्रतिसाद कायम राहिला आहे. सर्वाधिक वाढ ऑटो (०.५२%), मिडिया (०.६२%), तेल व गॅस (०.७६%) समभागात झाली असून सर्वाधिक घसरण फायनांशियल सर्व्हिसेस २५/५० (०.३५%), रिअल्टी (०.५५%), फायनांशियल सर्व्हिसेस एक्स बँक (०.६०%), मिडस्मॉल फायनांशियल सर्व्हिसेस (०.३१%) समभागात झाली आहे. आज अस्थिरता निर्देशांक (Vix volatility index) २.३७% घसरला आहे.
प्रामुख्याने काल उशीरा युएस राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांची व्हाईट हाऊस येथे बैठक पार पडली आहे. याशिवाय सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दोघांनीही रशियाचे अध्यक्ष पुतीन यांच्याशीही फोनवरून संपर्क साधला आहे. या भेटी दरम्यान झेलेन्स्की यांना स्पष्ट शब्दांत' रशिया मोठी ताकद आहे. त्यांच्यासमोर नमते घ्या व जागतिक शांततेसाठी दोघांनीही तडजोड करा' अशा स्पष्ट शब्दात ट्रम्प यांनी झेलेन्स्की यांना म्हटले आहे. याशिवाय झेलेन्स्की यांच्यासोबत युरोपियन देशांचे प्रतिनिधी देखील ट्रम्प यांना व्हाईट हाऊसमध्ये भेटले आहेत. यावेळी फ्रेंच राष्ट्राध्यक्ष मॅक्रोन यांनी जर तडजोड झाली नाही तर रशियावर कडक आर्थिक निर्बंध घालू असे स्पष्टपणे म्हटले. दरम्यान पुतीन यांनी ट्रम्प यांना झेलेन्स्की यांच्याशी वन टू वन चर्चा करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यावेळी ट्रम्प यांनी पुतीन यांना भेटीचे आश्वासन दिले आहे. यावेळी ट्रम्प यांनी ट्रूथ सोशल मिडिया अकाऊंटवरून ' हे एक चांगले पाऊल आहे चार वर्षांपासून सुरु असलेले युद्धाच्या पार्श्वभूमीवर ' अशी पोस्ट केली आहे.
सुत्रांच्या माहितीनुसार, सीझफायर न होता शांतीच्या मार्गाने युक्रेन रशिया युद्धविराम करण्याचा प्रस्ताव रशियासमोर व युक्रेन समोर आहेत. रशियाला युक्रेनचा डोनबास हा भाग जोडण्यासाठी पुतीन आग्रही असल्याने 'तो भाग त्यांनी रशियाच्या नियंत्रणात आणावा' असे ट्रम्प यांनी झेलेन्स्की यांना सूचवले आहे. बदल्यात युकेनचे १००० हून अधिक युद्धकैदी पुतीन यांनी सोडावेत असे ट्रम्प यांनी म्हटले. त्यामुळे लवकरच अमेरिका - युक्रेन- रशिया यांची तिहेरी बैठक होण्याची शक्यता आहे. मात्र युक्रेन आपला भाग सोडण्यासाठी सहजासहजी तयार होईल याची खात्री नाही असे सांगण्यात येत आहे. कारण रशियाशी 'विना अटी शर्ती बोलणी' होईल असे म्हटले आहे. त्यामुळेज जागतिक पातळीवरील अस्थिरतेचा फटका शेअर बाजारात होऊ शकतो अशी शक्यता आहे. सकाळी पहाटे गिफ्ट निफ्टीत घसरण झाली होती. परंतु कालप्रमाणे मिड स्मॉल कॅप, फायनांशियल सर्व्हिसेस, बँक शेअर्समध्ये असलेली तेजी आजही कायम राहिल का यावर बाजारातील गणिते अवलंबून असतील. पुढील दोन आठवड्यात ही तिहेरी बैठक होणार आहे.
काल युक्रेन युएस भेटीच्या पार्श्वभूमीवर भेटीपूर्वी काही तास गुंतवणूकदारांनी आपली सोन्यातील गुंतवणूक 'होल्ड' केली होती त्यामुळे गुंतवणूकदार सोन्यात नवीन गुंतवणूक करण्यास कचरत असल्याचे चित्र आहे. त्यापूर्वी सोन्यात किरकोळ रॅली झाली असली तरी घटलेल्या मागणीमुळे काल सोन्याच्या दरात भारतीय सराफा बाजारात काही बदल झाले नव्हते. आज सकाळच्या सत्रात सोन्याच्या जागतिक गोल्ड फ्युचर निर्देशांकात ०.०१% घसरण झाल्याने भारतीय बाजारातही आज सोन्याचे दर किरकोळ घसरले आहेत. त्यामुळे आजही सोन्याची दरपातळी स्थिर राहण्याची शक्यता आहे.
काल डॉलरच्या तुलनेत रूपयांच्या दरात वाढ झाल्याने यांचा भारतीय बाजारात तिजोरीला फायदा झाला. काल २३ पैशाने रूपयात वाढ झाल्याने परकीय चलनाच्या साठ्यातही संतुलन निर्माण होण्यास मदत झाली. कच्च्या तेलाच्या (Crude Oil) बाबतीत महत्वाची घडामोड म्हणजे युएसचे व्यापारी सल्लागार (Trade Advisor) पीटर नावारो यांनी भारताने रशियाकडून तेल खरेदी करू नये असा सल्ला दिलेला आहे. भारताकडून यावर काही प्रतिक्रिया आलेली नाही. याशिवाय नावारो यांनी ' भारताने युएसचा धोरणात्मक भागीदार व्हायचे असल्यास तसे वर्तन हवे' असा टोलाही त्यांनी लगावला आहे. कालपर्यंत कच्च्या तेलाच्या स्पॉट बुकिंग मागणीत घसरण झाल्याने तेलाचे दर घसरले होते. आज कच्च्या तेलाच्या निर्देशांकात व किंमतीत आणखी घसरण झाली. ट्रम्प व पुतीन यांच्या बोलणीसह झेलेन्स्की व पुतीन यांचीही भेट झाल्याने कच्चे तेल स्थिरावले आहे. सकाळपर्यंत कच्च्या तेलाचा WTI Futures निर्देशांक ०.५७% घसरला आहे तर Brent Future निर्देशांक ०.५३% घसरला आहे ज्यामुळे भारतीय बाजारातही तेलाचे दर स्वस्त होण्याची शक्यता आहे.
काल युएस बाजारात गुंतवणूकदारांनी ट्रम्प व झेलेन्स्की यांच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर सावधगिरी बाळगली होती. तसेच संमिश्र तिमाही व संमिश्र कमाई आकडेवारी समोर आल्याने नासडाक (०.०३%) वगळता डाऊ जोन्स (०.०७%), एस अँड पी ५०० (०.०१%) बाजारात घसरण झाली. युरोपियन बाजारातही एफटीएसई (०.२१%) वगळता सीएसी (०.५०%), डीएएक्स
(०.१८%) बाजारात घसरण झाली. आशियाई बाजारातील सकाळी सुरूवातीच्या कलातील गिफ्ट निफ्टी (०.०७%), निकेयी २२५ (०.३७%), तैवान वेटेड (०.२९%), कोसपी (०.३५%), जकार्ता कंपोझिट (०.२०%) बाजारात घसरण झाली असून शांघाई कंपोझिट (०.३०%), स्ट्रेट टाईम्स (०.२९%) बाजारात वाढ झाली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लाल किल्ल्यावरून दिलेल्या जीएसटी कपातीच्या घोषणेनंतर घरगुती गुंतवणूकदारांनी मोठा प्रतिसाद कालही बाजारात नोंदवला ज्याचा फायदा आगामी काळात एफएससीजी,ऑटो, शेअर्समध्ये वाढ झाली होती. आजही ही रॅली कायम राहिल का यावर बाजारातील सपोर्ट लेवल स्पष्ट होईल.
सकाळच्या सत्रात सर्वाधिक वाढ वर्धमान टेक्सटाईल (८.६८%), ओला इलेक्ट्रिक (६.४७%), वेलस्पून लिविंग (४.३४%), रेमंड लाईफस्टाईल (२.०९%), सीसीएल प्रोडक्ट (३.००%), इंजिनियर्स इंडिया (२.३२%), रिलायन्स इंडस्ट्रीज (२.२४%), भारती एअरटेल (१.८९%), आलोक इंडस्ट्रीज (१.७२%), सीपीसीएल (१.७०%), भारती एअरटेल (१.८९%), पीजी इलेक्ट्रोप्लास्ट (१.६६%), जेपी पॉवर (१.४८%), वोडाफोन आयडिया (१.७७%), हिरो मोटोकॉर्प (०.७८%), सम्मान कॅपिटल (०.७४%) समभागात वाढ झाली आहे. तर भारत डायनामिक्स (२.८६%), इंटलेक्ट डिझाईन २.८४%), कल्याण ज्वेलर्स (२.७९%), नुवामा वेल्थ (१.८५%), न्यूजेन सॉफ्टवेअर (१.४६%), लेमन ट्री हॉटेल (१.४६%), बजाज होल्डिंग्स (१.३३%), एसबीआय लाईफ इन्शुरन्स (१.२७%), क्रिसील (१.२२%), बजाज फायनान्स (१.२५%), जे एम फायनांशियल सर्व्हिसेस (१.०८%), सोलार इंडस्ट्रीज (१.०२%), होनसा कंज्यूमर (०.७७%), एचडीएफसी लाईफ इन्शुरन्स (०.७१%), ब्रिगेड एंटरप्राईजेस (०.६९%), डाबर इंडिया (०.५८%), आयसीआयसीआय बँक (०.४१%), एचडीएफसी बँक (०.२७%) समभागात घसरण झाली आहे.
आजच्या सकाळच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना चॉईस इक्विटी ब्रोकिंग प्रायव्हेट लिमिटेडचे वरिष्ठ तांत्रिक व डेरिएटिव विश्लेषक मंदार भोजने म्हणाले आहेत की,'भारतीय बेंचमार्क निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी मंगळवारी मजबूत उघडण्याची अपेक्षा आहे, जी गिफ्ट निफ्टीकडून मिळालेल्या संकेतांनुसार, आज सकाळी सुमारे २० अंकांनी वाढून २४९९२ पातळीच्या आसपास व्यवहार करत होते. १८ ऑगस्ट रोजी तिसऱ्या दिवशी बाजाराने तेजी दाखवली, तेलाच्या घसरणीमुळे, S&P रेटिंग अपग्रेडमुळे आणि जीएसटीमध्ये कपातीच्या आशांमुळे बाजाराने चांगली सुरुवात केली. दैनिक चार्टवर, निफ्टीने २४७०० पातळीच्या दिशेने संभाव्य पुलबॅकचे संकेत देत एक शूटिंग स्टार बनवला. तथापि, दर तासाचा आरएसआय (Relative Strength Index RSI) तेजीचा विचलन दर्शवितो, जो ताकद आणि वाढीची शक्यता दर्शवितो. FII लाँग-शॉर्ट रेशो फक्त ८% असल्याने, शॉर्ट कव्हरिंग तेजीला चालना देऊ शकते. प्रमुख आधार: २४७०० आणि २४६००; प्रमुख प्रतिकार (Main Resistanc) : २५००० आणि २५२०० पातळीवर बँक निफ्टीने ५४९००-५५००० पातळीच्या जवळ एक मजबूत आधार तयार केला आहे, जो लवचिकता दर्शवित आहे. दर तासाचा RSI सकारात्मक विचलन दर्शवित आहे, जो खरेदीदारांकडे गती बदलण्याचे संकेत देतो. अल्पकालीन दृष्टीकोन तेजीचा आहे आणि पुढील वाढीची शक्यता आहे. प्रमुख आधार: ५५५०० आणि ५५३००; प्रमुख प्रतिकार: ५६२०० आणि ५६५००. चार दिवसांच्या विक्रीनंतर, १८ ऑगस्ट रोजी परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार (FII) खरेदीदार बनले, त्यांनी ५५० कोटी किमतीचे शेअर्स खरेदी केले, तर घरगुती संस्थात्मक गुंतवणूकदार (DII) ने ४१०३ कोटी किमतीचे शेअर्स खरेदी केले. मंगळवारी भारतीय शेअर्स स्थिर सुरुवातीसाठी सज्ज आहेत, गिफ्ट निफ्टी २४९९५ +२९ अंकांनी वाढला. काल GST सुधारणांच्या चर्चांमुळे ऑटो, कंझम्पशन, मेटल आणि रिअल्टी स्टॉकच्या नेतृत्वाखाली निफ्टी आणि सेन्सेक्स १% ने वाढले. निफ्टी तेजीच्या गतीसह प्रमुख मूव्हिंग सरासरीपेक्षा जास्त व्यापार करत आहे. आधार: २४७००–२४६०० पातळीवर व जवळच्या काळात तळ (Base Level) : २४३३७ व वरचे लक्ष्य (Upper Target): २५००० आणि २५२०० पातळीवर '
आजच्या सकाळच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना जिओजित इन्व्हेसमेंट लिमिटेडचे मुख्य गुंतवणूक रणनितीकार डॉ वी के विजयाकुमार म्हणाले आहेत की,' व्हाईट हाऊसमधील चर्चेतून असे दिसून येते की "युद्ध संपण्याची वाजवी शक्यता आहे' आणि जर असे झाले तर रशियाकडून तेल खरेदी करण्यासाठी भारतावर लावण्यात आलेला दुय्यम कर अप्रासंगिक ठरेल. बाजाराच्या दृष्टिकोनातून हे सकारात्मक ठरू शकते. परंतु ट्रम्प प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसादाची अपेक्षा करणे अकाली ठरेल कारण भारत-अमेरिका संबंध ताणलेले आहेत आणि भारत रशियाशी आधीच मजबूत असलेले संबंध मजबूत करत असतानाच चीनशी संबंध सुधारण्यासाठी रणनीतिक पुढाकार घेत आहे.
दरम्यान, जीएसटी आघाडीवर सरकारकडून पुढील पिढीतील सुधारणांचे संकेत असलेल्या धोरणात्मक पुढाकारांमुळे बाजारपेठेच्या भावनांमध्ये लक्षणीय सुधारणा झाली आहे. तथापि, मूलभूत गोष्टींना (कमाई वाढ) प्रतिसाद देण्यासाठी वेळ लागेल. बाजारात सातत्यपूर्ण तेजी तेव्हाच येईल जेव्हा आपल्याला कमाई पुनरुज्जीवित होण्याचे संकेत मिळतील.'
त्यामुळे आज बाजारात अखेरपर्यंत वाढ ही सपाट स्थितीत असेल का वाढ होऊन रॅली होईल हे अखेरच्या टप्प्यात कळेल मात्र बाजारातील निफ्टीवर गुंतवणूकदारांचे विशेष लक्ष असण्याची शक्यता आहे. अस्थिरता निर्देशांक आणखी मिळाल्यास बाजाराला सपोर्ट लेवल मिळण्याची शक्यता आहे.