Monday, October 27, 2025
Happy Diwali

शाळा, महाविद्यालये यांना उद्या बुधवारी सुट्टी

शाळा, महाविद्यालये यांना उद्या बुधवारी सुट्टी

रत्नागिरी : जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. अनेक भागात मुसळधार पाऊस सुरु असल्याने खेड तालुक्यातील जगबुडी नदीने धोका पातळी ओलांडली आहे. चिपळूण येथील वाशिष्ठी, संगमेश्वरमधील शास्त्री, लांजामधील काजळी आणि राजापूर येथील कोदवली नदीने इशारा पातळी ओलांडली आहे.

अतिवृष्टीमुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास त्याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांवर होवू नये, याकरिता जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी, सरकारी व खासगी प्राथमिक, माध्यमिक, जिल्हा परिषद, नगरपालिका, अनुदानित व विनाअनुदानित शाळा, सर्व आश्रमशाळा, सर्व महाविद्यालये तसेच आयुक्त व्यवसाय व प्रशिक्षण केंद्र यांच्या आस्थापनेवरील शैक्षणिक संस्था यांना उद्या बुधवार २० ऑगस्ट रोजी सुट्टी जाहीर करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी हा आदेश काढला आहे.

आदेशात म्हटले आहे, प्रादेशिक हवामान विभागाच्या पूर्वसूचनेनुसार जिल्ह्यातील त्या-त्या भागातील स्थानिक परिस्थितीचा आढावा घेवून संपूर्ण जिल्ह्यामध्ये अथवा जिल्ह्यातील ठराविक स्थानिक क्षेत्रातील शाळांना सुट्टी जाहीर करण्याचे सक्षम प्राधिकारी असल्याने जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार प्रदान करण्यात आले आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यात उद्या २० ऑगस्ट रोजी ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. अनेक भागात मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये तसेच अतिवृष्टीमुळे अतिवृष्टीमुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास त्याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांवर होवू नये, याकरिता जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी, सरकारी व खासगी प्राथमिक, माध्यमिक, जिल्हा परिषद, नगरपालिका, अनुदानित व विनाअनुदानित शाळा, सर्व आश्रमशाळा, सर्व महाविद्यालये तसेच आयुक्त व्यवसाय व प्रशिक्षण केंद्र यांच्या आस्थापनेवरील शैक्षणिक संस्था यांना उद्या बुधवार २० ऑगस्ट रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >