मुंबई : मुंबईतील पूर्व उपनगरातील गोरेगाव-मुलुंड जोड रस्त्यावरील (GMLR) पुलाच्या कामामुळे बाधित होणारी १२०० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी वळविण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. या कामामुळे १८ तासांसाठी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. गुरुवार, २१ ऑगस्ट २०२५ रोजी स. १० वाजेपासून ते शुक्रवार, २२ ऑगस्टपर्यंत पहाटे ४ वाजेपर्यंत एकूण १८ तास ‘टी’ विभागातील काही भागांचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. ‘टी’ विभागातील नागरिकांनी पुढील ४ ते ५ दिवस पाणी उकळून व गाळून प्यावे असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून करण्यात आले आहे.
गोरेगाव-मुलुंड जोड रस्त्यालगतचा परिसर मुलुंड (पश्चिम), लाल बहादूर शास्त्री मार्ग लगतचा परिसर मुलुंड (पश्चिम), जवाहरलाल नेहरु मार्ग, देवीदयाल मार्ग, क्षेपणभूमी, डॉ. आर. पी. मार्ग, पी. के. मार्ग, झवेर मार्ग, महात्मा गांधी मार्ग, एन. एस. मार्ग, एस. एन. मार्ग, आर. एच. बी. मार्ग, वालजी लाढा मार्ग, व्ही. पी. मार्ग, मदन मोहन मालवीय मार्ग, एसीसी मार्ग, बी. आर. मार्ग, गोशाळा मार्ग, एस. एल. मार्ग, नाहुर गाव, इत्यादी. संबंधित विभागातील नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून पाण्याचा आवश्यक साठा करून ठेवावा, काटकसरीने पाणी वापरून सहकार्य करावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.






