अल्ट्रा-फास्ट-फॅशन ब्रँड लिबासचा मुंबईत विस्तार

  15

ओबेरॉय स्काय सिटी मॉल, बोरिवली येथे नवीन स्टोअर सुरु केले 


मुंबई: लिबास या भारतातील आघाडीच्या अल्ट्रा-फास्ट-फॅशन ब्रँडने मुंबईत विस्तार करताना १५ ऑगस्ट रोजी ओबेरॉय स्काय सिटी मॉल, बोरिवली येथे ४००० चौरस फुट जागेत पसरलेले नवीन स्टोअर सुरु केले. या विस्तारामधून भारताच्या सळसळत्या ऑफलाइन मार्केटमधील ब्रॅंडची सखोल उपस्थिती प्रतिबिंबित होते त्याच बरोबर २०२५ च्या अखेरपर्यंत ५० पेक्षा जास्त दुकाने सुरू कर ण्याच्या त्यांच्या व्यापक लक्ष्याच्या दिशेने उचललेले हे पाऊल आहे.


डिझाईनपासून ते सोर्सिंग आणि ग्राहक अनुभवापर्यंत लिबास हा ब्रँड नेहमी 'मेड इन इंडिया, मेड फॉर इंडिया' या आपल्या मूळ सिद्धांताशी निष्ठावान राहिला आहे. याच अभियानात यापुढे जी स्टो अर उघडणार आहेत, त्यामध्ये देखील याच विचाराचा विस्तार झालेला दिसेल.यात विविधता,वैयक्तिक अभिरुची आणि देशभरातील आधुनिक भारतीय स्त्रीच्या आकांक्षा यांना अग्रस्थान देण्यात ये ईल असे कंपनीने आपल्या निवेदनात म्हटले आहे.


लिबासचे संस्थापक आणि सीईओ सिद्धांत केशवानी म्हणाले,'हा विस्तार आमच्या विकासाच्या आलेखातील एक निर्णायक टप्पा आहे. आम्ही समस्त देशात आमची उपस्थिती मजबूत करत आहोत. या उच्च-प्रभाव असलेल्या मार्केटमध्ये प्रवेश करून आम्ही ‘लिबास’ला आम्हाला प्रेरणा देणाऱ्या आणि आम्हाला घडवणाऱ्या आधुनिक भारतीय महिलांच्या आणखी जवळ धोरणात्मक पद्ध तीने घेऊन जात आहोत. आमचे ’११ स्टेप्स क्लोझर कॅम्पेन’ ही भारताच्या विविध प्रांतांमधील फॅशन-फॉरवर्ड महिलांना दिलेली सलामी आहे. देशाच्या टियर १ आणि टियर २ शहरांमध्ये विस्तार क रत असताना लिबासचा वैशिष्ट्यपूर्ण अनुभव देण्याबरोबरच स्थानिक सौंदर्यदृष्टीचा देखील मान रखणाऱ्या समर्पित जागा निर्माण करण्यास आम्ही वचनबद्ध आहोत. आमचे प्रत्येक स्टोअर ही आम च्या लक्ष्यित ग्राहकांशी अर्थपूर्ण संवाद साधण्याची, त्यांचे मत जाणून घेण्याची आणि त्यांना आवडेल असा फॅशन अनुभव निर्माण करण्याची एक संधी आहे.'


नवीन सुरू होत असलेली स्टोअर्स हा लिबासच्या २०२५ च्या व्यापक किरकोळ आणि व्यवसाय धोरणाचा भाग आहेत, ज्यांचा उद्देश भारतीय फॅशनसाठी एक डिझाईन-प्रेरित, डिजिटली सक्षम आ णि सांस्कृतिकदृष्ट्या अनुकूल ईकोसिस्टम उभारण्याचा आहे. वेगाने वाढत असलेल्या शहरी आणि निम-शहरी बाजारांवर विशेष ध्यान केंद्रित करून लिबास आपल्या प्रवासाच्या पुढील टप्प्यात ग ती, स्टाइल आणि धोरणाची सांगड घालेल.

Comments
Add Comment

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सुरू केले ‘लाडकी सून’ अभियान

ठाणे: 'लाडकी बहीण' योजनेच्या यशामुळे उत्साहित होऊन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिलांसाठी

फास्टॅग वार्षिक पासला देशभरातून प्रचंड प्रतिसाद, चार दिवसांत तब्बल इतक्या लोकांनी केला बुक

नवी दिल्ली: भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) नुकत्याच सुरू केलेल्या फास्टॅग

श्रीगोंद्यात महिलेला पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न !

श्रीगोंदा : सुरोडी (ता. श्रीगोंदा) येथील मिनाक्षी रामदास सकट (वय ३८ ) यांच्यावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न

तानसा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

पालघर : पालघर जिल्ह्यातील महत्त्वाचे जलस्रोत असलेल्या तानसा धरणाचे पाणी पातळी पूर्ण क्षमतेला पोहोचल्यामुळे आज

भिवंडीत साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी आला स्पायडरमॅन !

ठाणे : भिवंडीत भाजी मार्केटमध्ये साचलेले पाणी काढण्यासाठी चक्क स्पायडरमॅन आल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर

देवनार पोलीस अधिकाऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने अचानक मृत्यू!

मुंबई: देवनार पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक कृष्णा आत्माराम जोशी (५७) यांचा १७ ऑगस्ट रोजी