Rain Update: सलग तिसऱ्या दिवशी मुंबईत धुंवाधार पाऊस, लोकल वाहतुकीवर परिणाम


मुंबई: मुंबईत सलग तिसऱ्या दिवशी धुंवाधार पाऊस कोसळत आहे. शनिवारपासून पावसाने चांगलाच जोर धरला आहे. आज आठवड्याच्या पहिल्या दिवशीही पहाटेपासून पावसाने जोर धरला आहे. मुंबईसोबतच पश्चिम उपनगरांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.


पश्चिम उपनगरांमध्ये अंधेरी, मालाड, जोगेश्वरी, कांदिवली, बोरिवली तसेच दहिसर, विलेपार्ले, सांताक्रुझ, वांद्रे या भागांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे सकाळी कामावर जाणाऱ्या नोकरदारवर्गाला त्रासाला सामोरे जावे लाग आहेत. आज मुंबईला ऑरेंज अलर्ट आहे. या मुसळधार पावसाचा फटका लोकल वाहतुकीवरही झाला आहे. मध्य रेल्वेची वाहतूक पाच ते दहा मिनिटे तसेच हार्बर रेल्वेची वाहतूक पाच मिनिटे उशिराने सुरू आहे.



हवामान विभागाचा इशारा


हवामान विभागाने पुणे जिल्ह्यासाठी रेड अलर्ट तर मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर तसेच यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या विदर्भातील जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर मुंबई, रायगड, रत्नागिरी, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे.



तलाव व धरणे ओसंडली


सांताक्रूझसह मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईकरांना पाणीपुरवठा करणारा तुळशी तलाव ओसंडून वाहू लागला आहे. तसेच मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांमधील पाणीसाठा ९०% वर पोहोचला असून मुंबईकरांचे पाण्याचे टेन्शन आटोपशीर झाले आहे.


महाराष्ट्रात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा इशारा असून प्रशासनाने सर्व नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.



Comments
Add Comment

Holiday : मुंबईत दहीहंडी ऐवजी रक्षाबंधनला मिळणार शासकीय सुट्टी

मुंबई : यंदा मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यात दहीहंडी ऐवजी रक्षाबंधनच्या दिवशी शासकीय सुट्टी मिळणार आहे. या

National Highway : राष्ट्रीय महामार्गालगत नवीन ढाबे, हॉटेल्स आणि व्यावसायिक बांधकामांना बंदी

राज्य सरकारचा निर्णय; अनधिकृत बांधकामे ६० दिवसांच्या आत पाडण्याचे निर्देश मुंबई : राष्ट्रीय महामार्गांवर

Mumbai Cyber Security : मुंबईची सायबर सुरक्षितता राष्ट्रीय आर्थिक सुरक्षेची प्राथमिकता; भारत-इस्रायल सहकार्य वाढवण्याचे आवाहन

मुंबई: मुंबईची सायबर सुरक्षितता ही केवळ माहिती तंत्रज्ञानापुरती मर्यादित बाब नसून देशाच्या आर्थिक सुरक्षेची

Charging Stations : ई-वाहनांसाठी चार्जिंग स्टेशनचे जाळे विस्तारते; आरटीओ, एसटी आणि बेस्टचा पुढाकार

मुंबई : राज्यात ई-वाहनांची संख्या सातत्याने वाढत असताना त्यांना आवश्यक असलेल्या चार्जिंग पायाभूत सुविधांच्या

Devendra Fadnavis : 'एफसीआरए' विधेयकामुळे अमेरिकेतील काहींना मिरची का लागली?

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; हे विधेयक कोणत्याही धर्माच्या किंवा समुदायाच्या विरोधात नाही मुंबई : केंद्र

BMC News : एच पूर्व विभागात पदपथ अतिक्रमण मुक्त मोहीम जोरात; नेहरू रोडवरील अतिक्रमणांवर संयुक्त कारवाई

- अनधिकृत बांधकामांसह फेरीवाल्यांचे साहित्य जागच्या जागीच केले जाते नष्ट मुंबई ( विशेष प्रतिनिधी) : सांताक्रूझ