
मोहित सोमण:आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात अखेरच्या सत्रातही रॅली कायम राहिली आहे. बाजार बंद होताना सेन्सेक्स ६७६.०९ कंठाने उसळत ८१२७७३.७५ पातळीवर स्थिरावला आहे त र निफ्टी ५० निर्देशांक २४५.६५ अंकांने उसळत २४८७६.९५ पातळीवर स्थिरावला आहे. मात्र सकाळच्या ११०० अंकाने वाढलेल्या बाजाराला अखेरीस मात्र चाप बसला आहे. हेवीवेट ऑटो शेअर्स मध्ये आज वाढ झाली होती ती अखेरीसही कायम राहिली. मात्र काही बड्या शेअर्समध्ये झालेल्या घसरणीमुळे अखेर निर्देशांकात चाप बसला आहे. प्रामुख्याने हा चाप आयटीसी,इटर्नल, टेक महिं द्रा, एल अँड टी यांसारख्या शेअर्समध्ये झालेल्या घसरणीने झाला. दुसरीकडे मात्र हेवीवेट एचडीएफसी बँक, बजाज फायनान्स, मारूती सुझुकी, महिंद्रा अँड महिंद्रा या शेअर्समध्ये मोठी रॅली झा ली ज्यामुळे आज बाजार अखेरीस 'हिरव्या' अंकातच बंद झाले आहे.
सेन्सेक्स मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे १.००%,१.३९% इतकी मोठी वाढ झाली असून निफ्टी मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे १.०८%,१.३८% वाढ झाली आहे. निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकात ( Nifty Sectoral Indices) यामध्येही आज डाऊन ट्रेंड पहायला मिळाला. सकाळच्या सत्रात सगळेच क्षेत्रीय निर्देशांकात वाढ झाली असताना बाजार बंद होताना मात्र हेल्थकेअर (०.०८%), फार्मा (०.०५%), मिडिया (०.२२%), आयटी (०.५७%) निर्देशांकात घसरण झाली आहे. सर्वाधिक वाढ सकाळप्रमाणेच ऑटो (४.१८%), फायनांशियल सर्व्हिसेस (१.२०%), मेटल (१.८६%), रिअल्टी (२ .१७%), खाजगी बँक (१.०१%), कंज्यूमर ड्युरेबल्स (३.२८%), फायनांशियल सर्व्हिसेस एक्स बँक (२.११%) निर्देशांकात झाली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून दिलेल्या भाषणात मोठ्या प्रमाणात जीएसटी करात कपात करण्याची घोषणा केली होती ज्याचा फायदा बाजारात आज ठळकपणे पहायला मिळाला आहे. विशेषतः अखेरच्या सत्रात ऑटो (४.१८%) कंज्यूमर ड्युरेबल्स (३.२८%) मध्ये झाली. घरगुती वापरासाठी, व जीवनावश्यक वस्तूंच्या किमती कमी होण्याची शाश्वती मिळाल्याने सकाळपासून च बाजारात भावनाच सकारात्मक होत्या ज्यामुळे आज गुंतवणूकदारांनी मोठा प्रतिसाद बाजारात दिला. विशेषतः बाजार सुरू झाल्यावरच अस्थिरता निर्देशांक (VIX Volatility Index) ४% पेक्षा अधिक पातळीवर उसळला होता तो बंद होताना ०.१२% घसरला व मिड व स्मॉल कॅप समभागातील झालेली वाढ या दोन्ही कारणांमुळे बाजाराला सपोर्ट लेवल मिळण्यास मदत झाली. बँक व फा यनांशियल सर्व्हिसेस शेअर्सनेही तुलनात्मकदृष्ट्या चांगली कामगिरी केली होती. मात्र अखेरीस त्यातील चढणारा निर्देशांक अखेरीस काही प्रमाणात थंडावला. जीएसटी आकारणीत केवळ ५% व १८% असे दोन स्लॅब्स येणार असल्याने बाजारासाठी ही मोठी गोष्ट घडली.
दुसरीकडे जागतिक अस्थिरतेतही घट झाल्याने आज बाजारात 'विन विन सिच्युएशन' कायम होती. युएस राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे आगामी काळात युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांना भेटणार आ हेत. दुसरीकडे रशिया युएस गाठीभेटीनंतर रशिया व अमेरिका यांच्यातील शीतयुद्ध काही प्रमाणात नरमले आहे. काही अटींवर पुतीन यांनी युद्धबंदीसाठी तयारी दर्शवली असली तरी झेलेन्स्की यांची भूमिका आगामी भूराजकीय स्थिती स्पष्ट करतील. याखेरीज भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांना भारतात आमंत्रित केल्याने त्यावरही गुंतव णूकदार बारकाईने लक्ष ठेवून आहेत. अमेरिकेतील तज्ञंच्या मते सप्टेंबर महिन्यात युएस फेड व्याजदरात कपात होऊ शकते ज्यामुळे सध्या युएस बाजारातही औत्सुक्याचे वातावरण होते. मात्र अ खेरीस टेकसह, मेटल व इतर हेवी वेट शेअरमध्ये घसरण झाल्याने युएस बाजारातील डाऊ जोन्स (०.०८%), एस अँड पी (०.२९%), नासडाक (०.४०%) घसरण झाली आहे. युरोपियन बाजारातही आगामी टॅरिफमुळे निर्माण झालेली अस्थिरता याकारणाने तिन्ही बाजारात घसरण झाली. ज्यात एफटीएसई (०.०७%), सीएसी (०.७३%), डीएएक्स( ०.३२%) बाजारात घसरण झाली. आशियाई बाजारातील बघितल्यास संध्याकाळपर्यंत गिफ्ट निफ्टी (०.००%) सपाट राहिला असून निकेयी (०.८८%), तैवान वेटेड (०.६०%), शांघाई कंपोझिट (०.८४%) या बाजारात झाली. तर इतर कोसपी (१.५२%), स्ट्रेट टाईम्स (१.०३%), सेट कंपोझिट (१.३८%), हेंगसेंग (०.४१%) निर्देशांकात घसरण झाली आहे.
दबाव पातळी घटल्याने व गुंतवणूकदारांनी पुन्हा आपला एकदा मोर्चा सोन्याच्या गुंतवणूकीत वळवल्याने आज सोन्यात किरकोळ वाढ झाली आहे.दोन दिवसांच्या घसरणीनंतर ही पुन्हा वाढ वाढले ल्या स्पॉट बेटिंग मुळे जागतिक पातळीवर झाले. मात्र त्याचा भारतावर परिणाम न झाल्याने सोन्याचे दर आज बदलले नसून स्थिर आहेत. जागतिक सोन्याच्या गोल्ड फ्युचर निर्देशांकात ०.३५% वा ढ झाली होती. आज डॉलरच्या तुलनेत रूपयात ०.२३ अंकांने मोठी वाढ झाल्याने डॉलर दरपातळी आज घसरली आहे. दुसरीकडे युएस व्हाईट हाऊसचे व्यापार सल्लागार (Trade Advisor) पी टर नावारो यांनी भारताने रशियाकडून कच्चे तेल खरेदी केल्याने रशिया युक्रेन युद्धात फंडिग मिळाले असे वक्तव्य केला ज्याचा परिणाम स्पॉट गुंतवणूकीत झाला आहे. संध्याकाळपर्यंत तेलाच्या WTI Futures निर्देशांकात ०.४५% वाढ झाली असून Brent Future निर्देशांकात ०.२९% घसलण झाली आहे. या आशावादात भर घालत जागतिक दर्जाची रेटिंग एजन्सी एस अँड पी ग्लोबल रे टिंग्जने भारताचे सार्वभौम क्रेडिट रेटिंग बीबीबी- वरून बीबीबी पर्यंत वाढवले आहे, ज्यामध्ये स्थिर दृष्टीकोन आहे, जो १८ वर्षांहून अधिक काळातील पहिलाच अपग्रेड असेल.
अखेरच्या सत्रात बाजार बंद होताना सर्वाधिक वाढ मारूती सुझुकी (८.७५%), पीफीजर (८.२३%), होडांई मोटर्स (८.१५%),अशोक लेलँड (८.०४%), अंबर एंटरप्राईजेस (७.८८%), गोदरेज इंड स्ट्रीज (७.८३%), अपोलो टायर्स (७.४४%), एन्ड्युरंस टेक्नॉलॉजी (७.१६%), ब्लू स्टार (७.३१%), बाटा इंडिया (६.७३%), टीव्हीएस मोटर्स (६.०६%), व्होल्टास (५.८४%), न्यू इंडिया ॲशुरन्स (५. ७९%), अदानी एनर्जी (५.८५%), रेमंड लाईफस्टाईल (५.५१%), लेमन ट्री हॉटेल (५.३२%), बजाज फायनान्स (५.०८%), वोडाफोन आयडिया (५.०४%), नेस्ले इंडिया (५.०२%), नेस्ले इंडिया (५ .०२%), बजाज ऑटो (४.५७%), सीएट (४.५६%), एमआरएफ (४.३६%), एचडीएफसी एएमसी (४.१२%), डाबर इंडिया (३.६३%), हिंदुस्थान युनिलिव्हर (३.५३%), ट्रेंट (२.७७%), अदानी ग्रीन (२.६३%), आयशर मोटर्स (२.५७%), एसईएमई सोलार होल्डिंग्स (२.१०%), टाटा मोटर्स (१.७२%), एचडीएफसी बँक (०.६३%), रिलायन्स इंडस्ट्रीज (०.५८%) या समभागात झाली आहे.
आज अखेरच्या सत्रात सर्वाधिक घसरण गॉडफ्रे फिलिप्स (५.२२%), टेक्नो इंजिनिअरिंग (३.५८%), ग्लेनमार्क फार्मा (३.४६%), सुझलोन एनर्जी (३.३१%), हिताची एनर्जी (३.०४%), कल्याण ज्वेल र्स (२.४९%), एचपीसीएल (१.८५%), जेपी पॉवर वेचंर (१.६७%), सिमेन्स (१.६१%), जेपी पॉवर वेचंर (१.६७%), टेक महिंद्रा (१.०४%), नुवामा वेल्थ मॅनेजमेंट (१.१२%), एनटीपीसी (०.९७%), इ न्फोसिस (०.८२%) समभागात झाली आहे.
आजच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना ज्येष्ठ बाजार विश्लेषक अजित भिडे म्हणाले आहेत की,'जीएसटीमध्ये कमी होण्याच्या शक्यतेनंतर एस अँड पी ने भारताचे मानांक नात केलेली वाढ व टॅरिफ परीणाम विशेष होणार नाही हे केलेले शेरेबाजी मुळे बाजार सुरूवातीलाच ११४ पर्यंत वाढुन ६७५ ची वाढ आज कायम राहीली.व आठवड्याची सुरूवात तर छान झाली. कदाचित पुढील टॅरिफ येणारही नाही.या सर्व गोष्टींमुळेच आज बाजारात चैतन्य होतै.भारताने अलास्का मिटींग ठरविण्यात मध्यस्थी केल्या मुलेच युक्रेन व ट्रम्प भेट आज होणार आहे. या सर्व घट नाक्रमाचाही पाॅझिटिव इफेक्ट बाजारात पहायला मिळाला. बाजारात विदेशी गुंतवणूकदारांकडून होणारी विक्री हाच मुख्य मुद्दा आहे.देश विदेशातील आर्थिक परिस्थितीवर हे गुंतवणूकदार गुंतव णूक करीत असतात एसअँडपीच्या मानांकनाचे परीणाम होत असतात. हळुहळु टॅरिफ व अमेरिकेच्या निर्यात धोरणामुळे भारतावर विशेष परीणाम होणार नाहीत. आज संपूर्ण बाजारात चैतन्य हो ते.बजाज फायनान्सने आज फायनान्स सेक्टर ला लीड केले.बॅका, रिलायन्स ,मारूती यांनी बाजार तेजी टिकवली. ऑटो सेक्टर व डिफेन्स हे पुढील वाटचालीत महत्वपूर्ण असतील.सॉफ्टवेअर स र्विसेस यावरील परिणाम काय होईल हे पहाणे जरूरी आहे.आज अमेरिकन प्रभाव आमचावर होणार नाहीत हे बाजाराने दाखवून दिले.'
आजच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना बजाज ब्रोकिंग रिसर्चने म्हटले आहे की,'बेंचमार्क निर्देशांकांमध्ये सुमारे १% ची तेजी दिसून आली, ज्यामुळे ऑटो, कंझम्पशन, मेट ल आणि रिअल्टी समभागांमध्ये मोठी वाढ झाली. वस्तू आणि सेवा कर (GST) रचनेत सुव्यवस्थित बदल झाल्याच्या वृत्तामुळे गुंतवणूकदारांच्या भावना उत्साहित झाल्या, ज्यामुळे खर्च आणि इंधन वापर वाढण्याची अपेक्षा होती. निफ्टी मजबूत पातळीवर उघडला आणि सत्राच्या मध्यात तो २५०२२ पातळीच्या इंट्राडे उच्चांकावर पोहोचला. तथापि, उच्च पातळीवर काही नफा बुकिंगमुळे निर्दे शांक त्याच्या वाढीचा काही भाग कमी झाला आणि अखेर २५१ अंकांनी किंवा १.०२% ने वाढून २४८८२.५० पातळीवर बंद झाला. क्षेत्रानुसार, निफ्टी ऑटोने ४.१८% च्या उत्कृष्ट वाढीसह आघाडी घेतली, त्यानंतर निफ्टी रिअल्टी २.१७% आणि निफ्टी मेटल १.८६% ने वाढले. एफएमसीजी (FMCG) आणि पीएसयु (PSU) बँक निर्देशांक देखील अनुक्रमे १.२% आणि ०.४% ने वाढून सकारा त्मक व्यवहार करत होते. नकारात्मक बाजूने, निफ्टी आयटी ०.५७% ने घसरला, तर ऊर्जा, फार्मा आणि मीडिया क्षेत्रे मोठ्या प्रमाणात स्थिर राहिली. व्यापक बाजारपेठांनी बेंचमार्कपेक्षा चांगली कामगिरी केली, निफ्टी मिडकॅप १०० मध्ये १.०८% वाढ झाली आणि निफ्टी स्मॉलकॅप १०० मध्ये १.३८% वाढ झाली.'
आजच्या बाजारातील निफ्टीवर भाष्य करताना बजाज ब्रोकिंग रिसर्चने म्हटले आहे की,' निर्देशांकाने एक बेअर कॅन्डल तयार केली आहे ज्यामध्ये वरचा भाग बराच मोठा आहे आणि त्या च्या बेसच्या खाली (२४६३१-२४८५२) ते २५००० पातळीच्या आसपास नफा बुकिंग दर्शविते. या प्रक्रियेत निर्देशांक २० आणि ५० दिवसांच्या ईएमए (Exponential Moving Average EMA) च्या वर बंद झाला. सोमवारच्या उच्चांक (२५०२२) पातळीवरील फॉलो-थ्रू ताकद पुढे नेल्यास येत्या सत्रात २५२५० पातळीच्या दिशेने वर उघडेल. असे करण्यात अयशस्वी झाल्यास २५०००-२४५० ० पातळीच्या श्रेणीत एकत्रीकरणाचे संकेत मिळतील. निफ्टीसाठी तात्काळ आधार २४५०० पातळींवर ठेवण्यात आला आहे, तर प्रमुख आधार २४०००-२४२०० श्रेणीच्या आसपास ठेवण्यात आला आहे जो २०० दिवसांच्या ईएमए (EMA) च्या संगमाने आणि फेब्रुवारी आणि मार्च २०२५ च्या स्विंग हायमधून काढलेल्या चढत्या ट्रेंडलाइनने चिन्हांकित केला आहे, ज्यामुळे तो जवळच्या काळासा ठी एक प्रमुख मागणी क्षेत्र बनला आहे.'
आजच्या बाजारातील बँक निफ्टीवर भाष्य करताना बजाज ब्रोकिंग रिसर्चने म्हटले आहे की,' बँक निफ्टीने एक बेअर कॅन्डल तयार केला आहे ज्यामध्ये वरचा मोठा सावली आहे आणि त्या च्या बेसच्या खाली (५५,६४७-५५,३४२) तेजीचा दर ५६००० पातळीच्या आसपास नफा बुकिंग दर्शवित आहे. गेल्या काही सत्रांमध्ये खरेदीची मागणी १०० दिवसांच्या ईएमए (EMA) वरून दिसून आली आहे. आम्हाला अपेक्षा आहे की निर्देशांक ५४८००-५६३०० च्या श्रेणीत एकत्रित होईल. या श्रेणीच्या पलीकडे जाणारी हालचाल पुढील दिशात्मक हालचालीचे संकेत देईल. प्रमुख आधार क्षेत्र ५४,८०० आणि ५५००० एक असा भाग आहे जो १००-दिवसांच्या घातांकीय मूव्हिंग अँव्हरेज (EMA) आणि मागील वरच्या हालचालीपासून प्रमुख फिबोनाची रिट्रेसमेंट पातळींशी जुळतो.५४८०० पातळीच्या खाली खंडित झाल्यास ५४००० पातळींकडे नकारात्मक बाजू उघडेल. वरच्या बाजूला, प्रतिकार (Resistance) सुमारे ५६०००-५६३०० श्रेणीत दिसून येतो, जो अलीकडील ब्रेकआउट क्षेत्र आणि संपूर्ण घसरणीच्या ५०% रिट्रेसमेंटशी संबंधित आहे (५७६२८-५४९०५) पातळीवर '
आजच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना मोतीलाल ओसवाल फायनांशियल सर्व्हिसेसचे हेड ऑफ रिसर्च वेल्थ मॅनेजमेंटचे सिद्धार्थ खेमका म्हणाले आहेत की,' पंतप्र धानांनी स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात दुसऱ्या पिढीतील जीएसटी सुधारणांची घोषणा केल्यानंतर, देशांतर्गत शेअर बाजारांमध्ये जोरदार तेजी दिसून आली. निफ्टी ५० २४६ अंकांनी वाढून २४,८७७ ( +१%) वर बंद झाला. यामुळे निफ्टी ऑटो आणि कंझ्युमर ड्युरेबल्सच्या नेतृत्वाखाली व्यापक खरेदी सुरू झाली, ज्यामध्ये अनुक्रमे ४% आणि ३% वाढ झाली, तर निफ्टी एफएमसीजी १.२% वाढ ले. एस अँड पीने भारताचे सार्वभौम क्रेडिट रेटिंग 'बीबीबी-' वरून 'बीबीबी' केले, ज्यामुळे १८ वर्षांमध्ये अशी पहिलीच सुधारणा झाली. एजन्सीने दहा भारतीय वित्तीय संस्थांचे रेटिंग देखील वाढव ले, मजबूत वाढीच्या शक्यतांचा हवाला देत, ज्यामुळे बँकिंग आणि वित्तीय समभागांमध्ये आशावाद निर्माण झाला. याव्यतिरिक्त, अमेरिका-रशिया शांतता चर्चेत उत्साहवर्धक प्रगती होत असताना भारतावरील अतिरिक्त २५% यूएस टॅरिफ परत घेण्याची शक्यता असल्याने गुंतवणूकदारांच्या विश्वासाला पाठिंबा मिळाला.
उत्पन्नाच्या बाबतीत, पहिल्या तिमाहीचे निकाल मोठ्या प्रमाणात सुसंगत राहिले आहेत, आर्थिक वर्ष २६ मध्ये निफ्टी ईपीएस वाढ ~९% पर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे (वित्त वर्ष २५ मध्ये १% च्या तुलनेत), आर्थिक आणि आर्थिक प्रोत्साहनामुळे सकारात्मक देशांतर्गत मॅक्रोमुळे. ग्राहकांच्या मुख्य विभागाने अपेक्षेपेक्षा चांगले महसूल प्रिंट्स आणि व्यवस्थापन भाष्य नोंदवले आहे, जे कंपनीच्या वाढीच्या पुढाकारांसह आणि उपभोग पुनरुज्जीवनासह (Consumption Revival) ग्राहक क्षेत्रात व्हॉल्यूम-नेतृत्वाखालील महसूल वाढ चालना देण्याची अपेक्षा आहे, ज्यामध्ये विवेकाधीन (Discr etionary) नावे समाविष्ट आहेत. धोरणात्मक सुधारणा (जीएसटी २.०), सार्वभौम (Sovereign) रेटिंग अपग्रेड, संभाव्य टॅरिफ रिलीफ, आरबीआय आणि सरकारी प्रोत्साहन, मान्सून-नेतृत्वाखाली ल उपभोग पुनरुज्जीवन आणि सणासुदीच्या मागणीचे संयोजन २ आफ्रिका २०२६ मध्ये कॉर्पोरेट उत्पन्नात मजबूत पुनर्प्राप्ती आणू शकते. अशा प्रकारे, पुढील ६-९ महिन्यांत आम्ही भारतीय इक्वि टीजबद्दल सकारात्मक दृष्टिकोन राखतो.'
आजच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना अशिका इन्स्टिट्युशनल इक्विटीजने म्हटले आहे की 'छोट्या गाड्यांवरील वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) सध्याच्या २८% वरून १ ८% पर्यंत कमी करण्याचा विचार सरकार करत असल्याच्या वृत्तानंतर भारतीय शेअर बाजारांनी आठवड्याची सुरुवात चांगली केली. रॉयटर्सने उद्धृत केलेल्या एका सरकारी अधिकाऱ्याच्या मते, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली २०१७ मध्ये जीएसटी व्यवस्था लागू झाल्यानंतरच्या उपभोग कर कपातीच्या सर्वात महत्त्वाच्या संचाचा हा एक भाग आहे.या बातमीने बाजारातील भावना उं चावल्या, सुरुवातीच्या घंटागाडीपासूनच तीक्ष्ण तेजी दिसून आली. क्षेत्रीय कामगिरीने ऑटोमोबाईल्स, कंझ्युमर ड्युरेबल्स, कन्झ्युमर ड्युरेबल्स, कन्झ्युमर आणि मेटलमध्ये मजबूत वाढ दिसून आ ली, तर आयटी आणि मीडिया शेअर्स मागे पडले. डेरिव्हेटिव्ह्जच्या आघाडीवर, एकूण अँडव्हान्स-डिकलाइन रेशोने तेजीचा पक्षपात दर्शविला.उल्लेखनीय म्हणजे, मारुती, युनो मिंडा,आयशर मो टर्स, अशोक लेलँड आणि हिरो मोटोकॉर्प सारख्या प्रमुख ऑटो काउंटरमध्ये ओपन इंटरेस्टमध्ये वाढ दिसून आली, ज्यामुळे ऑटोमोबाईल क्षेत्रात वाढलेली सहभाग आणि आशावाद दिसून आला.'
आजच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना जिओजित इन्व्हेसमेंट लिमिटेडचे हेड ऑफ रिसर्च विनोद नायर म्हणाले आहेत की,' जीएसटीचे प्रस्तावित तर्कसंगतीकरण हे दे शांतर्गत बाजारपेठेसाठी भावना वाढवणारे आहे. याव्यतिरिक्त, अमेरिका आणि रशिया शिखर परिषदेच्या अलिकडच्या निष्कर्षामुळे, भू-राजकीय तणावात कोणतीही वाढ न होता, गुंतवणूकदारां ची चिंता कमी झाली आहे. ऑटोमोबाईल क्षेत्राने चांगली कामगिरी केली आणि अपेक्षित कर सुधारणांचा एक प्रमुख लाभार्थी म्हणून उदयास आले. आर्थिक वर्ष २६ च्या दुसऱ्या सहामाहीत, मागणी पुनरुज्जीवनामुळे उपभोग-केंद्रित क्षेत्रे काही प्रमाणात तेजी दाखवतील अशी आम्हाला अपेक्षा आहे.'
आजच्या बाजारातील निफ्टीतील हालचालीवर भाष्य करताना एलकेपी सिक्युरिटीजचे वरिष्ठ तांत्रिक विश्लेषक रूपक डे म्हणाले आहेत की,'निफ्टीमध्ये गॅप-अपसह सुरुवात झाली परं तु २५००० पातळीवर सुरुवातीला प्रतिकाराचा सामना करावा लागला, ज्यामुळे उच्च पातळीवर नफा बुकिंगमुळे इंट्राडे घसरण झाली. तथापि, भावना सकारात्मक राहते, येत्या काही दिवसांत २५० ०० पातळीवर पुन्हा येण्याची शक्यता आहे. तात्काळ आधार २४८०० पातळीवर आहे, ज्याच्या खाली निर्देशांक २४५०० पातळीच्या दिशेने जाऊ शकतो. वरच्या बाजूस, २५००० पातळीच्या वर निर्णायक हालचालीमुळे बाजारात मोठी तेजी येऊ शकते.'
आजच्या बाजारातील रूपयावर भाष्य करताना एलकेपी सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष रिसर्च विश्लेषक जतीन त्रिवेदी म्हणाले आहेत की,'दिवाळीच्या आसपास जीएसटी कपातीची घोषणा होण्याची शक्यता असल्याने रुपया ०.२४ पैशांनी वधारून ८७.३१ वर बंद झाला. जीएसटी परिषद आणि पीएमओच्या बैठका राजकोषीय चालना देण्यासाठी आयोजित करण्यात आल्या आहेत.अ मेरिकन टॅरिफ मुद्द्यांमुळे निर्यातीवरील ताण वाढत असताना धोरणकर्ते अर्थव्यवस्थेला मदत करण्याचा विचार करत असताना हे पाऊल उचलण्यात आले आहे. रुपयाची श्रेणी ८७.००-८७.७५ दर म्यान दिसू शकते.'
त्यामुळे उद्याच्या बाजारातही ही रॅली राहील हे उद्या कळेल मात्र फायनांशियल सर्व्हिसेस, बँक,ऑटो, मेटल, एफएमसीजी रिअल्टी, आयटी या शेअर्समध्ये होणारी हालचाल पाहणे महत्त्वाचे ठरणा र आहे.