Thursday, November 13, 2025

नेपाळच्या पंतप्रधानांना भारत दौऱ्याचे निमंत्रण

नेपाळच्या पंतप्रधानांना  भारत दौऱ्याचे निमंत्रण
काठमांडू : नेपाळच्या दोनदिवसीय दौऱ्यावर असलेले भारतीय परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी रविवारी पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांची भेट घेऊन त्यांना भारत दौऱ्याचे औपचारिक निमंत्रण दिले. पंतप्रधानांच्या सरकारी निवासस्थानी सकाळी झालेल्या या भेटीत मिस्री यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वतीने भारत दौऱ्याचे निमंत्रण पत्र पंतप्रधान ओली यांना सुपूर्द केले. परस्पर सहमतीनंतर पंतप्रधान ओली यांचा भारत दौरा १६ सप्टेंबरपासून निश्चित करण्यात आला आहे.
Comments
Add Comment