रत्नागिरी: गौरी-गणपतीच्या उत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांच्या सुरक्षित आणि सुरळित प्रवासासाठी प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार येत्या २३ ऑगस्टपासून मुंबई-गोवा महामार्गावर १६ टन किंवा त्यापेक्षा अधिक वजनाच्या अवजड वाहनांच्या वाहतुकीवर बंदी लागू करण्यात आली आहे.
बंदीचे कारण?
गणेशोत्सव २७ ऑगस्ट रोजी सुरू होणार असून तेव्हा होणारी वाहनांची गर्दी लक्षात घेऊन २३ ते २९ ऑगस्ट रात्री १२ वाजेपर्यंत अवजड वाहनांची वाहतूक बंद राहणार आहे.
उत्सवानंतर परतीच्या प्रवासासाठी निघणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुरळित व्हावा, यासाठी २ ते ४ सप्टेंबर रात्री ८ वाजेपर्यंत, ६ ते ८ सप्टेंबरला रात्री ८ वाजेपर्यंत महामार्गावर जड वाहनांना प्रवेश बंदी राहणार आहे.