Monday, August 18, 2025

मद्यधुंद अवस्थेतील रिक्षा चालकाने महिला कॉन्स्टेबलला फरफटत नेलं

मद्यधुंद अवस्थेतील रिक्षा चालकाने महिला कॉन्स्टेबलला फरफटत नेलं

सातारा: साताऱ्यात एका रिक्षा चालकाने मद्यधुंद अवस्थेमध्ये महिला पोलीस कॉन्स्टेबलला फरफटत नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे.  या घटनेमध्ये महिला कॉन्स्टेबलला जबरदस्त मार लागला असून, सुमारे शंभर ते दोनशे मीटर त्यांना फरफटत नेल्याचा थरार अनेक सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. दारुच्या नशेत असलेल्या रिक्षावाल्याला अटकाव करताच चालकाने हे कृत्य केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.


महिला पोलिस कॉंस्टेबलला अशाप्रकारे फरफटत नेल्यामुळे स्थानिकांनी रिक्षाचालकाला पकडून चांगलाच चोप दिला. या दरम्यान त्याने तीन ते चार गाड्यांनाही धडक दिली होती. या घटनेची माहिती मिळताच सातारा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी रिक्षाचालकाला ताब्यात घेतलं आणि त्याच्याविरोधात गुन्हा नोंद केला. तसेच जखमी महिला कॉन्स्टेबलला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून तिची प्रकृत्ती सध्या स्थिर आहे.


 
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >