त्र्यंबकेश्वर मंदिरात सुरक्षारक्षकांकडून भाविकांना मारहाण

  32

त्रंबकेश्वर : बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे बाहेरगावहून येणाऱ्या भाविकांची दर्शन घेताना गैरसोय होऊ नये यासाठी विविध उपाययोजना केल्या जात असल्याचा दावा देवस्थानच्यावतीने केला जातो. परंतु, ढिसाळ नियोजनाचा फटका भाविकांना बसत आहे. दर्शन व्यवस्थेत अकस्मात बदल केल्यामुळे उद्भवलेल्या वादात सुरक्षारक्षकांनी भाविकांना मारहाण केली. तिथे पोलीस होते. या घटनेच्या चित्रफिती समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्या.


त्र्यंबकेश्वर येथे श्रावण सोमवार, महाशिवरात्र याशिवाय आठवड्याचे शनिवार, रविवार, काही वेळा सुट्टी असल्यावर भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणावर होते. या उत्सव काळात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून विशेष बंदोबस्त तैनात केला जातो. मधल्या काळात देवस्थानने ऑनलाईन देणगी दर्शनाची व्यवस्था केली. मात्र, या व्यवस्थेत आर्थिक घोटाळा झाल्याचे समोर आले. या प्रकरणात त्र्यंबकेश्वर पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेत देवस्थानच्या ऑनलाईन देणगी दर्शन पध्दतीवर प्रश्नचिन्ह उभे केले होते. जिल्हा पोलीस अधिक्षक बाळासाहेब पाटील यांनी या प्रकरणात लक्ष घालत देवस्थानला काही सूचना केल्या होत्या.


श्रावण महिन्यात भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी होत असते. व्यवस्थापनाने कुठलीही पूर्वसूचना न देता दर्शन व्यवस्थेत बदल केल्याने वाद उदभवला. यावेळी देवस्थानच्या सुरक्षारक्षकांकडून भाविकांना मारहाण करण्यात आली. या घटनेमुळे उपस्थित भाविकांना धक्का बसला. दर्शनासाठी आलेले काही जण दर्शन न घेताच माघारी परतले.


सुरक्षारक्षकांच्या अरेरावीचा फटका अनेकदा भाविकांना बसतो. बाहेरगावहून येणारे भाविक अनेकदा तक्रार न करता माघारी निघून जातात. कोणी तसा प्रयत्न केला तर, तक्रार घेतली जात नसल्याच्या तक्रारी यापूर्वी झालेल्या आहे.



त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग नाही तर छळाचे ठिकाण


त्र्यंबकेश्वर मंदिर बाबत सातत्याने तक्रारींची मालिका संपायचं नाव घेत नाहीये. यापूर्वी त्रंबकेश्वर मंदिरामध्ये साध्या भाविकाला दर्शन घेण्यासाठी म्हणून तासनतास रांगेत उभे राहावे लागते. परंतु हे सर्व घडत असताना देवस्थान प्रतिष्ठान जिल्हा प्रशासन आणि इतर कोणतीही संस्था यावर काहीही बोलण्यास तयार नाही. इतर वेळी त्र्यंबकेश्वर मंदिरात साधी टाचणी जरी पडली. तर, त्यावरून गदारोळ करणाऱ्यांनी सुद्धा या सर्व विषयावर शांत राहनेच पसंत केले आहे.


एकूणच त्र्यंबकेश्वर मंदिराची बिघडलेली परिस्थिती आणि त्यामुळे या परिसरामध्ये नागरिक येऊन देखील दर्शन न होणे त्यामुळे नाशिकच्या अर्थव्यवस्थेबरोबरच पर्यटन व्यवस्थेला देखील मोठा फटका बसू लागला आहे. पण याकडे कोणीही बघण्यास तयार नाही हे मोठे दुर्दैव आहे.


आत्तापर्यंत बघितलं तर त्र्यंबकेश्वर मंदिर हे बारा ज्योतिर्लिंग म्हणून ओळखले तरी या ठिकाणी भाविकांचा मोठा छळ होत असतो याची अनेक उदाहरणं आहेत. भाविक आपले दर्शन न घेता त्र्यंबकेश्वर राजाची माफी मागत लांबूनच दर्शन घेत निघून जातात यासारखे त्र्यंबकेश्वर व नाशिक जिल्ह्याचे दुर्दैवं म्हणावे लागेल.

Comments
Add Comment

तानसा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

पालघर : पालघर जिल्ह्यातील महत्त्वाचे जलस्रोत असलेल्या तानसा धरणाचे पाणी पातळी पूर्ण क्षमतेला पोहोचल्यामुळे आज

भिवंडीत साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी आला स्पायडरमॅन !

ठाणे : भिवंडीत भाजी मार्केटमध्ये साचलेले पाणी काढण्यासाठी चक्क स्पायडरमॅन आल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर

देवनार पोलीस अधिकाऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने अचानक मृत्यू!

मुंबई: देवनार पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक कृष्णा आत्माराम जोशी (५७) यांचा १७ ऑगस्ट रोजी

अल्ट्रा-फास्ट-फॅशन ब्रँड लिबासचा मुंबईत विस्तार

ओबेरॉय स्काय सिटी मॉल, बोरिवली येथे नवीन स्टोअर सुरु केले  मुंबई: लिबास या भारतातील आघाडीच्या अल्ट्रा-फास्ट-फॅशन

कौन बनेगा करोड़पती १७ : पहिल्या आठवड्यातच मिळाला करोडपती, आता प्रश्न ७ कोटींचा!

मुंबई : अमिताभ बच्चन यांचा लोकप्रिय रिअ‍ॅलिटी शो कौन बनेगा करोड़पती पुन्हा एकदा सीझन १७ सोबत प्रेक्षकांच्या

भाटघर धरणातून ३०५० क्युसेकने विसर्ग , नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

भोर : पुण्यातील भोर येथे असलेले ब्रिटिशकालीन भाटघर धरण (येसाजी कंक जलाशय) दुपारी १:३० वाजण्याच्या सुमारास १००