उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सुरू केले ‘लाडकी सून’ अभियान

ठाणे: 'लाडकी बहीण' योजनेच्या यशामुळे उत्साहित होऊन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिलांसाठी आणखी एक महत्त्वपूर्ण उपक्रम सुरू केला आहे. त्यांनी ठाणे शहरातून 'लाडकी सून' या राज्यव्यापी अभियानाची सुरुवात केली असून, याचा उद्देश घरगुती अन्याय आणि अत्याचाराला बळी पडणाऱ्या महिलांना तातडीने मदत करणे आहे.


या अभियानांतर्गत, पीडित महिलांसाठी ८८२८८६२२८८ हा हेल्पलाइन क्रमांक जारी करण्यात आला असून, या क्रमांकावर दिलेली माहिती पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल. हे अभियान संपूर्ण महाराष्ट्रात राबवले जाणार आहे आणि प्रत्येक शिवसेना (शिंदे गट) शाखेतून पीडित महिलांना मदत व मार्गदर्शन केले जाईल.


उपमुख्यमंत्री शिंदे यांनी 'एक्स' (ट्विटर) वर पोस्ट करून म्हटले आहे की, "आपल्या घरात जशी आपली लेक लाडकी असते, त्याचप्रमाणे सूनही लाडकी असायला हवी. तिला सन्मानाने वागवले पाहिजे, आणि जे असे करणार नाहीत, त्यांना शिवसेना महिला आघाडी योग्य पद्धतीने धडा शिकवेल." या अभियानाची जबाबदारी शिंदे यांच्या पत्नी मीनाक्षी शिंदे यांच्यावर सोपवण्यात आली आहे.

Comments
Add Comment

जागतिक मानसिक आरोग्य दिन २०२५; मुलांना तणावापासून दूर ठेवण्यासाठी या सवयी शिकवा.

दरवर्षी १० ऑक्टोबर रोजी जागतिक मानसिक आरोग्य दिन साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्याचा उद्देश मानसिक

प्रसिद्ध युट्युबरचा देश सोडून जाण्याचा निर्णय, कारण आले समोर?

मुंबई : युट्यूबर आणि बिग बॉस ओटीटी तीनमुळे प्रसिद्धीस आलेला अरमान मलिक कायदेशीर अडचणीत सापडल्यामुळे त्याने देश

'या' आसनांमुळे पीसीओएस आणि पीसीओडीला दूर ठेवण्यास होईल मदत!

सध्याच्या धावपळीच्या परिस्थितीमध्ये आपण आपल्या शरीराकडे दुर्लक्ष करतो. बाहेरचे अति खाणे, अवेळी जेवणे आणि झोपणे,

बॉलिवूडची ग्लॅम नायिका दीपिकाने अखेर आठ तासांच्या ड्युटीबद्दल सोडले मौन!

मुंबई : बॉलिवूडची आघाडीची नायिका दीपिका पादुकोण मागील अनेक दिवसांपासून चर्चेचा विषय ठरली आहे. दीपिका आई

म्हाडाला अर्जाच्या विक्रीतून मिळाले ८ कोटी

मुंबई (प्रतिनिधी) : म्हाडाच्या कोकण मंडळांच्या घरांसाठी येत्या शनिवारी दि. ११ ऑक्टोबरला ठाण्यामध्ये संगणकीय

टपाल घेण्यासाठीही पोस्टमन येणार घरी !

मुंबई (प्रतिनिधी) : आजपर्यंत पोस्टमन काका घराच्या दारापर्यंत टपाल व मनिऑर्डरसह अन्य पत्रं आणून देत होता. आता,