Thursday, October 23, 2025
Happy Diwali

उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून निवड झाल्याबद्दल मुख्यमंत्र्यांकडून राज्यपालांचे अभिनंदन

उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून निवड झाल्याबद्दल मुख्यमंत्र्यांकडून राज्यपालांचे अभिनंदन

नवी दिल्ली: मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापूर येथून परतताच थेट राजभवन गाठून मा. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेतली. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) वतीने त्यांची उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवार म्हणून घोषणा झाल्याबद्दल त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन केले.

याआधी भारताच्या उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांची निवड झाली त्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांन ट्विट करून त्यांचे हार्दिक अभिनंदन केले होते.

विविध राज्यांमध्ये संसद सदस्य आणि राज्यपाल म्हणून काम करताना, माननीय राज्यपाल राधाकृष्णन जी यांनी विविध कायदेविषयक आणि घटनात्मक बाबींमध्ये व्यापक कौशल्य मिळवले आहे. उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून त्यांची निवड आपल्या सर्वांना, महाराष्ट्रीयन म्हणून, अभिमानाने भरून टाकते, असेही म्हटले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा