नायजेरियामध्ये बोट उलटली, ४० लोक बेपत्ता; बचावकार्य सुरू


अबुजा: नायजेरियामध्ये एक मोठी बोट दुर्घटना घडली आहे. ५० प्रवाशांना घेऊन जाणारी एक बोट उलटून ४० लोक बेपत्ता झाले आहेत. बचावकार्य युद्धपातळीवर सुरू असून, आतापर्यंत १० जणांना वाचवण्यात यश आले आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, नायजेरियातील नायजर राज्यातील शिरोरो भागात ही दुर्घटना घडली. ही बोट कोगी राज्यातील एका बाजाराकडे जात होती, त्यावेळी ती नदीत उलटली. या बोटीत क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी होते. त्यामुळे हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. बेपत्ता झालेल्यांमध्ये बहुतांश महिला आणि मुलांचा समावेश असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.


स्थानिक आपत्कालीन सेवा एजन्सी आणि प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून, बेपत्ता लोकांचा शोध घेण्यासाठी मोहीम सुरू करण्यात आली आहे. पाणबुड्यांच्या मदतीने शोधकार्य वेगाने सुरू आहे. मात्र, या भागात सशस्त्र गटांचा वावर असल्यामुळे बचावकार्यात अडचणी येत आहेत.


नायजेरियामध्ये पावसाळ्याच्या काळात जुन्या आणि क्षमतेपेक्षा जास्त भार असलेल्या बोटींमधून प्रवास करताना अशा दुर्घटना वारंवार घडतात. या घटनेनंतर राष्ट्राध्यक्षांनी अंतर्देशीय जलमार्गांच्या देखरेखीची व्याप्ती वाढवण्याचे आणि रात्रीच्या प्रवासावर बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत.


Comments
Add Comment

ट्रम्पच्या गाझा शांतता योजनेला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेकडून मंजुरी

अमेरिका: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या गाझा शांतता योजनेला संयुक्त राष्ट्र सुरक्षा

मिठी मारण्याचा बिझनेस! फक्त ५ मिनिटांसाठी ६०० रुपये!

चीनच्या मोठ्या शहरांमध्ये सध्या एक नवीन आणि वेगळा सोशल ट्रेंड खूप चर्चेत आहे. त्याचे नाव आहे 'मॅन मम'. या

Sheikh Hasina Verdict : हसीना यांना शिक्षा तर ढाकामध्ये 'हिंसेचा भडका'! लोक रस्त्यावर उतरले; पहा राजधानीतील 'तणावाचा VIDEO'

बांगलादेशच्या राजकारणात सध्या ऐतिहासिक आणि अनेकदिशात्मक राजकीय चढ-उतार दिसून येत आहेत. देशाच्या माजी

बांगलादेशच्या न्यायालयाचा निर्णय, शेख हसीना दोषी

ढाका : बांगलादेशच्या पदच्युत पंतप्रधान शेख हसीना यांच्याविरोधात बांगलादेश आंतरराष्ट्रीय लवाद या देशांतर्गत

मदिना जवळ बस-टँकर अपघातात ४२ भारतीयांचा मृत्यू

मक्का मदिना : मदिना जवळ उमराह यात्रेकरूंना घेऊन जाणारी बस आणि डिझेल टँकर यांची भीषण धडक होऊन ४२ भारतीयांचा मृत्यू

अमेरिकेत रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी एआयचा वापर

आर्टिफिशियल इंटेलिजेंस ओळखणार रस्त्यांवरील रेलिंग, रस्त्यांचे चिन्ह न्यू यॉर्क : अमेरिकेत रस्ते खड्डेमुक्त