
मुंबई: एअरटेल डाउन डिटेक्टरनुसार देशभरातील एअरटेल ग्राहकांना गेल्या काही तासांपासून नेटवर्क आणि इंटरनेट समस्यांचा सामना करावा लागत आहे. ज्यांमध्ये मुंबई, दिल्ली-एनसीआर, अहमदाबाद, सुरत, हैदराबाद, बंगळुरू, कोलकाता आणि जयपूर तसेच कानपूर या शहरांतील एअरटेल वापरकर्त्यांना गेल्या काही तासांपासून मोबाइल नेटवर्क आणि इंटरनेटशी संबंधित समस्या येत आहेत. याबाबत स्वतः एअरटेलने सोशल मीडियावर पोस्ट करून ही माहिती दिली आहे. कंपनीने म्हटले आहे की ते शक्य तितक्या लवकर ही समस्या दुरुस्त करण्याचा प्रयत्न करत आहेत.
अनेक ग्राहकांनी तक्रार केली आहे की त्यांच्या मोबाइलवर नेटवर्क सिग्नल दिसत आहे, परंतु कॉलिंग पूर्णपणे बंद आहेत. कॉल करता येत नाही किंवा आलेला कॉल उचलता स्वीकारता देखील येत नाही. या सर्व तक्रारी सोशल मीडियावर एअरटेलविरुद्ध दिसून आल्या. बहुतेक तक्रारी दिल्ली एनसीआर तसेच मुंबईमधील वापरकर्त्यांनी केलेल्या दिसून येत आहेत.
नेटवर्क खंडित होत असल्याची एअरटेलने केली पुष्टी
मोबाइल इंटरनेट बंद झाल्यामुळे, सोशल मीडिया वापरणाऱ्या वापरकर्त्यांना, ऑनलाइन पेमेंट आणि इतर डिजिटल सेवा वापरताना देखील समस्या निर्माण झाल्या आहेत. एअरटेलने सोशल मीडियावर या खंडित सेवेची अधिकृतपणे पुष्टी केली आहे. तसेच तांत्रिक टीम समस्या सोडवत असल्याचे कंपनीने निवेदनात म्हंटले आहे. त्याचप्रमाणे ग्राहकांच्या गैरसोयीबद्दल माफी देखील मागितली असून लवकरच सेवा सामान्य केली जाईल असे आश्वासन देखील दिले आहे.
३५०० हून अधिक तक्रारी
डाउन डिटेक्टरनुसार, दिल्ली-एनसीआर, जयपूर, कानपूर, अहमदाबाद, सुरत, मुंबई, हैदराबाद, बंगळुरू आणि कोलकाता येथील एअरटेल ग्राहकांना सध्या नेटवर्क आणि इंटरनेट समस्यांचा सामना करावा लागत आहे. सोमवारी (१८ ऑगस्ट २०२५) दुपारी ४:३० वाजेपर्यंत सेवा खंडित झाल्याच्या ३,५०० हून अधिक तक्रारी नोंदवल्या गेल्या. यापैकी ६८ टक्के वापरकर्त्यांनी फोन कॉलबद्दल तक्रार केली. १६ टक्के लोकांनी मोबाईल इंटरनेटबद्दल तक्रार केली तर १५ टक्के लोकांनी सिग्नल न मिळाल्याबद्दल तक्रार केली. ५ जी प्लॅन असूनही ४ जी नेटवर्कवरील डेटा कपातीबद्दल अनेक वापरकर्त्यांनी तक्रार केली आहे. अनेक लोकांनी सांगितले की, शहरी भागात राहूनही जिथे कव्हरेज सामान्यपेक्षा स्थिर आहे, त्यांना कमकुवत नेटवर्कचा सामना करावा लागत आहे.